मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 राजे ३:२६सुमारे इ.स.पू. ८९५

    आपली सेना हरविली जात आहे हे मोआबाच्या राजाने पाहिले, तेव्हा त्याने अखेरचा प्रयत्न म्हणून आपल्या सातशे धनुर्धाऱ्यांसह शत्रूंची फळी फोडून एदोमाच्या राजाकडे निसटून जाण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.

  2. 2 राजे ३:२७सुमारे इ.स.पू. ८९५

    म्हणून त्याने आपला ज्येष्ठपुत्र, जो त्याच्यानंतर राजा होणार होता, त्याला धरून ठार मारले व शहराच्या तटावरच त्याचे होमार्पण केले. यावरून इस्राएली सैन्याविरुद्ध प्रकोप आला; व ते माघारी आपल्या देशाला परतले.

  3. 2 राजे ४:१सुमारे इ.स.पू. ८९४

    संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचे भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”

  4. 2 राजे ४:२सुमारे इ.स.पू. ८९४

    अलीशाने तिला विचारले, “मी तुला कशी मदत करू शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग?” ती म्हणाली, “एका कुपीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय तुमच्या दासीजवळ काहीही नाही.”

  5. 2 राजे ४:३सुमारे इ.स.पू. ८९४

    अलीशा म्हणाला, “आजूबाजूला जा आणि तुझ्या सर्व शेजार्‍यांकडून रिकामी भांडी मागून घे. थोडकी मागू नको.

  6. 2 राजे ४:४सुमारे इ.स.पू. ८९४

    आपल्या मुलांना घेऊन तू घरात जा व दार लावून घे. नंतर जैतुनाचे तेल तू सर्व भांड्यात भर आणि ते भांडे भरले की एका बाजूला ठेव.”

  7. 2 राजे ४:५सुमारे इ.स.पू. ८९४

    तिने त्याला सोडले आणि तिच्या आणि तिच्या मुलांच्या मागून दार बंद केले. त्यांनी भांडे तिच्याकडे आणले आणि ती ओतत राहिली.

  8. 2 राजे ४:६सुमारे इ.स.पू. ८९४

    जेव्हा प्रत्येक भांडे भरले गेले. ती तिच्या मुलाला म्हणाली, “आणखी काही भांडी माझ्याकडे आण.” पण त्याने म्हटले, “आता एकही भांडे शिल्लक राहिले नाही.” तेव्हा तेल वाहणे बंद झाले.

  9. 2 राजे ४:७सुमारे इ.स.पू. ८९४

    ती परमेश्वराच्या माणसाजवळ गेली आणि त्याला सांगितले, तो म्हणाला, “आता जा आणि तेल विकून आपले कर्ज फेड. जे शिल्लक राहिलेले आहे त्यावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह कर.”

  10. 2 राजे ४:८सुमारे इ.स.पू. ८९४

    एके दिवशी अलीशा शूनेम येथे गेला आणि तिथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती, तिने त्याला भोजनासाठी आग्रह केला. जेव्हा तो त्या मार्गाने जाई, तेव्हा तेव्हा तो तिच्या घरी भोजनासाठी उतरत असे.

  11. 2 राजे ४:९सुमारे इ.स.पू. ८९४

    ती आपल्या पतीला म्हणाली, “मला माहीत आहे की हा मनुष्य जो वरचेवर आपल्या मार्गाने येतो, तो परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे.

  12. 2 राजे ४:१०सुमारे इ.स.पू. ८९४

    तेव्हा त्यांच्यासाठी आपण धाब्यावर एक लहानशी खोली तयार करू. तिथे त्यांच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक दिवा ठेवू. म्हणजे जेव्हा ते येतील तेव्हा इथे राहू शकतील.”

  13. 2 राजे ४:११सुमारे इ.स.पू. ८९४

    एके दिवशी अलीशा तिथे आला आणि त्याच्या खोलीत जाऊन विसावा घेतला.

  14. 2 राजे ४:१२सुमारे इ.स.पू. ८९४

    त्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “शूनेमकरीच्या स्त्रीला बोलव.” त्याने तिला बोलाविले आणि ती त्याच्यापुढे उभी राहिली.

  15. 2 राजे ४:१३सुमारे इ.स.पू. ८९४

    अलीशा गेहजीला म्हणाला, “तिला सांग, ‘तू आमच्यासाठी या सर्व त्रासातून गेली आहेस. आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो? राजापुढे किंवा सेनाधिकार्‍यांपुढे तुझ्या वतीने बोलावे काय?’ ” तिने उत्तर दिले, “मी तर माझ्या लोकांमध्येच राहते.”

  16. 2 राजे ४:१४सुमारे इ.स.पू. ८९४

    अलीशाने गेहजीला विचारले, “आपण तिच्यासाठी काय करू शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला मूल नाही व आता तिचा पती वृद्ध झाला आहे.”

  17. 2 राजे ४:१५सुमारे इ.स.पू. ८९४

    मग अलीशाने म्हटले, “तिला बोलावून आण.” म्हणून त्याने तिला बोलाविले आणि ती दारातच उभी राहिली.

  18. 2 राजे ४:१६सुमारे इ.स.पू. ८९४

    अलीशा तिला म्हणाला, “पुढील वर्षी यावेळेस तू आपल्या पुत्रास उराशी धरशील.” ती म्हणाली, “माझ्या स्वामी, नाही, परमेश्वराच्या मनुष्या, कृपया तुम्ही मला अशी खोटी अाशा देऊ नका!”

  19. 2 राजे ४:१७सुमारे इ.स.पू. ८९४

    पण अलीशाने तिला सांगितल्याप्रमाणे ती स्त्री गर्भवती झाली आणि पुढच्या वर्षी वसंतॠतूत तिने एका पुत्राला जन्म दिला.

  20. 2 राजे ४:१८सुमारे इ.स.पू. ८९४

    पुत्र वाढत गेला आणि एके दिवशी आपल्या पित्याकडे गेला, जो कापणी करणार्‍यांसोबत होता.

  21. 2 राजे ४:१९सुमारे इ.स.पू. ८९४

    तो आपल्या पित्याला म्हणाला, “माझे डोके! माझे डोके!” त्याच्या पित्याने एका सेवकाला म्हटले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”

  22. 2 राजे ४:२०सुमारे इ.स.पू. ८९४

    सेवकाने त्याला उचलले आणि त्याच्या आईजवळ त्याला नेले. तो बालक दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर बसला आणि नंतर तो मरण पावला.

  23. 2 राजे ४:२१सुमारे इ.स.पू. ८९४

    ती त्याला घेऊन वर गेली आणि परमेश्वराच्या माणसाच्या खाटेवर ठेवले आणि दार बंद करून ती बाहेर गेली.

  24. 2 राजे ४:२२सुमारे इ.स.पू. ८९४

    तिने आपल्या पतीला हाक मारली आणि म्हटले, “एक सेवक व एक गाढव माझ्याकडे पाठवून द्या, कारण मला ताबडतोब परमेश्वराच्या मनुष्याकडे त्याची भेट घेऊन परत येते.”

  25. 2 राजे ४:२३सुमारे इ.स.पू. ८९४

    त्याने विचारले, “आजच त्याच्याकडे का जात आहे? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “हा ठीक आहे.”