Skip to content

Abraham बद्दल बायबलमधील वचने

314 वचने · 39 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, “जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे.”

  2. हे सर्व यासाठी की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूंच्याद्वारे गैरयहूदीयांनाही प्राप्त व्हावा, म्हणजे विश्वासाद्वारे अभिवचन दिल्याप्रमाणे आपल्याला आत्म्याचे दान प्राप्त व्हावे.

  3. प्रिय बंधू व भगिनींनो, रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. मानवी करार जो प्रस्थापित केलेला आहे त्यात कोणी वेगळे करू शकत नाही किंवा त्यामध्ये भर घालू शकत नाही त्याप्रमाणे हे आहे.

  4. ही अभिवचने अब्राहाम व त्याच्या संतानाला दिली होती. शास्त्रलेख “आणि संतानांना” असे अनेक लोकांविषयी म्हणत नाही, तर “आणि तुझ्या संतानाला,” म्हणजे एका व्यक्तीविषयी म्हणतात, आणि ते ख्रिस्त आहे.

  5. मला म्हणावयाचे ते हे: चारशेतीस वर्षानंतर देण्यात आलेले नियमशास्त्र, परमेश्वराने आधी कायम केलेल्या कराराला वेगळे करू शकत नाही व दिलेले वचन रद्द करू शकत नाही.

  6. कारण जर वारसा नियमशास्त्रावर अवलंबून आहे, तर ते अभिवचनांवर अवलंबून नाही. परंतु परमेश्वराने अब्राहामाला आपल्या कृपेने, अभिवचनाद्वारे वारसाहक्क दिला.

  7. जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत.

  8. असे लिहिले आहे की अब्राहामाला दोन पुत्र होते एक दासीपासून झालेला, तर दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.

  9. त्या दासीपासून झालेला पुत्र दैहिकरितीने जन्मला, परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला पुत्र दैवी अभिवचनाचा परिणाम म्हणून जन्मला.

  10. अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे.

  11. आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे.

  12. परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे.

  13. जसे यशायाहने लिहिले आहे: “हे वांझ स्त्रिये, तू जी कधीही प्रसवली नाही; उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, कारण विवाहित स्त्रीपेक्षा, तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,”

  14. आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत.

  15. त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे.

  16. पण शास्त्रलेखात काय लिहिले आहे? “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर कधीही वारस होणार नाही.”

  17. प्रिय बंधू व भगिनींनो, आपण दासीपुत्र नाही, तर आपण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.

  18. जेव्हा परमेश्वराने अब्राहामाला त्यांचे वचन दिले, तेव्हा त्यांना शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे ते स्वतःचीच शपथ वाहून,

  19. म्हणाले, “मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि तुला अनेक वंशज देईन.”

  20. हा मलकीसदेक शालेमचा राजा असून परात्पर परमेश्वराचा याजकही होता. अनेक राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत असताना, मलकीसदेक त्याला भेटला व त्याला आशीर्वाद दिला.

  21. तेव्हा अब्राहामाने सर्वांचा दहावा भाग त्याला दिला. प्रथम मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ, “नीतिमत्वाचा राजा” असा आहे; आणि, “शालेमचा राजा” म्हणजे “शांतीचा राजा” असा आहे.

  22. त्याची आई किंवा वडील, वंशावळी, जीवनाचा उगम अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट याविषयी काही माहिती नाही, तरी परमेश्वराच्या पुत्रासमान तो युगानुयुग याजक राहतो.

  23. तर तो केवढा थोर आहे याचा विचार करा: कुलपिता अब्राहामाने लुटीचा दहावा हिस्सा त्याला दिला.

  24. लेवीच्या गोत्रातील, ज्यांना याजकपण प्राप्त होत असते त्यांना लोकांपासून, म्हणजे जे अब्राहामाच्या वंशजाचे आहेत अशा इस्राएली बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दहावा भाग गोळा करता येतो.

  25. परंतु हा मनुष्य लेवी वंशातील नव्हता, त्याने अब्राहामापासून दशांश गोळा केला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला.