मुख्य मजकुरावर जा

Saul

265 वचने · 11 कुटुंब सदस्य

Saul चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीद यहूदीयातील बेथलेहेम येथील एफ्राथी गोत्रातील इशायाचा पुत्र होता. इशायला आठ पुत्र होते आणि शौल राजाच्या कारकिर्दीत तो खूप वृद्ध झाला होता.

  2. इशायाचे तीन थोरले पुत्र; प्रथमपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्माह हे युद्धासाठी शौलाच्या सेवेत गेले होते.

  3. दावीद सर्वांहून धाकटा होता. थोरले तीन शौलाबरोबर गेले,

  4. परंतु दावीद बेथलेहेमात आपल्या वडिलांची मेंढरे चारण्यासाठी शौलाकडून जात येत असे.

  5. ते शौल आणि सर्व इस्राएली लोकांबरोबर एलाहच्या खोर्‍यामध्ये पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करीत आहेत.”

  6. दावीद जे बोलला ते कोणी ऐकले व ते शौलाला कळविले, तेव्हा शौलाने त्याला बोलावून घेतले.

  7. दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.”

  8. शौलाने दावीदाला उत्तर दिले, “या पलिष्ट्यांविरुद्ध लढण्यास तू सक्षम नाहीस; तू केवळ कोवळा तरुण आहेस आणि तो त्याच्या तारुण्यापासून योद्धा आहे.”

  9. परंतु दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक त्याच्या वडिलांची मेंढरे राखीत असताना, एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन त्याने कळपातील मेंढरू उचलून घेतले,

  10. ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.” शौल दावीदाला म्हणाला, “जा, याहवेह तुझ्याबरोबर असो.”

  11. शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला.

  12. दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला. तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला.

  13. शौलाने दावीदाला पलिष्ट्याशी युद्ध करण्यास जाताना पाहिले, तेव्हा त्याने सेनापती अबनेर याला विचारले, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे?” अबनेरने उत्तर दिले, “महाराज चिरायू होवो, मला माहीत नाही.”

  14. दावीदाने त्या पलिष्ट्याला मारल्यावर परत येताच, अबनेरने त्याला शौलाकडे आणले, त्या पलिष्ट्याचे शिर अजूनही दावीदाच्या हातात होते.

  15. शौलाने दावीदाला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र आहेस?” दावीद म्हणाला, “आपला सेवक इशाय बेथलेहेमकर याचा मी पुत्र आहे.”

  16. दावीदाने शौलाशी आपले संभाषण संपविले, तेव्हा योनाथानचा जीव दावीदाशी जडला आणि जशी स्वतःवर तशी प्रीती त्याने दावीदावर केली.

  17. त्या दिवसापासून शौलाने दावीदाला आपल्याजवळ ठेवले व त्याला त्याच्या पित्याच्या घरी जाऊ दिले नाही.

  18. शौलाने दावीदाला कोणत्याही कामगिरीवर पाठविले तरी त्यात दावीद यशस्वी होत असे, म्हणून शौलाने त्याला आपल्या सैन्यात उच्च हुद्दा दिला. ते सर्व सैनिकांना व शौलाच्या अधिकार्‍यांनाही आवडले.

  19. दावीदाने पलिष्टी गल्याथाला ठार मारल्यानंतर ज्यावेळी लोक परत घरी येत होते, त्यावेळी इस्राएलच्या सर्व नगरांतून प्रत्येक गावातून स्त्रिया गात व नाचत आणि हर्षाने डफ व झांजा वाजवित शौल राजाला भेटायला आल्या.

  20. नाचत असताना त्यांनी गीत गाईले: “शौलाने त्याच्या हजारास वधले, दावीदाने त्याचे दहा हजार वधले.”

  21. यामुळे शौल अतिशय रागावला; गीतांच्या या ओळींनी तो असंतुष्ट झाला. तो म्हणाला, “त्यांनी दावीदाला दहा हजारांचे श्रेय दिले आणि मला केवळ हजारांचे. राज्यावाचून त्याला आणखी काय मिळायचे राहिले?”

  22. आणि तेव्हापासून शौलाने दावीदावर पाळत ठेवली.

  23. दुसर्‍या दिवशी परमेश्वराकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर जोराने उतरला, तेव्हा तो आपल्या घरात भविष्यवाणी करू लागला. दावीद रोजच्याप्रमाणे आपली वीणा वाजवित होता व शौलाच्या हाती भाला होता

  24. “मी दावीदाला भिंतीशी खिळून टाकीन” असे म्हणत शौलाने भाला फेकला, परंतु दावीदाने त्याला दोनदा चुकविले.

  25. शौलाला दावीदाची भीती वाटत होती, कारण याहवेह त्याच्याबरोबर होते परंतु शौलाला याहवेहने सोडले होते.