मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वराने ज्यांना निवडले आहे त्यांच्यावर आरोप करण्यास कोण धजेल? नीतिमान ठरविणारे ते परमेश्वरच आहेत.

  2. तर असा कोण आहे जो आपल्याला दंडाज्ञा देईल? कोणी नाही. ख्रिस्त येशू जे मरण पावले, इतकेच नव्हे तर जिवंत असे उठविले गेले आणि तेच आता परमेश्वराच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहेत.

  3. अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.

  4. हे इस्राएली लोक आहेत. त्यांनाच दत्तकपण, दैवी गौरव, करार, नियम, मंदिराची सेवा आणि अभिवचनेही दिली आहेत.

  5. पूर्वज हे त्यांचेच आहेत, त्यांच्याद्वारे ख्रिस्ताची, जे सर्वोच्च परमेश्वर आहेत, शारीरिक वंशावळी समजते. त्यांची सर्वकाळ स्तुती असो! आमेन.

  6. तर असे नाही की परमेश्वराचे वचन अयशस्वी ठरले. इस्राएल वंशातून आलेला प्रत्येकजण इस्राएली असेल असे नाही.

  7. याचा अर्थ असा की शारीरिक रीतीने जन्मलेली मुले ही परमेश्वराची मुले नाहीत, जी अभिवचनानुसार जन्मलेली लेकरे, तीच अब्राहामाची मुले गणली जातील.

  8. जुळ्या मुलांचा जन्म होण्याआधी, किंवा चांगले वाईट करण्याआधी; परमेश्वराचा उद्देश निवडीसंबंधाने कायम राहावा.

  9. जसे शास्त्रलेखात लिहिले आहे: “मी याकोबावर प्रीती केली, परंतु मी एसावाचा द्वेष केला.”

  10. तर मग आपण काय म्हणावे? परमेश्वर अन्यायी आहे का? नक्कीच नाही.

  11. कारण ते मोशेला म्हणाले: “ज्याच्यावर मला कृपा करावयाची, त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची, त्याच्यावर मी दया करेन.”

  12. हे मानवी इच्छेने किंवा प्रयत्नांनी नव्हे, तर परमेश्वराच्या दयेवर अवलंबून आहे.

  13. शास्त्रलेख फारोहला सांगते: “मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, माझे सामर्थ्य तुझ्यामध्ये प्रकट व्हावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.”

  14. यास्तव ज्यांच्यावर दया करावी असे परमेश्वराला वाटते, त्यांच्यावर ते दया करतात व ज्याला कठोर करावे त्यांना ते कठोर करतात.

  15. मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तूने ती घडविणार्‍याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ”

  16. परंतु आपला क्रोध दाखवावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे परमेश्वराने ठरविले तर, नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांचे फार सहनशीलतेने सहन करतील काय?

  17. त्यांनी हे अशासाठी केले की पूर्वीच तयार केलेल्या दयेच्या पात्राला त्यांच्या वैभवाची धनसंपत्ती प्रकट करावी.

  18. आम्हाला पण त्यांनी बोलाविले, केवळ यहूदीयातूनच नाही तर गैरयहूदीयातूनही नाही का?

  19. होशेयाने म्हटल्याप्रमाणे: “जे माझे लोक नाहीत त्यांना मी ‘माझे लोक’ म्हणेन; आणि जी मला प्रिय नाही तिला मी ‘माझी प्रिया’ असे म्हणेन,”

  20. आणि, “ज्या ठिकाणी म्हटले होते, तुम्ही माझे लोक नाहीत, तिथे त्यांना जिवंत परमेश्वराची लेकरे असे म्हणतील.”

  21. कारण प्रभू त्यांचा दंड पृथ्वीवर वेगाने आणि निर्णयात्मक रीतीने अंमलात आणतील,”

  22. असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो ज्यामुळे ते पडतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”

  23. बंधूंनो व भगिनींनो, माझी मनापासून इच्छा व परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की इस्राएल लोकांचे तारण व्हावे.

  24. ते परमेश्वराप्रती आवेशी आहेत, हे मला ठाऊक आहे, परंतु तो आवेश ज्ञानावर आधारित नाही, याबद्दल मी साक्ष देतो.

  25. परमेश्वराच्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहीत नाही. ते परमेश्वराच्या नीतिमत्वाच्या अधीन न होता, त्यांनी स्वतःचे नीतिमत्व स्थापित करण्याचे प्रयत्न केले.