मुख्य मजकुरावर जा

Levi

64 वचने · 18 कुटुंब सदस्य

Levi चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अहवाकडे जाणाऱ्या कालव्याजवळ मी सर्वांना एकत्र केले आणि तिथे तीन दिवस आम्ही तळ दिला. तिथे आलेल्या लोकांची व याजकांची पाहणी केली, तेव्हा लेवी वंशातील कोणीही मला आढळला नाही.

  2. परमेश्वराच्या कृपेचा हात आमच्यावर असल्याने त्यांनी आम्हाकडे इस्राएलचा पुत्र लेवीचा वंशज, महलीचा पुत्र शेरेब्याह नावाचा एक सुज्ञ मनुष्य पाठविला. त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व भाऊ मिळून एकूण 18 जण होते.

  3. इस्राएली लोकांनी व लेवी यांनी धान्य, नवा द्राक्षारस, जैतुनाचे तेल, यांची अर्पणे कोठारात आणून ती सेवा करणारे याजक, द्वारपाल आणि संगीतकार यांच्या वापरासाठी असलेल्या पवित्र पात्रांमध्ये ठेवावीत. “अशा रीतीने आम्ही परमेश्वराच्या भवनाकडे दुर्लक्ष करणार नाही.”

  4. इतिहासाच्या पुस्तकामध्ये एल्याशीबाचा पुत्र योहानानच्या काळापर्यंत लेवींच्या वंशजांची नावे नमूद केली होती.

  5. अहो, लेवीच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा; त्यांचे भय धरणार्‍या लोकांनो, याहवेहचे स्तवन करा.

  6. आणि उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे. हे सादोकचे पुत्र आहेत, केवळ तेच लेवी आहेत, जे याहवेहची सेवा करताना याहवेहसमोर येऊ शकतात.”

  7. शहराची द्वारे इस्राएल गोत्रांच्या नावानुसार असतील. उत्तरेकडील तीन द्वारे असतीलः रऊबेनचे द्वार, यहूदाहचे द्वार आणि लेवीचे द्वार असणार.

  8. लेवी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, शिमी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी,

  9. आणि मग तुम्हाला समजेल की मी तुम्हाला हा सावधानतेचा इशारा दिला आहे, जेणेकरून लेवी वंशाशी माझा करार कायम राहील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  10. पण तुम्ही पथभ्रष्ट झाला आहात व तुमच्या शिक्षणामुळे अनेकजण अडखळून पडले आहेत; तुम्ही लेव्याचा करार विपरीत केला आहे,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  11. रुपे शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील,

  12. लेवीच्या गोत्रातील, ज्यांना याजकपण प्राप्त होत असते त्यांना लोकांपासून, म्हणजे जे अब्राहामाच्या वंशजाचे आहेत अशा इस्राएली बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दहावा भाग गोळा करता येतो.

  13. दशांश गोळा करणार्‍या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशांश दिला असेही एखाद्याला म्हणता येईल.

  14. शिमोन वंशातून 12,000; लेवी वंशातून 12,000; इस्साखार वंशातून 12,000;