Oaths बद्दल बायबलमधील वचने: As the Lord liveth
As the Lord liveth बद्दल वचने
गिदोनाने म्हटले, “ते माझे भाऊ होते, माझ्याच आईचे पुत्र. जीवित याहवेहची शपथ घेऊन सांगतो की त्यांना तुम्ही ठार केले नसते, तर मी तुमचा वध केला नसता.”
आज रात्री येथेच राहा आणि सकाळी जर त्याला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सोडविणारा म्हणून त्याचे कर्तव्य करावयाचे असेल, तर चांगलेच आहे; त्याला तुम्हाला सोडवू द्या. परंतु जर त्याची तशी इच्छा नसेल, तर याहवेहची शपथ, मी ते करेन. सकाळ होईपर्यंत येथेच पडून राहा.”