Skip to content

Children बद्दल बायबलमधील वचने

257 वचने · 102 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या ठिकाणाहून निघण्यापूर्वी येशूंनी त्यांच्यावर हात ठेवले.

  2. आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे!

  3. मोशे म्हणाला, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख,’ आणि ‘जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो तो मरणदंडास पात्र व्हावा.’

  4. परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे ते अर्पण आहे—

  5. त्यामुळे तुम्ही त्यांना आईवडिलांसाठी काहीही करण्यास मनाई करता.

  6. या ज्या तुमच्या परंपरा पूर्वजांपासून चालत आलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता आणि अशा प्रकारच्या पुष्कळच गोष्टी तुम्ही करता.”

  7. येशूंनी उद्गार काढले, “या उत्तरामुळे तू जाऊ शकतेस; दुरात्म्याने तुझ्या मुलीला सोडले आहे.”

  8. ती घरी आली त्यावेळी तिला तिची मुलगी बाजेवर झोपलेली आढळली आणि दुरात्मा तिच्यामधून निघून गेला होता.

  9. “जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.”

  10. मुलाच्या वडिलांनी झटकन उत्तर दिले, “मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर करण्यास मला साहाय्य करा!”

  11. हे पाहण्याकरिता लोक धावत तिथे येत आहेत, हे पाहून येशूंनी अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हटले, “अरे बहिरेपणाच्या व मुकेपणाच्या आत्म्या, या मुलामधून बाहेर येण्याची मी तुला आज्ञा करीत आहे आणि पुन्हा कधीही त्याच्यामध्ये प्रवेश करू नकोस.”

  12. हे ऐकून दुरात्म्याने किंकाळी फोडली व त्याला पिळून बाहेर निघून गेला. मुलगा मेल्यासारखा पडला होता. “तो मरण पावला आहे,” असे लोक म्हणू लागले.

  13. परंतु येशूंनी मुलाचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि तो उभा राहिला.

  14. मग त्यांनी एका लहान लेकराला त्यांच्यामध्ये ठेवले. मग त्या लेकराला कवेत उचलून घेत त्यांना म्हणाले,

  15. “जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो.”

  16. लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले.

  17. जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.

  18. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जोपर्यंत तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.”

  19. नंतर त्यांनी बालकांना कवेत घेतले, त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला.

  20. येशू पुढे बोलत राहिले, “तर मग काय, या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? ते कोणासारखे आहेत?”

  21. लहान मुलांसारखी ही पिढी आहे. ते बाजारात बसून इतरांना हाक मारतात: “ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजविली, तरी तुम्ही नाचला नाही; आम्ही शोकगीत गाईले, तरी तुम्ही रडला नाही.’

  22. कारण त्याची बारा वर्षाची एकुलती एक मुलगी मरणाच्या पंथाला लागली होती. येशू वाटेवर असताना, लोकांच्या गर्दीने त्यांना जणू काय चेंगरून टाकले.

  23. आणि तिथे एक स्त्री होती जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती, परंतु कोणीही तिला बरे करू शकले नव्हते.

  24. तिने येशूंच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला आणि तत्क्षणी तिचा रक्तस्राव थांबला.

  25. तेव्हा येशूंनी विचारले, “मला कोणी स्पर्श केला?” जेव्हा प्रत्येकाने ते नाकारले, पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोक तुमच्याभोवती गर्दी करून तुमच्याकडे रेटले जात आहेत.”