मुख्य मजकुरावर जा

Alliance and Society with the Enemies of God बद्दल बायबलमधील वचने

229 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याच सुमारास माझ्या निदर्शनास आले की काही यहूदी पुरुषांनी अश्दोदी, अम्मोनी व मोआबी स्त्रियांशी विवाह केला होता.

  2. त्यांची अर्धी मुलेबाळे अश्दोदी अथवा इतर लोकांची भाषा बोलत होती, पण त्यांना यहूदीयाची भाषा बोलता येत नसे.

  3. तेव्हा मी त्यांना धमकाविले, त्यांना शाप दिला. काही पुरुषांना मार दिला व त्यांचे केस उपटून परमेश्वराची शपथ घालून त्यांच्याकडून वचन घेतले व म्हटले, “इतःपर तुम्ही आपल्या कन्यांचा त्यांच्या पुत्रांशी वा त्यांच्या कन्यांचा आपल्या पुत्रांशी विवाह करून देणार नाही.

  4. शलोमोन राजा अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला नव्हता काय? त्याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा राजा अनेक राष्ट्रांमध्ये नव्हता आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रीती केली व त्याला संपूर्ण इस्राएलचा राजा केले. असे असूनही त्याला यहूदीतर स्त्रियांनी पापाकडे वळविले.

  5. आता तुम्हीही तोच सर्व भयंकर दुष्टपणा करता व यहूदीतर स्त्रियांशी विवाह करून परमेश्वराशी विश्वासघात करीत आहात हे आम्ही ऐकावे काय?”

  6. धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्‍यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.

  7. दुष्टाई करणार्‍यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.

  8. जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो, याहवेहचे भय धरणार्‍यांचा सन्मान करतो, आणि जो स्वतःचे नुकसान होत असले तरी दिलेले वचन पाळतो;

  9. कपटी लोकांसोबत मी बसत नाही किंवा ढोंगी लोकांची संगत मी धरत नाही.

  10. दुष्कर्म करणार्‍यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही.

  11. मी व्यर्थ मूर्तिपूजकांचा तिरस्कार करतो; परंतु माझा भरवसा याहवेहवर आहे.

  12. तुम्ही एखाद्या चोराला पाहता व त्याला साथ देता आणि तुम्ही व्यभिचाऱ्यांचे भागीदार होता.

  13. सिंहांनी मला घेरले आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवार आहे अशा हिंसक स्वभावाच्या मनुष्यांमध्ये मी पडलो आहे.

  14. कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील; अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही.

  15. आपल्या शेजार्‍यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्‍यास, मी नष्ट करेन; दुसर्‍यांकडे तुच्छतेने पाहणार्‍याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा सहवास मला असह्य वाटेल.

  16. देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन, जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील; ज्यांचे आचरण दोषरहित असेल, असेच लोक माझी सेवा करतील.

  17. परंतु जे इतरांची फसवणूक करतात, अशांना मी माझ्या घरात राहू देणार नाही, आणि जे असत्य बोलतात, ते माझ्यापुढे उपस्थित राहणार नाहीत.

  18. या सर्व दुष्टकर्मांनी त्यांनी याहवेहला क्रुद्ध केले, म्हणून त्यांच्यामध्ये मरी पसरली.

  19. त्यांनी त्यांच्या मूर्तींची आराधना केली, त्यामुळे ते पाशात अडकले.

  20. त्यांनी आपल्या लहान मुलामुलींनाही त्या खोट्या दैवतांना अर्पण केले.

  21. निष्पाप मुलामुलींचे नरबळी दिले, कनानाच्या मूर्तींना अर्पणे वाहिली, आणि त्यांचे रक्त सांडून त्यांनी ती भूमी अपवित्र केली.

  22. आणि म्हणून याहवेहचा क्रोध आपल्या लोकांविरुद्ध भडकला आणि त्यांना त्यांच्या वारसांची घृणा आली.

  23. त्यांनी त्यांना परराष्ट्रांच्या अधीन केले, त्यांचे शत्रू त्यांच्यावर राज्य करू लागले.

  24. त्यांच्या शत्रूंनी त्यांना चिरडले आणि त्यांच्या शक्ती समोर त्यांना समर्पण करावे लागले.

  25. अहो कुकर्मी लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा, जेणेकरून माझ्या परमेश्वराच्या आज्ञांचे मी पालन करेन.