मुख्य मजकुरावर जा

Alliance and Society with the Enemies of God बद्दल बायबलमधील वचने

229 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या इसहाक आणि रिबेकाहसाठी दुःखाचे स्रोत होत्या.

  2. तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस.

  3. मी त्यांच्या सभेमध्ये जाऊ नये, त्यांच्या मंडळीमध्ये मी सामील होऊ नये, कारण रागाच्या भरात त्यांनी माणसांचा वध केला, आणि वाटेल तसे बैलांची धोंडशीर तोडली.

  4. त्यांच्याशी किंवा त्यांच्या दैवतांशी करार करू नये.

  5. त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नये, नाहीतर ते तुम्हाला माझ्याविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करतील, कारण त्यांच्या दैवतांची उपासना करणे तुमच्यासाठी खचितच पाश असे होईल.”

  6. तुम्ही आम्हाबरोबर आला नाही, तर माझ्यावर आणि आपल्या लोकांवर तुमची कृपादृष्टी झाली आहे की नाही हे कसे कळणार? मी व तुमचे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपासून वेगळे आहोत हे कसे समजणार?”

  7. ज्या देशात तुम्ही जात आहात त्यात राहत असलेल्या लोकांशी करार करू नये याविषयी सावध असा, नाहीतर ते तुमच्यासाठी पाश असे होतील.

  8. “त्या देशात राहत असलेल्या लोकांशी करार करू नये याविषयी सावध असा; कारण ते जेव्हा त्यांच्या दैवतांशी व्यभिचार करतात आणि त्यांना यज्ञ करतात, ते तुम्हाला आमंत्रित करतील आणि तुम्ही त्यांच्या यज्ञार्पणातील अन्न खाल.

  9. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यातील काही कन्या तुमच्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवडाल आणि त्या कन्या त्यांच्या दैवतांशी व्यभिचार करतील, त्या तुमच्या मुलांनाही तसेच करण्यासाठी प्रवृत्त करतील.

  10. त्वरा करा, मोशे समुदायाला म्हणाला, “या दुष्ट माणसांच्या तंबूंपासून दूर व्हा. त्यांच्या मालकीच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. नाहीतर त्यांच्या पापामुळे त्यांच्याबरोबर तुमचाही नाश होईल.”

  11. मग कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबूंपासून ते दूर गेले. दाथान व अबीराम हे आपल्या पत्नी, मुले व तान्ही बाळे यांच्यासह आपआपल्या तंबूंच्या दारांशी येऊन उभे राहिले.

  12. आणि कोरह व त्याचे तंबू त्यांची कुटुंबे आणि त्यांच्याजवळ उभे असलेले त्यांचे मित्र व त्यांच्या सर्व मालमत्तेसह पृथ्वीने गिळून टाकले.

  13. इस्राएली लोक शिट्टीम येथे राहत असताना, त्यांचे पुरुष तेथील मोआबी कन्यांशी व्यभिचार करू लागले,

  14. त्या कन्यांनी इस्राएली पुरुषांना त्यांच्या दैवतांच्या यज्ञास बोलाविले. लोकांनी त्या यज्ञांचे भोजन खाल्ले आणि त्या दैवतांना नमन केले.

  15. अशा प्रकारे इस्राएली लोक बआल-पौराशी जडले आणि याहवेहचा कोप त्यांच्याविरुद्ध भडकला.

  16. याहवेहने मोशेला म्हटले, “या लोकांच्या सर्व पुढार्‍यांना घे, त्यांना फासावर टांग व त्यांना दिवसाच्या प्रकाशात याहवेहसमोर उघडे कर, म्हणजे इस्राएलवर पेटलेला याहवेहचा क्रोध शांत होईल.”

  17. तेव्हा मोशे इस्राएलच्या न्यायाधीशांनी म्हणाला, “तुम्ही स्वतःला बआल-पौराशी जोडले आहे, तुम्हा प्रत्येकाला जिवे मारावे.”

  18. त्यावेळी ते सभामंडपाच्या दारात रडत असताना, एका इस्राएली पुरुषाने मोशे व संपूर्ण इस्राएली मंडळीसमोर एक मिद्यानी स्त्री आणली.

  19. जेव्हा अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने हे पाहिले, तेव्हा तो समुदायातून उठला व त्याने आपल्या हाती एक भाला घेतला

  20. आणि त्यांच्यामागे तंबूत गेला व त्या दोघांच्या म्हणजेच तो इस्राएली पुरुष व ती स्त्री यांच्या पोटात तो भाला भोसकला, तेव्हा इस्राएलच्या लोकांमधून पीडा थांबली;

  21. कारण त्यांनी तुम्हाला शत्रू मानले, जेव्हा पेओरच्या घटनेत तुम्हाला फसविण्यासाठी आपली बहीण, मिद्यानी पुढार्‍याची मुलगी कजबी हिचा त्यांनी उपयोग केला व त्या घटनेमुळे पीडा आली, तेव्हा तिला जिवे मारण्यात आले.”

  22. आणि मग जसे मी त्यांचे करण्याचे योजले आहे, तसे तुमचे करेन.’ ”

  23. आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल, तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ नायनाट करा. त्यांच्याशी कुठलाही करार करू नका किंवा त्यांना दया दाखवू नका.

  24. तुम्ही त्यांच्याशी आंतरविवाह करू नका, तुमच्या कन्या त्यांच्या पुत्रांसाठी देऊ नका किंवा त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांसाठी घेऊ नका,

  25. कारण ते तुमच्या मुलांना माझे अनुसरण करण्यापासून परावृत्त करून इतर दैवतांची उपासना करण्यासाठी प्रवृत्त करतील आणि याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते लगेच तुमचा नाश करतील.