मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांचे हे मरण पापासाठी एकदाच होते; पण आता जे जीवन ते जगतात, ते परमेश्वराकरिता जगतात.

  2. याप्रमाणे, आपण पापाला मरण पावलेले आणि ख्रिस्त येशूंद्वारे परमेश्वरासाठी जिवंत झालेले असे माना.

  3. तुमच्या शरीराचा कोणताही अवयव पाप करण्यासाठी दुष्टपणाचे साधन म्हणून सादर करू नका, परंतु त्याऐवजी मरणातून जिवंत झाल्यासारखे परमेश्वराला सादर करा; आणि आपला प्रत्येक अवयव नीतिमत्वाची साधने होण्याकरिता त्याला सादर करा.

  4. तर मग काय? आपण नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेच्या अधीन आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? नक्कीच नाही!

  5. परमेश्वराचे आभारी आहोत, कारण पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, परंतु आता तुम्हाला जी शिकवण दिली आहे तिचे तुम्ही अंतःकरणापासून आज्ञापालन केले आणि तुम्ही समर्पित आहात.

  6. पण आता तुम्ही पापाच्या सत्तेपासून मुक्त झाला असून परमेश्वराचे दास झाला आहात, आणि जो लाभ तुम्हाला मिळाला आहे तो पावित्र्याकडे नेतो व त्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे.

  7. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.

  8. त्याप्रमाणे बंधू व भगिनींनो, तुम्ही सुद्धा ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मृत झाले आहात, म्हणून तुम्ही दुसर्‍याचे, जो मरणातून उठविला गेला त्याचे व्हावे यासाठी की तुम्ही परमेश्वरासाठी फळ द्यावे.

  9. तर मग आपण काय म्हणावे? नियम पापमय आहे का? नक्कीच नाही! नियमाशिवाय पाप काय आहे हे मला समजले नसते. “तू लोभ करू नको,” असे नियमशास्त्र मला म्हणाले नसते, तर लोभ काय आहे हे मला कधीच समजले नसते.

  10. परंतु जे उत्तम ते माझ्या मरणास कारणीभूत झाले काय? असे नक्कीच नाही. पाप ते पाप दिसावे, आणि चांगल्याद्वारे पापाने माझ्यामध्ये मृत्यू उत्पन्न केला, यासाठी की आज्ञेद्वारे पाप हे पराकोटीचे पाप दिसून यावे.

  11. परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो.

  12. परमेश्वराचा धन्यवाद असो! जे येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्याद्वारे मला मुक्त करतात. मी स्वतः माझ्या मनामध्ये परमेश्वराच्या नियमाचा गुलाम, परंतु माझ्या पापी स्वभावात मी पापाच्या नियमाचा दास आहे.

  13. कारण आपल्या पापी स्वभावामुळे आपल्याला वाचविण्यास नियम असमर्थ होते, तेव्हा परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला पापमय मनुष्यासारखे व पापबली म्हणून पाठविले व मानवी स्वभावात जे पाप राज्य करीत होते त्याला दोषी ठरविले.

  14. कारण दैहिक मन परमेश्वरविरोधी आहे; ते परमेश्वराच्या नियमाच्या अधीन होत नाही आणि कधीही होणार नाही.

  15. जे देहाच्या सत्तेखाली आहेत ते परमेश्वराला संतुष्ट करू शकणार नाहीत.

  16. तुम्ही देहाच्या सत्तेखाली नाही, परंतु जर परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही आत्म्याच्या सत्तेखाली आहात, जर कोणामध्ये ख्रिस्ताचा आत्मा वास करीत नाही, तर तो ख्रिस्ताचा नाही.

  17. कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो, ती परमेश्वराची लेकरे आहेत,

  18. पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, “अब्बा, बापा” अशी हाक मारू शकता.

  19. कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत.

  20. ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ.

  21. कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे.

  22. यासाठी की स्वतः सृष्टी विनाशाच्या दास्यत्वातून मोकळी होईल आणि परमेश्वराच्या मुलांना मिळणार्‍या स्वतंत्रेत व गौरवात सहभागी होईल.

  23. आणि जो आपली अंतःकरणे शोधतो तो आत्म्याचे मन जाणतो, कारण आत्मा परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वराच्या लोकांसाठी मध्यस्थी करतो.

  24. आणि आपल्याला माहीत आहे की, परमेश्वरावर प्रीती करणारे आणि जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्या कल्याणार्थ सर्वगोष्टी सहकारी ठरतात.

  25. अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल?