- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Levi
Levi चा उल्लेख असलेली वचने
अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला.
याच ठिकाणी याहवेहने लेवीच्या गोत्रास याहवेहच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी, त्याचप्रमाणे याहवेहच्या समोर उभे राहून त्यांची सेवा करण्यास व त्यांच्या नावाने आशीर्वाद देण्यास नेमले, जसे आजपर्यंत चालत आले आहे.
म्हणून लेवी वंशजांना वचनदत्त देशात त्यांच्या बंधुवंशजांप्रमाणे वाटा किंवा वतन मिळालेले नाही, कारण याहेवह तुमच्या परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे याहवेह स्वतःच त्यांचे वतन आहेत.)
लेवी याजकांना—अर्थात् संपूर्ण लेवी गोत्राला—इतर गोत्रांप्रमाणे इस्राएलात वाटा किंवा वतन नाही. ते याहवेहला केलेल्या होमार्पणावर जगतील, कारण हेच त्यांचे वतन आहे.
यानंतर लेवी वंशातील याजक जवळ येतील, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आपल्यासमोर सेवा करण्यासाठी याहवेहच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी व वाद आणि हल्ला यांचे निर्णय घेण्यासाठी निवडलेले आहे.
तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.
नंतर मोशेने हे संपूर्ण नियमशास्त्र लिहिले आणि याहवेहच्या कराराचे कोश वाहणाऱ्या लेवीय याजकांना आणि इस्राएली लोकांच्या वडीलजनांना दिले.
मग तो लेवी विषयी म्हणाला: “तुमचे उरीम व थुम्मीम, तुमच्या विश्वसनीय लोकांच्या अधिकारात कायम राहोत. ज्यांची तुम्ही मस्सा येथे परीक्षा घेतली; आणि मरीबाहच्या झर्याजवळ तुम्ही त्यांच्याशी झुंज दिली.
परंतु लेवीच्या गोत्रास त्याने कोणतेही वतन दिले नाही, कारण याहवेहने त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, इस्राएलचे परमेश्वर याहवेहना वाहिलेली अन्नार्पणे हे त्यांचे वतनभाग आहेत.
परंतु लेवी गोत्राला मोशेने कोणतेही वतन दिले नाही, कारण त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, याहवेह इस्राएलचे परमेश्वरच त्यांचे वतन आहेत.
अहरोनाचे वंशज जे लेवीच्या गोत्रातील कोहाथी कुळाचे होते, त्यांची चिठ्ठी पहिली निघाली होती. त्यांना जी नगरे मिळाली ती ही:
यरोबोअमने उच्च स्थानावर मंदिरे बांधली आणि जरी ते लेवी घराण्यातील नव्हते, प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून याजक नेमले.
इस्राएलचे पुत्र: रऊबेन, शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून,
लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.
लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.
जो इसहारचा पुत्र, जो कोहाथचा पुत्र, जो लेवीचा पुत्र, आणि जो इस्राएलचा पुत्र.
जो यहथाचा पुत्र, जो गेर्षोमचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र,
जो महलीचा पुत्र, जो मूशीचा पुत्र, जो मरारीचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र.
आजवर ते राजाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर कार्यरत आहेत; लेवींच्या छावणीचे द्वारपाल हेच होते.
लेव्यातील 4,600,
या गणतीमध्ये त्याने लेवी व बिन्यामीन वंशजांचा समावेश केला नाही, कारण राजाने सांगितलेल्या या कामाचा योआबाला वीट आला होता.
नंतर दावीदाने लेवींची विभागणी करून त्यांचे त्यांच्या संततीनुसार भाग पाडले: गेर्षोन, कोहाथ व मरारी.
परमेश्वराचा मनुष्य मोशे याच्या पुत्रांचाही समावेश लेवीच्या गोत्रात केला होता.
लेव्याच्या शिरगणतीमधील सर्व लेवी पुरुष—ज्या कुटुंब प्रमुखांची नावे समाविष्ट केली व त्यांची नावनोंदणी झाली, जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते, त्या सर्वांना याहवेहच्या मंदिरात सेवाकार्य दिले गेले.
लेवी वंशातील बाकीची संतती पुढीलप्रमाणे होती: अम्रामाचे पुत्र: शूबाएल; शूबाएलाचे पुत्र: यहदायाह.