मुख्य मजकुरावर जा

Saul

265 वचने · 11 कुटुंब सदस्य

Saul चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा शौलाने त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला आणि तो क्रोधाने पेटला.

  2. त्याने बैलाची एक जोडी कापून त्यांचे तुकडे केले आणि निरोप्यांच्या हाती ते तुकडे सर्व इस्राएलमध्ये पाठविले आणि जाहीर केले, “जे कोणी शौल आणि शमुवेल यांचे अनुसरण करणार नाही, त्यांच्या बैलांचे असेच केले जाईल.” तेव्हा लोकांना याहवेहचे भय वाटू लागले आणि ते एकजूट होऊन बाहेर आले.

  3. दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले.

  4. तेव्हा लोक शमुवेलास म्हणाले, “ते कोण होते ज्यांनी विचारले होते, ‘शौल आमच्यावर राज्य करेल काय?’ त्या माणसांना आमच्याकडे आणा, म्हणजे आम्ही त्यांना जिवे मारू.”

  5. परंतु शौल म्हणाला, “आज कोणालाही जिवे मारले जाणार नाही, कारण आज याहवेहने इस्राएलची सुटका केली आहे.”

  6. तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले आणि त्यांनी याहवेहच्या उपस्थितीत शौलाला राजा केले. तिथे त्यांनी याहवेहसमोर शांत्यर्पणाचे यज्ञ केले आणि शौलाने आणि सर्व इस्राएली लोकांनी मोठा उत्सव साजरा केला.

  7. शौल राजा झाला तेव्हा तो तीस वर्षांचा होता आणि त्याने बेचाळीस वर्षे इस्राएलवर राज्य केले.

  8. शौलाने इस्राएलमधून तीन हजार पुरुष निवडले. दोन हजार त्याच्याजवळ मिकमाश येथे आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये होते आणि एक हजार बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे योनाथान बरोबर होते. बाकीच्या पुरुषांना त्याने आपआपल्या घरी पाठवून दिले.

  9. गेबा येथील पलिष्ट्यांच्या ठाण्यावर योनाथानने हल्ला केला आणि पलिष्ट्यांनी याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने संपूर्ण प्रदेशामधून रणशिंग वाजवित म्हटले, “इब्री लोकांनो, ऐका!”

  10. तेव्हा इस्राएली लोकांनी ही बातमी ऐकली: “शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर हल्ला केला आहे आणि पलिष्ट्यांसमोर इस्राएली लोक घृणित ठरले.” म्हणून लोकांना गिलगाल येथे शौलाबरोबर येण्यासाठी बोलाविण्यात आले.

  11. काही इब्री लोक तर यार्देनपासून गाद आणि गिलआदापलिकडे गेले. परंतु शौल गिलगालातच राहिला आणि जे लोक त्याच्याबरोबर होते ते भीतीने कंपित झाले होते.

  12. तेव्हा तो म्हणाला, “होमार्पण आणि शांत्यर्पणे माझ्याकडे आणा.” आणि शौलाने होमार्पण केले.

  13. त्याने होमार्पणाची समाप्ती करताच शमुवेल आला आणि शौल त्याला अभिवादन करण्यास बाहेर गेला.

  14. तेव्हा शमुवेलने विचारले, “तू हे काय केले आहेस?” शौलाने उत्तर दिले, “जेव्हा मी पाहिले की, लोक निघून जात आहेत आणि ठरविलेल्या वेळात तुम्ही आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिकमाश येथे जमत होते,

  15. शमुवेल शौलास म्हणाला, “तू मूर्खपणा केला आहे, याहवेह तुझ्या परमेश्वरांनी दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही; जर पालन केले असते तर इस्राएलवरील तुझे राज्य याहवेहने सर्वकाळासाठी स्थापले असते.

  16. नंतर शमुवेलने गिलगाल सोडले व बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे गेला, आणि शौलाने त्याच्याबरोबर असलेल्या पुरुषांची मोजणी केली. त्यांची संख्या सुमारे सहाशे होती.

  17. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि त्यांच्याबरोबर असलेले पुरुष बिन्यामीन प्रांतामध्ये गेबा येथे राहिले. आणि पलिष्टी लोकांनी मिकमाश येथे तळ दिला.

  18. म्हणून लढाईच्या दिवशी शौल आणि योनाथान यांच्याबरोबर असलेल्या कोणाही सैनिकांच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; केवळ शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याकडेच हत्यारे होती.

  19. एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण पलिष्ट्यांच्या चौकीच्या पलीकडील बाजूला जाऊ.” परंतु त्याने त्याच्या वडिलांना हे सांगितले नाही.

  20. शौल गिबियाहच्या बाहेरील हद्दीवर मिग्रोन येथे डाळिंबांच्या झाडाखाली राहत होता. त्याच्याबरोबर सहाशे लोक होते.

  21. इकडे बिन्यामीनच्या गिबियाहतील शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले की सैन्य विखरून सर्व दिशेने धावत जात आहे.

  22. तेव्हा शौलाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची हजेरी घ्या आणि आम्हाला कोण सोडून गेला आहे ते पाहा.” त्यांनी हजेरी घेतली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तिथे नव्हते.

  23. शौल अहीयाहला म्हणाला, “परमेश्वराचा एफोद इकडे आण,” (कारण त्यावेळी तो इस्राएली लोकांसोबत होता.)

  24. शौल याजकांबरोबर बोलत असताना, पलिष्ट्यांच्या छावणीतील गोंधळ अधिकच वाढत गेला. तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “थांब!”

  25. तेव्हा शौल व त्याचे लोक एकत्र जमा होऊन युद्धास निघाले. त्यांना पलिष्टी लोक मोठ्या गोंधळात, त्यांच्याच तलवारीने एकमेकास मारत असलेले दिसले.