मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि परमेश्वराने सर्वात प्रथम मंडळीत प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, मग चमत्कार करणारे, तसेच रोग बरे करण्याचे दान प्राप्त झालेले, इतरांना मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, आणि शेवटी वेगवेगळी भाषा बोलणारे.

  2. कारण जेव्हा तुम्ही अन्य भाषा बोलता तेव्हा माणसाशी नव्हे तर परमेश्वराशी बोलता. निश्चित, तुम्ही आत्म्याद्वारे गूढ बोलत असाल तर तुमचे बोलणे कोणालाही समजणार नाही.

  3. मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक अन्य भाषेत बोलू शकतो, याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.

  4. त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी उघड होतील; आणि, “तुम्हामध्ये निश्चितच परमेश्वर आहे!” असे जाहीर करून तो पालथा पडेल व परमेश्वराची उपासना करेल.

  5. पण अर्थ सांगणारा उपस्थित नसला, तर अन्य भाषा बोलणार्‍यांनी मंडळीत शांत राहवे. त्याने स्वतःशी व परमेश्वराशी बोलावे.

  6. कारण परमेश्वर हे अव्यवस्था व गोंधळ यांचे परमेश्वर नसून शांततेचे आहेत—हे प्रभूच्या सर्व मंडळ्यांमध्ये दिसले पाहिजे.

  7. परमेश्वराच्या वचनाचा प्रारंभ तुम्हापासूनच झाला काय? आणि हे वचन फक्त तुम्हा लोकांपर्यंतच पोहोचले काय?

  8. कारण सर्व प्रेषितांपेक्षा मी सर्वात कनिष्ठ आहे आणि प्रेषित म्हणून घेण्याच्या किंचितही लायकीचा नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला.

  9. आता मी जो काही आहे, तो परमेश्वराच्या कृपेमुळेच आहे; आणि त्यांची माझ्यावरील कृपा व्यर्थ गेली नाही. कारण इतर सर्वांपेक्षा मी अधिक कष्ट केले; परंतु मी नाही तर परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्यामुळे हे झाले.

  10. यापेक्षा अधिक, म्हणजे आम्ही परमेश्वराविषयी खोटी साक्ष देणारे आढळलो, कारण परमेश्वराने ख्रिस्ताला मृतांतून उठविले अशी साक्ष आम्ही देतो. मृत झालेले पुन्हा उठविले जाणार नाहीत, तर त्यांनी त्याला मृतांतून उठविलेच नाही.

  11. प्रत्येकजण आपआपल्या क्रमाप्रमाणे उठेल: प्रथमफळ ख्रिस्त; नंतर जेव्हा ते येतील तेव्हा जे त्यांचे आहेत ते उठतील.

  12. नंतर शेवट होईल, त्यांनी सर्व सत्ता, अधिकार आणि सामर्थ्य नष्ट केल्यावर ख्रिस्त आपले राज्य परमेश्वर पित्याला सोपवून देतील.

  13. हे सर्व त्यांनी केल्यानंतर, पुत्र स्वतः त्यांच्या अधीन होईल ज्या परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की परमेश्वराने सर्वात सर्वकाही व्हावे.

  14. तुम्ही शुद्धीवर यावयास हवे आणि पाप करणे सोडून द्या; पण परमेश्वरासंबंधात काहीजण अज्ञानी आहेत मी हे तुम्हाला लाज वाटावी म्हणून बोलतो.

  15. मग परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर देतो आणि प्रत्येक प्रकारच्या बीजाला ते त्याचे स्वतःचेच शरीर देतात.

  16. माझ्या बंधू व भगिनींनो मी तुम्हाला जाहीर करतो की रक्त व मांस यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे नाशवंताला अविनाशी वतन मिळू शकत नाही.

  17. परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.

  18. परमेश्वराच्या इच्छेने, ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल आणि आपला बंधू तीमथ्य याजकडून,

  19. परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.

  20. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो.

  21. ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे.

  22. खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून राहावे.

  23. हे आम्हाला गर्वाचे कारण आहे: आमच्या सर्व व्यवहारात आमच्या विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की या जगात आणि तुमच्या संबंधात, आम्ही पवित्र आणि ईश्वरी प्रामाणिकपणाने भरलेले होतो. हे ऐहिक ज्ञानावर नव्हे तर परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून राहिल्यामुळे आम्ही करू शकलो.

  24. ज्याप्रकारे परमेश्वर खात्रीने विश्वासू आहे, तेवढ्याच खात्रीने आमचा संदेश “होय” आणि “नाही” असा नाही.

  25. तीमथ्य, सीला व मी, तुम्हाला परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल संदेश सांगत आलो तो “नाही” आणि “होय” असा नाही, परंतु त्यांच्यामध्ये नेहमीच “होय” आहे.