मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण या जगाचे ज्ञान परमेश्वराच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. असे लिहिले आहे: “ते ज्ञानी लोकांना त्यांच्याच धूर्तपणात पकडतात,”

  2. पण तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त परमेश्वराचे आहेत.

  3. ख्रिस्ताचे सेवक आणि परमेश्वराने जे गुप्त रहस्य प्रकट केले आहे त्याचे कारभारी असे आम्हाला समजावे.

  4. यास्तव निवडलेल्या समयापूर्वी व प्रभूच्या आगमनापूर्वी कशाचाही न्याय करू नका. त्यावेळी ते अंधकारात लपलेले सत्य प्रकाशात आणतील व आपल्या अंतःकरणातील उद्देश उघड करेल आणि मग त्यावेळी प्रत्येकाला परमेश्वराकडून प्रशंसा मिळेल.

  5. इतक्यातच तुम्हाला जे हवे ते मिळाले आहे, इतक्यात धनवान झाला आहात, आम्हाला सोडून राज्य करीत आहात; तुम्ही राजे बनला असताच तर ठीक झाले असते, कारण आम्हीही तुम्हाबरोबर राजे झालो असतो.

  6. मला असे वाटते की परमेश्वराने आम्हा प्रेषितांना विजय यात्रेमध्ये, सर्वात शेवटच्या ठिकाणी मृत्युदंड नेमलेल्यांसारखे ठेवले आहे. आम्ही सर्व सृष्टी, मानव आणि देवदूतांपुढे एक मौज म्हणून झालो आहे.

  7. परमेश्वराचे राज्य बोलण्यात नव्हे परंतु सामर्थ्यात आहे.

  8. बाहेरच्या लोकांचा न्याय करणारे परमेश्वर आहेत. “या दुष्ट मनुष्याला तुमच्यामधून काढून टाका.”

  9. अशा वाईट गोष्टी करणार्‍यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. व्यभिचारी, मूर्तिपूजक, जारकर्मी आणि पुमैथुनी,

  10. चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर आणि दरोडेखोर यांनाही परमेश्वराच्या राज्यात वाटा मिळणार नाही.

  11. तुमच्यापैकी काहीजण अशा प्रकारचे होते, पण आता तुम्हाला धुऊन स्वच्छ करून पवित्र केलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला नीतिमान केले आहे.

  12. तुम्ही म्हणता, “अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी आहे, पण परमेश्वर या दोघांचाही नाश करतील.” शरीर लैंगिक अशुद्धतेसाठी नाही तर प्रभूसाठी आहे आणि प्रभू शरीरासाठी आहे.

  13. ज्याप्रमाणे प्रभूला परमेश्वराने आपल्या शक्तीने मरणातून उठविले, त्याप्रमाणेच तो आपल्यालाही उठवेल.

  14. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तेव्हा मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव घेऊन तो वेश्येशी एक करावा काय? कधीच नाही!

  15. तुमचे शरीर परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि ते तुमच्यामध्ये राहतात, हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही स्वतःचे नाही;

  16. कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुमच्या शरीराने परमेश्वराचे गौरव करा.

  17. माझी इच्छा अशी आहे की, जसा मी आहे तसे तुम्ही सर्वांनी असावे. परंतु प्रत्येकाला परमेश्वराकडून देणगी मिळालेली आहे; एकास एक देणगी तर दुसर्‍यास दुसरी देणगी.

  18. परंतु जर अविश्वासी व्यक्ती वेगळी होऊ इच्छित असेल तर तसे होऊ द्या. अशा परिस्थितीत भाऊ किंवा बहीण बांधलेले नाही; कारण परमेश्वराने आपल्याला पाचारण केले आहे ते यासाठी की आपण शांतीने राहावे.

  19. प्रत्येकाने विश्वासू व्यक्तीसारखे प्रभूने तुम्हाला ज्या स्थितीत ठेवले आहे व परमेश्वराने जसे पाचारण केले आहे तसे राहावे. सर्व मंडळ्यांसाठी माझा हाच नियम आहे.

  20. सुंतेचे काही महत्त्व नाही व असुंतेचेही नाही. परंतु परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हेच महत्त्वाचे आहे.

  21. जर कोणी गुलाम असताना, प्रभूने तुम्हाला विश्वासात पाचारण केले, तर तुम्ही प्रभूमध्ये स्वतंत्र केलेली व्यक्ती आहात. त्याचप्रमाणे, जो स्वतंत्र असून पाचारलेला आहे तो ख्रिस्ताचा गुलाम आहे.

  22. माझ्या बंधूंनो व भगिनींनो, प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने पाचारण केले होते तेव्हा ज्या स्थितीत ते होते त्याच स्थितीत त्यांनी परमेश्वराला जोडलेले असावे.

  23. पण माझ्या मते ती जशी आहे तशी राहिली तर ती अधिक सुखी होईल—आणि मला असे वाटते की माझ्यातही परमेश्वराचा आत्मा वास करतो.

  24. परंतु जो परमेश्वरावर प्रीती करतो, त्याला परमेश्वर ओळखतात.

  25. तर आता, मूर्तीना अर्पण केलेले अन्न यासंबंधी आपल्याला माहीत आहे, “या जगातील मूर्तीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व नाही” आणि “एका परमेश्वराशिवाय दुसरा परमेश्वर नाही.”