मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “जो विशेष भाग तू याहवेहस अर्पण करावयाचा आहे, तो पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असावा.

  2. याजकांसाठी हा पवित्र भाग असणार. उत्तरेस त्याची लांबी पंचवीस हजार हात, पश्चिमेकडून रुंदी दहा हजार हात, पूर्वेकडून रुंदी दहा हजार हात आणि दक्षिणेकडून लांबी पंचवीस हजार हात. त्याच्या मधोमध याहवेहचे पवित्रस्थान असावे.

  3. सादोकाच्या संतानातील पवित्र केलेले याजक, जे माझी सेवा करण्यात विश्वासू होते आणि जेव्हा इस्राएली लोक बहकून गेले, तेव्हा जसे लेवी लोक बहकले, तसे ते बहकले नाही.

  4. त्यातील काहीही त्यांनी विकू नये किंवा बदलू नये. ही सर्वोत्तम भूमी आहे ती दुसर्‍या कोणाच्या हाती जाऊ देऊ नये, कारण ती याहवेहसाठी पवित्र आहे.

  5. “हा देश तू इस्राएलच्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून द्यावे, आणि हे त्यांचे भाग असतील,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  6. “चोहीकडील अंतर अठरा हजार हात असणार. “आणि त्या काळापासून शहराचे नाव, ‘याहवेह-शाम्माह’ असे असणार.”

  7. आणि प्रभूने यहूदीयाच्या राजा यहोयाकीमला परमेश्वराच्या मंदिरातील काही पात्रांसोबत त्याच्या हाती दिले. ती शिनार प्रांतातील त्याच्या दैवताच्या मंदिरासाठी नेली आणि त्याच्या दैवताच्या खजिन्यात नेऊन ठेवली.

  8. आता परमेश्वराने दानीएलविषयी अधिकार्‍याची कृपा आणि दया प्राप्त होईल असे केले,

  9. परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.

  10. दानीएलाने त्यांना या रहस्याबद्दल स्वर्गाच्या परमेश्वराची दया मागण्याची विनंती केली, जेणेकरून बाबेलमधील इतर ज्ञानी माणसांसह त्याचा आणि त्याच्या मित्रांचा नाश होऊ नये.

  11. त्या रात्री याहवेहने दानीएलला दृष्टान्तात ते रहस्य प्रकट केले. तेव्हा दानीएलने स्वर्गाच्या परमेश्वराला धन्यवाद दिला.

  12. आणि दानीएल म्हणाला: “परमेश्वराचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो; कारण ज्ञान आणि सामर्थ्य हे त्यांचेच आहे.

  13. ते समय व ॠतू बदलतात; ते राजांना पदच्युत करतात व इतरांना उंच करतात. शहाण्यांना तेच शहाणपण देतात, सुज्ञांना बुध्दीही देतात.

  14. गहन आणि गूढ रहस्य तेच प्रकट करतात; अंधारात काय आहे हे ते जाणतात आणि प्रकाश त्यांच्यामध्ये राहतो.

  15. हे आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, मी तुम्हाला धन्यवाद देतो व तुमची स्तुती करतो: तुम्हीच मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले, मी तुम्हाला जे काही मागितले, ते मला ज्ञात करून दिले, तुम्ही आम्हाला राजाचे स्वप्न ज्ञात करून दिले.”

  16. परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्‍या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत:

  17. “महाराज जेव्हा तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता, तुमचे मन होणार्‍या भावी घटनेकडे लागले आणि रहस्ये प्रकट करणार्‍यांनी तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे दाखविले आहे.

  18. महाराज, आपण राजाधिराज आहात. स्वर्गाच्या परमेश्वरानेच आपणाला हे राज्य, सत्ता, सामर्थ्य आणि वैभव दिले आहे;

  19. आपल्या हाताखाली त्यांनी सर्व मनुष्यप्राणी, भूमीवरील प्राणी आणि आकाशातील पक्षी निर्माण केले आहेत. ते जिथे कुठेही राहतात, त्यांनी तुम्हाला त्यांचा अधिपती म्हणून नियुक्त केले आहे. ते सोन्याचे मस्तक म्हणजे आपण स्वतःच आहात.

  20. “त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील.

  21. हा त्या खडकाच्या दृष्टान्ताचा अर्थ आहे, जो मनुष्याच्या हातून नव्हता, परंतु स्वतः एका पर्वतापासून तो खडका वेगळा झाला होता—ज्याने लोखंड, कास्य, माती, चांदी आणि सोने यांचा सर्वांचा चुराडा केला होता. “महान परमेश्वराने महाराजांना भविष्यात काय घडणार आहे हे दाखवून दिले. हे स्वप्न खरे आहे आणि त्याचा अर्थ विश्वास ठेवण्यालायक आहे.”

  22. राजा दानीएलला म्हणाला, “निश्चितच तुझा परमेश्वर देवांचा देव आणि राजांचा प्रभू आणि रहस्ये उघड करणारा आहे, कारण तू या रहस्याचा अर्थ समजावून सांगण्यास योग्य ठरला आहे.”

  23. मग आता जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच मी तयार केलेल्या पुतळ्याला तुम्ही नमन केले आणि उपासना केली तर उत्तम. परंतु जर तुम्ही उपासना नाही केली तर त्याच घटकेस तुम्हाला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणता देव तुम्हाला सोडवितो ते पाहूया?”

  24. जर आम्हाला धगधगत्या भट्टीत टाकले, तर आमचे परमेश्वर ज्यांची आम्ही सेवा करतो ते आम्हाला तिच्यातून सोडविण्यास समर्थ आहे आणि महाराज, तेच आम्हाला आपल्या हातून सोडवतील.

  25. तो म्हणाला, “इकडे पाहा! मी चार पुरुष अग्नीत फिरत असलेले पाहत आहे आणि त्यांचे बंध सुटलेले आहेत आणि त्यांना कोणतीच हानी झालेली नाही, आणि त्यातील चौथा तर देवपुत्रासारखा दिसत आहे.”