मुख्य मजकुरावर जा

Canaan

76 verses · 4 known names

हे नावानेही ओळखले जाते: Canaanitish, Chanaan, city

31.6900, 34.8400 गूगल नकाशावर पाहा

Canaan चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जेव्हा तुम्ही यार्देन पार करून कनानमध्ये जाल,

  2. या आश्रयाच्या नगरांपैकी तीन नगरे यार्देनेच्या अलीकडे व तीन कनानमध्ये असावीत.

  3. “तू मोआब देशात यरीहो पलीकडे असलेल्या अबारीम पर्वतातील नबो शिखराकडे जा, त्याच्यावर चढून समोर पसरलेला जो देश मी इस्राएली लोकांना त्यांचे स्वतःचे वतन म्हणून देणार आहे, त्या कनान देशाकडे नजर टाक.

  4. त्यांनी त्या जमिनीतून उगविलेले धान्य खाल्ले त्याच्या दुसर्‍या दिवसापासून मान्ना मिळण्याचे थांबले; तिथून पुढे इस्राएली लोकांना कोणताही मान्ना मिळाला नाही, परंतु त्या वर्षी त्यांनी कनानमधील उपज खाल्ला.

  5. एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या गोत्राच्या कुलप्रमुखांनी इस्राएली लोकांना कनान देशातील हे भाग वतन म्हणून दिले.

  6. आणि कनानातील शिलोह येथे त्यांना म्हणाले, “याहवेहने मोशेद्वारे आज्ञा दिली होती की तुम्ही आम्हाला राहण्यासाठी नगरे व आमच्या गुरांसाठी कुरणे द्यावीत.”

  7. तेव्हा रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी गिलआद, जो प्रदेश त्यांना याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेकडून मिळाला होता, त्याकडे परत जाताना कनानातील शिलोह येथे इस्राएली लोकांचा निरोप घेतला.

  8. जेव्हा ते कनान देशातील यार्देन जवळील गलीलोथ येथे आले तेव्हा रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी यार्देनजवळ एक खूप मोठी वेदी बांधली.

  9. आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले,

  10. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्‍यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला.

  11. परंतु तुमचा पिता अब्राहामाला मी फरात नदीपलीकडील देशातून आणले व कनान देशात सर्वत्र फिरविले व त्याला अनेक वंशज दिले, मी त्याला इसहाक दिला,

  12. कनानमधील युद्धांमध्ये भाग न घेतलेल्या इस्राएली लोकांची परीक्षा घेण्यासाठी याहवेहने या राष्ट्रांना त्या देशात राहण्याची परवानगी दिली

  13. म्हणून याहवेहने त्यांना कनानातील हासोर येथील राजा याबीनच्या हाती दिले. त्याच्या सैन्याचा सेनापती सिसेरा हा हरोशेथ-हग्गोईम येथे राहणारा होता.

  14. त्या दिवशी परमेश्वराने कनानाचा राजा याबीनास इस्राएलसमोर पराजित केले.

  15. इस्राएली लोकांचे वर्चस्व अधिकाधिक प्रबळ होत गेले आणि शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीनचा नाश केला.

  16. “राजे आले, ते लढले, कनानाचे राजे लढले, मगिद्दोच्या झर्‍याजवळ तानख येथे लढले, त्यांनी चांदीची लूट घेतली नाही.

  17. त्यांना याबेश-गिलआद येथे राहणार्‍या लोकांमध्ये चारशे तरुण स्त्रिया आढळल्या ज्या कधीही पुरुषांसोबत निजल्या नव्हत्या आणि त्यांनी त्यांना कनान देशातील शिलोह येथील छावणीत आणले.

  18. “मी तुम्हाला कनान देश तुमचे वतन म्हणून देईन.”

  19. “मी तुम्हाला कनान देश तुमचे वतन म्हणून देईन.”

  20. निष्पाप मुलामुलींचे नरबळी दिले, कनानाच्या मूर्तींना अर्पणे वाहिली, आणि त्यांचे रक्त सांडून त्यांनी ती भूमी अपवित्र केली.

  21. अमोरी लोकांचा राजा सीहोन, बाशानचा राजा ओग आणि कनानाच्या सर्व राजाचा त्यांनी वध केला.

  22. त्या दिवशी इजिप्तमधील पाच शहरे कनान देशाची भाषा बोलतील आणि सर्वसमर्थ याहवेह यांच्याबरोबर एकनिष्ठतेची शपथ घेतील. त्यापैकी एकाला सूर्याचे शहर म्हटले जाईल.

  23. याहवेहनी त्यांचा हात समुद्रापलीकडे लांबविला आहे, आणि तिच्या राज्यांना थरकाप आणला आहे. त्यांनी कनानच्या संदर्भात आदेश दिले आहेत की, तिचे किल्ले नष्ट केले जावे.

  24. हे करेथीयाच्या लोकांनो, समुद्र किनार्‍यावरील रहिवाशांनो तुम्हाला धिक्कार असो; कनान देशात राहणार्‍या पलिष्टी लोकांनो, याहवेहचे वचन तुमच्याविरुद्ध आहे. ते म्हणतात, “मी तुमचा असा नाश करेन, की तुमच्यातील कोणीही वाचणार नाही.”

  25. “तेव्हा इजिप्त आणि कनान देशामध्ये दुष्काळ पडला आणि सर्वठिकाणी हाहाकार माजला, तेव्हा आपल्या पूर्वजांना अन्न मिळेना.