- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
God
God चा उल्लेख असलेली वचने
तरी आपल्याला एकच परमेश्वर, पिता ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि त्यांच्यासाठी आम्ही जगतो; आणि एकच प्रभू, येशू ख्रिस्त ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि ज्यांच्याद्वारे आपण जगतो.
परंतु अन्न आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेत नाही; जर आपण खात नाही तर आपली हानी होत नाही आणि जर खातो तर काही अधिक चांगले होत नाही.
कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.” आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय?
ज्यांना नियमशास्त्र नाही, त्यांना जिंकून घेता यावे म्हणून मीही त्यांच्यासाठी नियमशास्त्र नसल्यासारखा झालो. परमेश्वराच्या नियमांपासून मी बंधमुक्त नाही परंतु ख्रिस्ताच्या नियमांनी बांधला गेलो आहे.
हे सर्व असूनही, परमेश्वर त्या बहुतेकांविषयी संतुष्ट नव्हते; त्यामुळे त्यांची शरीरे अरण्यात विखुरली गेली.
मनुष्यमात्रावर येणार्या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.
नाही! गैरयहूदी लोक परमेश्वराला यज्ञ अर्पण करीत नसून भुतांना अर्पण करतात आणि भुतांशी तुम्ही सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.
तुम्ही प्रभूचा प्याला आणि भुतांचा प्याला यातून एकाच वेळी पिऊ शकणार नाही. तसेच प्रभूचा मेज आणि भुतांचा मेज या दोन्हीमध्ये तुम्हाला एकाच वेळी सहभागी होता येत नाही.
कारण, “पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही प्रभूचे आहे.”
पण समजा, “हे यज्ञात वाहिलेले आहे” असे तुम्हाला कोणी सांगितले, तर ज्याने ही सूचना दिली त्याच्यासाठी व सदसद्विवेकबुद्धीसाठी तुम्ही ते खाऊ नये.
तुम्ही जे खाता किंवा पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठीच करावे.
यहूदी असोत की गैरयहूदी असोत किंवा परमेश्वराची मंडळी असो, कोणालाही तुमच्यामुळे अडखळण होऊ नये.
परंतु एक गोष्ट तुम्हाला समजावी अशी माझी इच्छा आहे, प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे आणि प्रत्येक स्त्रीचे मस्तक तिचा पती आहे, ख्रिस्ताचा मस्तक परमेश्वर आहे.
पुरुषाने आपले मस्तक झाकणे योग्य नाही, कारण तो परमेश्वराचे प्रतिरूप व गौरव आहे; परंतु स्त्री पुरुषाचे गौरव आहे.
कारण जशी स्त्री पुरुषापासून, त्याचप्रमाणे सर्व पुरुष स्त्रीपासूनच जन्मले, परंतु सर्वकाही परमेश्वरापासून आहे.
त्यासंबंधी तुम्हीच निर्णय घ्या: स्त्रीने आपले मस्तक आच्छादून न घेता परमेश्वराची प्रार्थना करणे योग्य आहे काय?
याबाबतीत कोणी वाद घालत असेल, तर आम्हामध्ये आणि परमेश्वराच्या सर्व मंडळ्यांमध्ये इतर रीत प्रचलित नाही.
तुम्ही एकत्र येता, तेव्हा ते केवळ प्रभुभोजन खाण्यासाठी नव्हे,
खाणेपिणे करण्यासाठी तुम्हाला स्वतःची घरे नाहीत काय? किंवा तुम्ही परमेश्वराच्या मंडळीचा अनादर करून ज्यांच्याजवळ काहीच नाही, त्यांना लाजविता काय? मी तुम्हाला काय म्हणावे? मी तुमची प्रशंसा करावी काय? याबाबतीत अजिबात नाही.
कारण ज्यावेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे पुनरागमन होईपर्यंत प्रभूच्या मृत्यूची घोषणा करता.
जो ख्रिस्ताचे मंडळीरूपी शरीर न ओळखता अयोग्य प्रकारे ही भाकर खातो आणि हा प्याला पितो, तो स्वतःवर न्याय ओढवून घेतो.
याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही “येशू शापित असो” असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, “येशू प्रभू आहे” असेही म्हणणार नाही.
कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत.
परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे.
सुरूप दिसणार्या अवयवांची अशी काळजी घेण्याची गरज नसते. म्हणून परमेश्वराने आपल्या शरीराचे निरनिराळे भाग अशा रीतीने जोडले आहेत की जे भाग एरवी कमी महत्त्वाचे वाटतात, त्यांचा मोठा सन्मान केला जावा.