मुख्य मजकुरावर जा

Alliance and Society with the Enemies of God बद्दल बायबलमधील वचने: A call to come out from

7 वचने · 51 पैलू

A call to come out from बद्दल वचने

  1. त्वरा करा, मोशे समुदायाला म्हणाला, “या दुष्ट माणसांच्या तंबूंपासून दूर व्हा. त्यांच्या मालकीच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. नाहीतर त्यांच्या पापामुळे त्यांच्याबरोबर तुमचाही नाश होईल.”

  2. आता याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराचा गौरव करा येथून पुढे त्यांच्याच इच्छेप्रमाणे करा. स्वतःला सभोवतालच्या लोकांपासून आणि या गैरयहूदी स्त्रियांपासून वेगळे करा.”

  3. “बाबेलमधून पलायन करा! आपला जीव वाचविण्यास पळा! तिच्या पापांमुळे तुम्ही तुमचा नाश करून घेऊ नका. हा याहवेहचा सूड घेण्याचा समय आहे; ज्यास ती पात्र आहे, त्याचा मोबदला ते तिला देतील.

  4. “अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर पडा! पलायन करून आपला जीव वाचवा! याहवेहच्या भयंकर क्रोधापासून दूर पळा.

  5. यास्तव, “त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभूने म्हटले आहे त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”

  6. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा करतो की, जो प्रत्येक विश्वासणारा बंधू आळशी आणि फूट पाडणारा आणि आमच्याद्वारे जे शिक्षण मिळाले त्याप्रमाणे जीवन न जगणारा असल्यास त्यापासून दूर राहा.

  7. मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली: “ ‘माझ्या लोकांनो, तिच्यापासून दूर व्हा,’ तिच्या पापात वाटेकरी होऊ नका, नाही तर, तिच्याबरोबर तुम्हालाही पीडा भोगावी लागेल.