मुख्य मजकुरावर जा

Alliance and Society with the Enemies of God बद्दल बायबलमधील वचने: Punishment of

15 वचने · 51 पैलू

Punishment of बद्दल वचने

  1. आणि मग जसे मी त्यांचे करण्याचे योजले आहे, तसे तुमचे करेन.’ ”

  2. कारण ते तुमच्या मुलांना माझे अनुसरण करण्यापासून परावृत्त करून इतर दैवतांची उपासना करण्यासाठी प्रवृत्त करतील आणि याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते लगेच तुमचा नाश करतील.

  3. तर खचित हे जाणून घ्या की, याहवेह तुमचे परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या समोरून आणखी घालवून देणार नाही. परंतु हा चांगला देश, जो याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिला आहे, त्यातून तुमचा नाश होईपर्यंत, ती राष्ट्रे तुमच्यासाठी पाश व सापळा अशी होतील, तुमच्या पाठीवर चाबूक आणि तुमच्या डोळ्यात काटे असतील.

  4. आणि मी हे देखील म्हणालो, ‘मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देणार नाही; ते तुम्हाला काट्यांसारखे होतील आणि त्यांची दैवते तुम्हाला सापळे होतील.’ ”

  5. इस्राएली लोक कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी, आणि यबूसींमध्ये राहू लागले.

  6. इस्राएली लोकांनी विवाहात त्यांच्या कन्या घेतल्या आणि आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना दिल्या आणि त्यांच्या दैवतांची उपासना करू लागले.

  7. इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले; ते याहवेह त्यांच्या परमेश्वराला विसरले आणि बआल व अशेरा या दैवतांची उपासना करू लागले.

  8. याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला म्हणून त्यांनी, जिथे इस्राएली लोक आठ वर्षे गुलामगिरीत होते त्या अराम-नहराईम राजा कुशन-रिशाथईमच्या हाती त्यांना विकले.

  9. आमच्या पूर्वजांपासून आजतागायत आमची अत्यंत घोर पापे झाली आहेत. आमच्या पातकांमुळेच, आम्ही, आमचे राजे, आमचे याजक, गैरयहूदी राजांच्या तलवारीने मारले गेले, आम्हाला कैद करण्यात आले, लुबाडण्यात आले व फजीत करण्यात आले. आजही आमची स्थिती अशीच आहे.

  10. तरी आमच्या दुष्टपणामुळे आम्ही पुन्हा तुमच्या आज्ञाचा भंग करून जे लोक अमंगळ कृत्ये करतात, त्यांच्याशी मिश्रविवाह करावे काय? खरोखर आता तुमचा संताप आम्हाला नष्ट करून आणि वाचून आलेले अवशिष्ट इस्राएली लोकही नष्ट होणार नाहीत काय?

  11. त्यांनी त्यांना परराष्ट्रांच्या अधीन केले, त्यांचे शत्रू त्यांच्यावर राज्य करू लागले.

  12. त्यांच्या शत्रूंनी त्यांना चिरडले आणि त्यांच्या शक्ती समोर त्यांना समर्पण करावे लागले.

  13. यास्तव पश्चात्ताप कर! नाही तर, मी तुमच्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणार्‍या तलवारीने त्यांच्याविरुद्ध लढेन.

  14. पाहा, मी तिला क्लेशमय अंथरुणावर खिळवून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणार्‍या लोकांनी तिचा मार्ग सोडून पश्चात्ताप न केल्यास तीव्र क्लेश देईन.

  15. मी तिच्या लेकरांना ठार मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.