मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पवित्र व साधारण यातील फरक आणि शुद्ध व अशुद्ध यात कसा फरक करावा हे त्यांनी माझ्या लोकांना शिकवावे.

  2. “ ‘कोणताही विवाद असल्यास, याजकांनी न्यायाधीश म्हणून असावे आणि माझ्या निर्णयानुसार निर्णय घ्यावा. माझ्या नेमलेल्या सर्व सणांसाठी त्यांनी माझे नियम व विधी पाळावे आणि त्यांनी माझे शब्बाथ पवित्र राखावे.

  3. ज्या दिवशी पवित्रस्थानात सेवा करण्यास तो आतील अंगणात जातो, तेव्हा त्याने स्वतःसाठी पापार्पण करावे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  4. “ ‘याजकांचे वतन केवळ मीच आहे. तुम्ही त्यांना इस्राएलमध्ये कोणताही वाटा देऊ नये; मीच त्यांचा वाटा आहे.

  5. “ ‘जेव्हा तुम्ही भूमीची वतन म्हणून वाटणी कराल, तेव्हा तुम्ही भूमीचा एक भाग याहवेहसाठी एक पवित्र प्रदेश म्हणून समर्पित करावा, तो पंचवीस हजार हात लांब आणि वीस हजार हात रुंद असावा; तो संपूर्ण भाग पवित्र असावा.

  6. याजक जे पवित्रस्थानात सेवा करतात आणि याहवेहसमोर सेवा करण्यास जे जवळ येतात त्या याजकांसाठी भूमीचा हा भाग पवित्र असेल. त्याचप्रमाणे हे ठिकाण त्यांच्या घरांसाठी आणि पवित्रस्थानासाठी पवित्र ठिकाण असे असावे.

  7. ही भूमी इस्राएलमध्ये राजपुत्राचे वतन असेल. आणि यापुढे माझे राजपुत्र माझ्या इस्राएली लोकांवर अत्याचार करणार नाहीत, तर इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार देशाचे वतन घेऊ देतील.

  8. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, अहो इस्राएलाच्या राजपुत्रांनो, तुम्ही फार पुढे गेला आहात! तुमचा आतंक आणि अत्याचार टाकून द्या आणि जे नीतिपूर्ण व योग्य ते करा. माझ्या लोकांचे वतन काढून घेण्याचे थांबवा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  9. इस्राएलमधील पुष्कळ पाणी असलेल्या कुरणातील कळपातून दोनशे मेंढरांमागे एक मेंढरू द्यावे. याचा उपयोग लोकांचे प्रायश्चित करावे म्हणून धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे यासाठी केला जावा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  10. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही एक निर्दोष गोर्‍हा घेऊन पवित्रस्थान शुद्ध करावे.

  11. सणाच्या सात दिवसाच्या दरम्यान दररोज त्याने सात निर्दोष गोर्‍हे व सात एडके होमार्पण म्हणून याहवेहसमोर आणावे, त्याचप्रमाणे पापार्पणासाठी एक बोकड आणावे.

  12. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: आतील अंगणाचे पूर्वेकडील द्वार कार्याच्या सर्व सहा दिवसा दरम्यान बंद असावे, परंतु शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी ते उघडे असावे.

  13. शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी देशातील लोकांनी त्या द्वारात याहवेहच्या समक्षतेत उपासना करावी.

  14. शब्बाथ दिवशी राजपुत्र जे होमार्पण म्हणून याहवेहसाठी आणेल, ते सहा कोकरे आणि एक एडका असून ते सर्व निर्दोष असावे.

  15. “ ‘नेमलेल्या सणाच्या वेळी जेव्हा देशातील लोक याहवेहसमोर येतात, तेव्हा जो कोणी उपासना करण्यासाठी उत्तरेकडील द्वाराने आत येईल, त्याने दक्षिणेकडील द्वाराने बाहेर जावे; आणि जो कोणी दक्षिणेकडील द्वाराने आत येईल त्याने उत्तरेकडील द्वाराने बाहेर जावे. ज्या द्वाराने ते आत आले त्या द्वाराने कोणीही परत जाऊ नये, तर त्यांनी त्या समोरच्या द्वाराने जावे.

  16. “ ‘जेव्हा राजपुत्र याहवेहला स्वैच्छिक अर्पण आणतो; ते होमार्पण असो वा शांत्यर्पण; त्याच्यासाठी पूर्वेकडील द्वार उघडावे. तो करतो त्याचप्रमाणे त्याचे होमार्पण किंवा शांत्यर्पण तो शब्बाथ दिवशी करेल. मग तो बाहेर जाईल आणि तो बाहेर गेल्यानंतर, द्वार बंद केले जाईल.

  17. “ ‘तुम्ही दररोज एक वर्षाचे निर्दोष कोकरू होमार्पण म्हणून याहवेहला अर्पण करावे; तुम्ही ते दररोज सकाळी करावे.

  18. तसेच त्याबरोबर रोज सकाळी एका एफाहचा सहावा भाग व पीठ भिजवण्यासाठी हिनाचा तिसरा भाग धान्यार्पण म्हणून आणावे. याहवेहसमोर हे धान्यार्पण सादर करण्याचा नियम सर्वकाळासाठी असावा.

  19. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जर राजपुत्राने त्याच्या एका मुलासाठी आपल्या वतनातून काही भेट म्हणून दिली, ती त्याच्या वंशजांच्या मालकीची होईल; वारसानुसार ती त्यांची मालमत्ता होईल.

  20. राजपुत्राने लोकांच्या वतनातून काही घेऊ नये, त्यांची मालमत्ता त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये. त्याने त्याच्या मुलांना त्यांचा वाटा स्वतःच्या मालमत्तेतून द्यावा, म्हणजे माझ्या लोकांतून कोणीही त्यांच्या मालमत्तेपासून वंचित केला जाणार नाही.’ ”

  21. त्याने आणखी हजार हात मापले, परंतु आता ती अशी नदी होती जी मी पार करू शकलो नाही, कारण पोहून जाता येईल इतके ते पाणी वाढले होते; अशी नदी जी कोणीही पार करू शकत नव्हते.

  22. जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा नदीच्या दोन्ही बाजूंना मी पुष्कळ झाडे पाहिली.

  23. सार्वभौम याहवेह असे म्हणतात, “देशाच्या या सीमा आहेत, जेव्हा इस्राएलच्या बारा गोत्रांना त्यांचे वतन म्हणून या देशाची तू विभागणी करशील, त्यात दोन भाग योसेफाचे असतील.

  24. त्यांच्यात तो देश तू समानतेने वाटावा. कारण मी हात उंच करून शपथ घेतली होती की, मी हा देश तुमच्या पूर्वजांना देईन, हा देश तुमचे वतन होईल.

  25. कोणत्याही गोत्रांमध्ये विदेशी राहत असेल, तिथे तू त्यांना त्यांचे वतन द्यावे,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.