मुख्य मजकुरावर जा

Saul

265 वचने · 11 कुटुंब सदस्य

Saul चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु शौलाने व त्याच्या सैन्याने अगाग राजाला जिवंत ठेवले, तसेच उत्तम मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे व कोकरे; व सर्वकाही जे चांगले होते त्यांचा नाश करावा असे त्यांना वाटले नाही, म्हणून त्यांनी ते राखून ठेवले. मात्र जे टाकाऊ व कुचकामी होते त्यांचा त्यांनी नाश केला.

  2. “मी शौलास राजा केले याबद्दल मला पश्चाताप होत आहे, कारण तो माझ्यापासून फिरला आहे आणि त्याने माझ्या आज्ञांचे पालन केले नाही.” शमुवेल फार संतापला आणि रात्रभर याहवेहकडे रडला.

  3. सकाळी, अगदी पहाटे उठून शमुवेल शौलाला भेटायला निघाला, पण त्याला कोणी सांगितले, “शौल कर्मेलास गेला आहे. तिथे त्याने आपल्या स्वतःच्या आदरार्थ एक स्तंभ उभारला आहे आणि तिथून पुढे तो खाली गिलगालास गेला आहे.”

  4. जेव्हा शमुवेलने शौलाला गाठले, शौल म्हणाला, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो! मी याहवेहच्या सूचना पार पाडल्या आहेत.”

  5. शौलाने उत्तर दिले, “सैन्याच्या लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; त्यांनी उत्तम मेंढरे व गुरे याहवेह तुमचा परमेश्वर यांच्या यज्ञासाठी राखून ठेवले आहेत, परंतु बाकीच्या सर्वांचा आम्ही पूर्णपणे नाश केला आहे.”

  6. तेव्हा शमुवेल शौलास म्हणाले, “पुरे! काल रात्री याहवेहने मला काय सांगितले ते मी तुला सांगतो.” “सांगा,” शौल म्हणाला.

  7. शौल शमुवेलला म्हणाला, “पण मी याहवेहचे आज्ञापालन केले, याहवेहने मला दिलेल्या कामगिरीवर मी गेलो, अमालेक्यांचा मी पूर्णपणे नाश केला आणि अगाग त्यांचा राजा याला मी घेऊन आलो.

  8. शौल शमुवेलास म्हणाला, “मी पाप केले आहे, मी याहवेहच्या आज्ञेचा व तुमच्या सूचनांचा भंग केला आहे; मला लोकांचे भय वाटले, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकले.

  9. परंतु शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही. तू याहवेहच्या वचनाचा धिक्कार केला आहे आणि याहवेहनेही तुला इस्राएलचा राजा म्हणून धिक्कारले आहे.”

  10. तेव्हा शमुवेल शौलाबरोबर परत गेले आणि शौलाने याहवेहची उपासना केली.

  11. नंतर शमुवेल रामाह येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिबियाहकडे परतला.

  12. शमुवेल आपल्या मरण्याच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला गेला नाही, परंतु शमुवेलने त्याच्यासाठी शोक केला. आणि आपण शौलाला इस्राएलवर राजा केले म्हणून याहवेहला पश्चाताप झाला.

  13. याहवेह शमुवेलला म्हणाले, “मी शौलाला इस्राएलाचा राजा म्हणून नाकारले आहे, तर तू कुठवर त्याच्यासाठी शोक करीत राहणार? तुझे शिंग तेलाने भर आणि चल; मी तुला बेथलेहेमकर इशाय याच्याकडे पाठवित आहे. मी त्याच्या एका पुत्राला राजा म्हणून निवडले आहे.”

  14. परंतु शमुवेल म्हणाला, “मी कसे जाऊ? जर शौलाने याविषयी ऐकले, तर तो मला जिवे मारेल.” याहवेह म्हणाले, “तुझ्यासोबत एक कालवड घे आणि सांग, ‘मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे.’

  15. आता याहवेहचा आत्मा शौलापासून निघून गेला होता आणि याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा त्याला बाधा करू लागला.

  16. शौलाच्या सेवकांनी त्याला म्हटले, “पाहा, परमेश्वराकडून पाठविलेला हा दुष्ट आत्मा तुम्हाला बाधा करीत आहे.

  17. तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एक चांगला वीणावादक शोधून त्याला माझ्याकडे आणा.”

  18. तेव्हा शौलाने इशायाकडे निरोप पाठवून म्हटले, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत आहे त्याला माझ्याकडे पाठव.”

  19. तेव्हा इशायाने आपला पुत्र दावीदाबरोबर भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू लादलेले एक गाढव शौलाकडे पाठविले.

  20. दावीद शौलाकडे आला व त्याच्या सेवेस हजर झाला. शौलाला तो अतिशय आवडला व दावीद त्याचा एक शस्त्रवाहक झाला.

  21. नंतर शौलाने इशायला संदेश पाठवून सांगितले, “दावीदाला माझ्या सेवेत असू दे. कारण मी त्याच्यावर प्रसन्न आहे.”

  22. ज्या ज्यावेळी परमेश्वराकडून पाठविलेला दुष्ट आत्मा शौलावर येई, त्यावेळी दावीद आपली वीणा घेऊन वाजवित असे, तेव्हा शौलाला बरे वाटत असे, आणि दुष्ट आत्मा शौलाला सोडून जात असे.

  23. शौल आणि इस्राएली लोक जमले आणि त्यांनी एलाहच्या खोर्‍यात छावणी दिली आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी सेनेचे नियोजन केले.

  24. गल्याथ उभा राहिला आणि इस्राएली सैन्याला ओरडून म्हणाला, “तुम्ही युद्ध रचण्यासाठी बाहेर येऊन का उभे आहात? मी पलिष्टी नाही काय आणि तुम्ही शौलाचे चाकर नाहीत काय? तुमच्यातील एक मनुष्य निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे.

  25. पलिष्ट्याचे हे शब्द ऐकून शौल आणि सर्व इस्राएली लोक घाबरून गेले.