मुख्य मजकुरावर जा

Alliance and Society with the Enemies of God बद्दल बायबलमधील वचने: Lead to idolatry

15 वचने · 51 पैलू

Lead to idolatry बद्दल वचने

  1. “त्या देशात राहत असलेल्या लोकांशी करार करू नये याविषयी सावध असा; कारण ते जेव्हा त्यांच्या दैवतांशी व्यभिचार करतात आणि त्यांना यज्ञ करतात, ते तुम्हाला आमंत्रित करतील आणि तुम्ही त्यांच्या यज्ञार्पणातील अन्न खाल.

  2. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यातील काही कन्या तुमच्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवडाल आणि त्या कन्या त्यांच्या दैवतांशी व्यभिचार करतील, त्या तुमच्या मुलांनाही तसेच करण्यासाठी प्रवृत्त करतील.

  3. इस्राएली लोक शिट्टीम येथे राहत असताना, त्यांचे पुरुष तेथील मोआबी कन्यांशी व्यभिचार करू लागले,

  4. त्या कन्यांनी इस्राएली पुरुषांना त्यांच्या दैवतांच्या यज्ञास बोलाविले. लोकांनी त्या यज्ञांचे भोजन खाल्ले आणि त्या दैवतांना नमन केले.

  5. अशा प्रकारे इस्राएली लोक बआल-पौराशी जडले आणि याहवेहचा कोप त्यांच्याविरुद्ध भडकला.

  6. याहवेहने मोशेला म्हटले, “या लोकांच्या सर्व पुढार्‍यांना घे, त्यांना फासावर टांग व त्यांना दिवसाच्या प्रकाशात याहवेहसमोर उघडे कर, म्हणजे इस्राएलवर पेटलेला याहवेहचा क्रोध शांत होईल.”

  7. तेव्हा मोशे इस्राएलच्या न्यायाधीशांनी म्हणाला, “तुम्ही स्वतःला बआल-पौराशी जोडले आहे, तुम्हा प्रत्येकाला जिवे मारावे.”

  8. त्यावेळी ते सभामंडपाच्या दारात रडत असताना, एका इस्राएली पुरुषाने मोशे व संपूर्ण इस्राएली मंडळीसमोर एक मिद्यानी स्त्री आणली.

  9. जेव्हा अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने हे पाहिले, तेव्हा तो समुदायातून उठला व त्याने आपल्या हाती एक भाला घेतला

  10. आणि त्यांच्यामागे तंबूत गेला व त्या दोघांच्या म्हणजेच तो इस्राएली पुरुष व ती स्त्री यांच्या पोटात तो भाला भोसकला, तेव्हा इस्राएलच्या लोकांमधून पीडा थांबली;

  11. कारण ते तुमच्या मुलांना माझे अनुसरण करण्यापासून परावृत्त करून इतर दैवतांची उपासना करण्यासाठी प्रवृत्त करतील आणि याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते लगेच तुमचा नाश करतील.

  12. इस्राएली लोक कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी, आणि यबूसींमध्ये राहू लागले.

  13. इस्राएली लोकांनी विवाहात त्यांच्या कन्या घेतल्या आणि आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना दिल्या आणि त्यांच्या दैवतांची उपासना करू लागले.

  14. इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले; ते याहवेह त्यांच्या परमेश्वराला विसरले आणि बआल व अशेरा या दैवतांची उपासना करू लागले.

  15. परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि लैंगिक अनीती करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या सेवकांना तिच्या शिकवणीने भुलविते, तिचे तुम्ही सहन करता.