मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 राजे ४:२४सुमारे इ.स.पू. ८९४

    मग तिने गाढवावर खोगीर घातले व तिच्या सेवकास म्हणाली, “चल, गाढव त्वरेने हाकलीत ने, मी सांगितल्याशिवाय वेग कमी करू नको.”

  2. 2 राजे ४:२५सुमारे इ.स.पू. ८९४

    ती निघाली आणि कर्मेल डोंगराजवळ परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. जेव्हा त्याने तिला दुरून पहिले, तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “बघ, ती शूनेमकरीण!

  3. 2 राजे ४:२६सुमारे इ.स.पू. ८९४

    धावत पुढे जा आणि तिला विचार, ‘तू ठीक आहे काय? तुझे पती ठीक आहेत काय? तुझे लेकरू ठीक आहे काय?’ ” ती म्हणाली, “होय, सर्वकाही ठीक आहे.”

  4. 2 राजे ४:२७सुमारे इ.स.पू. ८९४

    जेव्हा ती परमेश्वराच्या मनुष्याच्या डोंगरावर पोहोचली, तेव्हा तिने त्याचे पाय धरले. जेव्हा गेहजी तिला दूर लोटू लागला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला सोड! ती फार दुःखात आहे, पण याहवेहने त्याचे कारण मला कळविले नाही आणि ते माझ्यापासून गुप्त ठेवले.”

  5. 2 राजे ४:२८सुमारे इ.स.पू. ८९४

    ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुमच्याजवळ पुत्र मागितला होता काय? आणि त्यावेळी मी तुम्हाला, ‘मला निरर्थक आशा देऊ नका, असे म्हटले नव्हते का?’ ”

  6. 2 राजे ४:२९सुमारे इ.स.पू. ८९४

    अलीशा गेहजीला म्हणाला, “कंबर बांध आणि माझी काठी तुझ्या हातात घे आणि धाव. मार्गात तुला कोणी भेटला तर अभिवादन करू नको आणि जर तुला कोणी अभिवादन केले तर त्यांना उत्तर देऊ नकोस. माझी काठी मुलाच्या तोंडावर ठेव.”

  7. 2 राजे ४:३०सुमारे इ.स.पू. ८९४

    परंतु मुलाची आई म्हणाली, “याहवेहची आणि तुमच्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडणार नाही.” म्हणून तो उठला आणि तिच्यामागून निघाला.

  8. 2 राजे ४:३१सुमारे इ.स.पू. ८९४

    गेहजी पुढे गेला आणि त्याने त्या मुलाच्या तोंडाला काठीचा स्पर्श केला, पण कोणताच आवाज नाही वा प्रतिसाद मिळाला. म्हणून गेहजी परत अलीशाला भेटण्यास गेला आणि त्याला सांगितले, “मुलगा जागा झाला नाही.”

  9. 2 राजे ४:३२सुमारे इ.स.पू. ८९४

    अलीशा घरात गेला, तो त्याला मुलगा मृत होऊन त्याच्या खाटेवर पडला आहे असे दिसले,

  10. 2 राजे ४:३३सुमारे इ.स.पू. ८९४

    तेव्हा अलीशा आत गेला, त्याने दोघांच्या मागे दार बंद करून घेतले, आणि याहवेहची प्रार्थना केली.

  11. 2 राजे ४:३४सुमारे इ.स.पू. ८९४

    मग अलीशा मुलाच्या शरीरावर, तोंडावर तोंड, डोळ्यांवर डोळे, हातांवर हात, अशाप्रकारे उपडा पडला. त्यामुळे मुलाच्या शरीरात पुन्हा ऊब येऊ लागली.

  12. 2 राजे ४:३५सुमारे इ.स.पू. ८९४

    मग अलीशा माडीवरून खाली आला व घरात काही वेळ इकडे फेर्‍या मारून पुन्हा माडीवर जाऊन पूर्वीप्रमाणे मुलाच्या शरीरावर उपडा पडला. तेव्हा मुलाने सात वेळा शिंका दिल्या व डोळे उघडले.

  13. 2 राजे ४:३६सुमारे इ.स.पू. ८९४

    मग अलीशाने गेहजीला बोलावून म्हटले, “शूनेमकरीणीला बोलव.” त्याने तिला बोलविल्यावर, तो तिला म्हणाला, “हा घे, तुझ्या पुत्र!”

  14. 2 राजे ४:३७सुमारे इ.स.पू. ८९४

    ती आत आली, त्याच्या पायावर पडली आणि जमिनीपर्यंत लवून तिने त्याला नमन केले. मग तिने आपल्या मुलाला घेतले आणि ती बाहेर पडली.

  15. 2 राजे ४:३८सुमारे इ.स.पू. ८९४

    अलीशा गिलगाल येथे परत आला आणि त्या भागात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचा समूह त्याच्यापुढे बसलेला होता, त्याने आपल्या सेवकास म्हटले, “चुलीवर मोठे भांडे ठेऊन या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”

  16. 2 राजे ४:३९सुमारे इ.स.पू. ८९४

    त्यांच्यातील एकजण शाकभाजी आणावयास एका शेतात गेला आणि त्याला रानटी द्राक्षे दिसली आणि त्याने आपल्या कापडात जितकी फळे त्याला उचलता येतील तितकी त्याने उचलली. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने त्याचे तुकडे करून भांड्यात टाकले, परंतु ते काय आहे याची काहीच कल्पना कोणालाही नव्हती.

  17. 2 राजे ४:४०सुमारे इ.स.पू. ८९४

    शाकभाजी माणसांना वाढण्यात आली, पण जसे त्यांनी खाण्यास सुरुवात केली, ते खाताच ओरडू लागले, “परमेश्वराच्या मनुष्या, या भांड्यामध्ये मृत्यू आहे!” आणि ते भोजन करू शकले नाही.

  18. 2 राजे ४:४१सुमारे इ.स.पू. ८९४

    तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” त्याने ते भांड्यात टाकले आणि म्हणाला, “हे लोकांना खाण्यास वाढा.” आणि भांड्यात काहीही अपायकारक राहिले नाही.

  19. 2 राजे ४:४२सुमारे इ.स.पू. ८९४

    एके दिवशी बआल-शालीशाह येथून एका मनुष्याने आपल्या प्रथम पिकातील काही धान्य आणि जवाच्या वीस भाकरी एका पिशवीत घालून परमेश्वराच्या मनुष्याकडे आणल्या. तेव्हा तो म्हणाला, “लोकांना खाण्यास दे.”

  20. 2 राजे ४:४३सुमारे इ.स.पू. ८९४

    त्याच्या सेवकाने म्हटले, “शंभर लोकांपुढे हे भोजन कसे ठेऊ?” परंतु अलीशाने उत्तर दिले, “हे लोकांना खाण्यास दे. कारण याहवेह असे म्हणतात: ‘ते खातील आणि काही शिल्लक राहील.’ ”

  21. 2 राजे ४:४४सुमारे इ.स.पू. ८९४

    मग त्याने ते त्यांच्यासमोर वाढले, आणि त्यांनी ते खाल्ले आणि याहवेहच्या वचनानुसार काही शिल्लक देखील उरले.

  22. 2 राजे ५:१सुमारे इ.स.पू. ८९४

    नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग झाला होता.

  23. 2 राजे ५:२सुमारे इ.स.पू. ८९४

    आता अरामातून टोळी बाहेर गेली आणि त्यांनी इस्राएलातील एका लहान मुलीला गुलाम म्हणून नेले आणि ती नामानाच्या पत्नीची सेवा करू लागली.

  24. 2 राजे ५:३सुमारे इ.स.पू. ८९४

    एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.”

  25. 2 राजे ५:४सुमारे इ.स.पू. ८९४

    ही इस्राएली मुलगी काय म्हणते हे नामानाने जाऊन राजाला सांगितले.