मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण असे लिहिले आहे: “ ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’ ‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ ”

  2. तर मग आपल्यातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल.

  3. परमेश्वराचे राज्य खाणे व पिणे यात नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे.

  4. कारण जो अशाप्रकारे ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला संतोष देणारा व मनुष्यांनी पारखलेला आहे.

  5. अन्नामुळे परमेश्वराच्या कामाचा नाश करू नका. सर्व अन्न शुद्धच आहे; परंतु जो व्यक्ती काहीही खाण्यामुळे इतरांना अडखळवितो त्याला ते वाईट आहे.

  6. तुझ्याठायी जो विश्वास आहे तो तू परमेश्वरासमक्ष आपणाजवळ ठेव. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी ज्याला स्वतःचा न्यायनिवाडा करावा लागत नाही तो धन्य,

  7. धीर व प्रोत्साहन देणारा परमेश्वर तुम्हाला एकमेकांबरोबर एकचित्ताने राहण्यास साहाय्य करो. प्रत्येकाने एकमेकांशी ख्रिस्त येशूंच्या ठायी असलेल्या वृत्तीने व विचाराने वागावे,

  8. आणि मग आपल्याला एकमनाने व एकसुराने, परमेश्वराचे म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे गौरव करता येईल.

  9. ख्रिस्ताने जसा तुमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा परमेश्वराच्या स्तुतीसाठी स्वीकार करा.

  10. कारण मी तुम्हाला सांगतो की, ख्रिस्त परमेश्वराचे सत्य प्रस्थापित करण्याकरिता यहूदीयांचे सेवक झाले आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेली अभिवचने पूर्ण करावी,

  11. म्हणजे गैरयहूदी लोकांनी परमेश्वराच्या दयेमुळे त्यांचे गौरव करावे. असे लिहिले आहे: “यास्तव गैरयहूदी लोकांमध्ये मी तुमचे स्तवन करेन; व तुमच्या नावाचे गुणगान गाईन.”

  12. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आशेचे परमेश्वर तुम्हाला सर्व आनंदाने आणि शांतीने भरो, यासाठी की तुमच्यामध्ये असणार्‍या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात विपुल आशेमध्ये तुम्ही वाढत जावे.

  13. त्यांची तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यावी म्हणून मी काही गोष्टींबद्दल धीटपणे लिहिले आहे, कारण परमेश्वराने मला कृपा दिली आहे

  14. की गैरयहूदीयांसाठी मी ख्रिस्त येशूंचा सेवक व्हावे. त्यांनी मला परमेश्वराची शुभवार्ता जाहीर करण्यासाठी याजकपण सोपविले आहे, यासाठी की गैरयहूदीयांना पवित्र आत्म्याने वेगळे केलेले व परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे.

  15. यास्तव मी परमेश्वराची सेवा ख्रिस्त येशूंद्वारे केली त्याबद्दल मी अभिमान बाळगतो.

  16. चिन्हे आणि झालेली अद्भुते पवित्र आत्म्याच्या शक्तीने झाली. अशा रीतीने मी यरुशलेमपासून तो इल्लूरिकमापर्यंत सर्वत्र ख्रिस्ताच्या शुभवार्तेची घोषणा पूर्णपणे केली आहे.

  17. बंधूंनो व भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि आत्म्याच्या प्रीतीद्वारे, मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्या संघर्षात सहभाग म्हणून परमेश्वराजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी.

  18. मी परमेश्वराच्या इच्छेने आनंदाने तुम्हाकडे येऊ शकेन आणि तुमच्या सहवासात ताजातवाना होऊ शकेन.

  19. आता शांतीचे परमेश्वर तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

  20. शांतीचा परमेश्वर लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली चिरडून टाकील. आपल्या प्रभू येशूंची कृपा तुम्हावर असो.

  21. पण आता संदेष्ट्यांनी लिहिलेल्या शास्त्राद्वारे प्रकट आणि जाहीर झालेली सार्वकालिक परमेश्वराची आज्ञा यांना अनुसरून सर्व गैरयहूदी लोकांनी विश्वासाने आज्ञापालन करावे.

  22. आता केवळ एकच ज्ञानी परमेश्वर, त्यांना येशू ख्रिस्त यांच्याद्वारे सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

  23. परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित होण्यासाठी बोलविलेला पौल आणि बंधू सोस्थनेस यांच्याकडून,

  24. करिंथ येथील परमेश्वराच्या मंडळीस, जे ख्रिस्त येशूंमध्ये पवित्र केलेले व पवित्र होण्यासाठी बोलाविलेले, तसेच ख्रिस्त येशू आपले व त्यांचे प्रभू यांचे नाव घेऊन प्रत्येक ठिकाणी धावा करतात त्या सर्वांस:

  25. परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.