मुख्य मजकुरावर जा

Saul

265 वचने · 11 कुटुंब सदस्य

Saul चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसविलेस आणि त्याने पळून जावे म्हणून तू माझ्या शत्रूला का जाऊ दिलेस?” मीखल त्याला म्हणाली, “मला तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, मी तुला का मारावे?’ ”

  2. जेव्हा दावीद निसटून पळाला तेव्हा तो रामाह येथे शमुवेलकडे गेला आणि शौलाने त्याच्याशी केले ते सर्वकाही त्यांना सांगितले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले.

  3. दावीद रामाहतील नायोथ येथे असल्याचे शौलाला कळले;

  4. तेव्हा त्याने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, परंतु जेव्हा त्यांनी संदेष्ट्यांचा घोळका भविष्यवाणी करीत आणि शमुवेल त्यांचा पुढारी म्हणून तिथे उभा आहे असे पाहिले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा शौलाच्या माणसांवर आला आणि ते सुद्धा भविष्यवाणी करू लागले.

  5. जे झाले याविषयी शौलाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने अजून माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली. शौलाने तिसर्‍यांदा माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली.

  6. त्याने आपली वस्त्रे काढली आणि शमुवेलपुढे भविष्यवाणी करू लागला. तो संपूर्ण दिवस व ती रात्र शौल विवस्त्र पडून राहिला. त्यावरूनच लोक म्हणतात, “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?”

  7. राजा नेहमीप्रमाणे आसनावर योनाथानच्या समोरच्या भिंतीजवळ बसला होता आणि अबनेर शौलाच्या बाजूला बसला, परंतु दावीदाचे आसन रिकामेच होते.

  8. शौल त्या दिवशी काही बोलला नाही, कारण त्याला वाटले, “दावीदाला काहीतरी झाल्यामुळे तो विधीनुसार अशुद्ध झाला असेल; खात्रीनेच तो अशुद्ध आहे.”

  9. परंतु दुसर्‍या दिवशी, त्या महिन्याच्या दुसर्‍या दिवशी दावीदाचे स्थान पुन्हा रिकामे होते. तेव्हा शौलाने त्यांचा पुत्र योनाथान याला विचारले, “इशायाचा पुत्र काल आणि आजही भोजनास का आला नाही?”

  10. योनाथानने शौलास उत्तर दिले, “दावीदाने बेथलेहेमला जाण्यासाठी मला आग्रहाने परवानगी मागितली.

  11. शौलाचा राग योनाथानवर भडकला आणि तो त्याला म्हणाला, “भ्रष्ट आणि फितुरी स्त्रीच्या मुला! तू तुझ्या स्वतःची व जिने तुला जन्म दिला त्या तुझ्या आईची बेअब्रू करून त्या इशायच्या पुत्राच्या बाजूने आहेस हे मला माहीत नाही काय?

  12. योनाथानने आपला पिता शौल याला विचारले, “त्याला मारून टाकावे असे त्याने काय केले आहे?”

  13. परंतु शौलाने योनाथानला मारण्यासाठी त्याच्यावर भाला फेकला. तेव्हा योनाथानला समजले की दावीदाला मारावे असा संकल्प त्याच्या पित्याने केला आहे.

  14. त्या दिवशी शौलाचा एक सेवक तिथे होता, ज्याला याहवेहसमोर थांबवून ठेवले गेले होते; तो शौलाचा मुख्य मेंढपाळ दवेग, एदोमी प्रांतातील होता.

  15. त्या दिवशी दावीद शौलापासून पळाला आणि गथचा राजा आखीशकडे गेला.

  16. परंतु आखीशाचे सेवक त्याला म्हणाले, “हा दावीद, या देशाचा राजा नाही काय? ज्याच्याविषयी त्यांनी असे म्हणून गाईले व नाचले तो हाच नाही काय: “शौलाने हजारांना वधले, आणि दावीदाने दहा हजार वधले?”

  17. आता शौलाने ऐकले की, दावीद आणि त्याच्या माणसांचा शोध लागला आहे. तेव्हा शौल हातात भाला घेऊन, गिबियाह येथील टेकडीवर चिंचेच्या झाडाखाली बसला, त्याचे सर्व अधिकारी त्याच्या सभोवती उभे राहिले.

  18. शौल त्यांना म्हणाला, “बिन्यामीन पुरुषांनो, ऐका! इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांना शेते आणि द्राक्षमळे देणार काय? तो तुम्हाला हजारांचे किंवा शंभरांचे सेनापती करणार काय?

  19. परंतु शौलाच्या अधिकार्‍यांबरोबर उभा असलेला दवेग एदोमी म्हणाला, “मी नोब येथे इशायच्या पुत्राला अहीतूब याचा पुत्र अहीमेलेख याच्याकडे येताना पाहिले.

  20. शौल म्हणाला, “अहीतूबच्या पुत्रा, ऐक.” तो उत्तरला, “होय, माझ्या धन्या.”

  21. शौल त्याला म्हणाला, “तू माझ्याविरुद्ध कट का केलास, तू इशायच्या पुत्राला भाकर आणि तलवार देऊन त्याच्यासाठी परमेश्वराकडे चौकशी केली, ज्यामुळे त्याने माझ्याविरुद्ध बंड केले आहे आणि तो आज माझ्यासाठी दबा धरून बसला आहे?”

  22. अबीयाथारने दावीदाला सांगितले की, शौलाने याहवेहच्या याजकांना मारून टाकले आहे.

  23. तेव्हा दावीद अबीयाथारला म्हणाला, “त्या दिवशी, एदोमी दवेग तिथे होता, मला माहीत होते की, तो नक्कीच शौलाला सांगेल. तुझ्या सर्व घराण्याच्या मृत्यूस मी जबाबदार आहे.

  24. शौलाला कोणी सांगितले की, दावीद कईलाह येथे गेला आहे आणि तो म्हणाला, “परमेश्वराने त्याला माझ्या हाती दिले आहे, कारण ज्या नगरास वेशी व भिंती आहेत त्यात जाऊन दावीदाने स्वतःला कैद करून घेतले आहे.”

  25. तेव्हा कईलाहास जाऊन दावीदाला व त्याच्या माणसांना वेढावे म्हणून शौलाने त्याच्या संपूर्ण सैन्याला युद्धासाठी बोलाविले.