मुख्य मजकुरावर जा

Alliance and Society with the Enemies of God बद्दल बायबलमधील वचने

229 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि लैंगिक अनीती करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या सेवकांना तिच्या शिकवणीने भुलविते, तिचे तुम्ही सहन करता.

  2. पाहा, मी तिला क्लेशमय अंथरुणावर खिळवून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणार्‍या लोकांनी तिचा मार्ग सोडून पश्चात्ताप न केल्यास तीव्र क्लेश देईन.

  3. मी तिच्या लेकरांना ठार मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.

  4. मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली: “ ‘माझ्या लोकांनो, तिच्यापासून दूर व्हा,’ तिच्या पापात वाटेकरी होऊ नका, नाही तर, तिच्याबरोबर तुम्हालाही पीडा भोगावी लागेल.