मुख्य मजकुरावर जा

Faith बद्दल बायबलमधील वचने

543 वचने · 124 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण जे काही मला झाले त्यातून, तुमच्या प्रार्थनेद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या पुरवठ्याने माझी सुटका होईल हे मला माहीत आहे.

  2. याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा.

  3. कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे!

  4. परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.

  5. विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे.

  6. ही बाब विश्वासयोग्य आहे की त्यांच्याबरोबर आपण मेलो तर त्यांच्याबरोबर जिवंतही राहू.

  7. जर आपण धीराने दुःख सहन करतो तर त्यांच्याबरोबर राज्यही करू, जर आपण त्यांना नाकारतो तर तेही आपल्याला नाकारतील.

  8. जर आपण अविश्वासी झालो, तरी ते विश्वासू राहतात, कारण त्यांना स्वतःला नाकारता येत नाही.

  9. मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.

  10. पुढे आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू, आपले नीतिमान न्यायाधीश, त्या दिवशी मला देतील, आणि केवळ मलाच नाही, तर जे त्यांच्या परत येण्याची आवडीने वाट पाहत आहेत, त्या सर्वांना मिळेल.

  11. यास्तव, ज्याअर्थी त्यांच्या विसाव्यात प्रवेश करण्याचे अभिवचन अद्यापि कायम आहे, त्याअर्थी तुमच्यातील कोणीही उणा पडू नये म्हणून काळजी घ्या.

  12. कारण ही शुभवार्ता जशी त्यांना तशी आपल्यालाही सांगितली होती; पण जो संदेश त्यांनी ऐकला त्यामुळे त्यांचे काहीही भले झाले नाही, कारण ज्यांनी आज्ञापालन केले त्यांच्या विश्वासात ते सहभागी झाले नाहीत.

  13. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच विसाव्यात जाता येते, जसे परमेश्वराने म्हटले, “मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.” जरी जगाच्या स्थापनेपासून परमेश्वर त्यांना स्वीकारावयास सिद्ध आहेत व त्यांची वाट पाहत आहेत.

  14. कारण सातव्या दिवसाबद्दल असे कुठेतरी लिहिले आहे, “परमेश्वराने सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”

  15. अजून वरील भागात परमेश्वर म्हणतात, “ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.”

  16. तरी, ते अभिवचन कायम असून काहीजण त्या विसाव्यात जातात, पण पहिल्यांदा ज्यांना शुभवार्ता ऐकण्याची संधी मिळाली तरी त्यांनी आज्ञा मोडल्यामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत.

  17. परंतु विसाव्यात प्रवेश करण्यासाठी परमेश्वराने दुसरी वेळ नेमली आहे आणि त्याला “आज” असे म्हटले. हे ते फार पूर्वी दावीदाच्या मुखाद्वारे बोलले होते, आधीच नमूद केलेल्या शब्दांत ते म्हणाले, “आज तुम्ही त्यांची वाणी ऐकाल तर किती बरे, आपली अंतःकरणे कठीण करू नका.”

  18. जर यहोशुआने त्यांना विसावा दिला असता, तर परमेश्वराने यानंतर दुसर्‍या दिवसाविषयी बोलले नसते.

  19. तेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.

  20. जो कोणी परमेश्वराच्या विसाव्यात प्रवेश करतो, त्याने जसा परमेश्वराने त्यांच्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून सुद्धा विसावा घेतला आहे.

  21. यास्तव, त्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करू या. यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणामुळे कोणाचाही नाश होऊ नये.

  22. आणि, “माझा नीतिमान विश्वासाने जगेल. आणि माघार घेणार्‍यामध्ये मला संतोष वाटणार नाही.”

  23. माघार घेणार्‍यातील आणि नाश होणार्‍यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत.

  24. विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्‍या गोष्टींबद्दलची खात्री आहे.

  25. पुरातन काळातील परमेश्वराचे भक्त त्यांच्या विश्वासाबद्दल नावाजलेले होते.