मुख्य मजकुरावर जा

Alliance and Society with the Enemies of God बद्दल बायबलमधील वचने: Exhortations to shun all inducements to

9 वचने · 51 पैलू

Exhortations to shun all inducements to बद्दल वचने

  1. माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस.

  2. जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या;

  3. चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू, आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू;

  4. आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू;

  5. आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”—

  6. माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस;

  7. दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, किंवा दुष्कृत्ये करणार्‍यांच्या मार्गाने जाऊ नकोस.

  8. त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस, त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा,

  9. प्रिय मित्रांनो, तुम्हाला आधी इशारा देऊन ठेवला आहे, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या चुकीच्या प्रवाहात सापडून आपल्या सुरक्षित स्थितीतून ढळू नये यासाठी जपून राहा.