मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी मागोगवर आणि समुद्रकिनार्‍यावर सुरक्षितपणे राहणार्‍या लोकांवर अग्नी पाठवेन आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  2. “ ‘माझ्या इस्राएली लोकांमध्ये मी माझे पवित्र नाव प्रकट करेन. यापुढे मी माझ्या पवित्र नावाला कलंकित होऊ देणार नाही आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएलातील पवित्र मीच याहवेह आहे.

  3. हे येत आहे! हे खचितच घडेल, हा तोच दिवस आहे ज्याबद्दल मी बोललो होतो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  4. रानातून लाकडे गोळा करण्याची किंवा जंगलातील झाडे तोडण्याची त्यांना गरज नसणार, कारण ते हत्यारांचा उपयोग इंधन म्हणून करतील आणि ज्यांनी त्यांची लूट घेतली त्यांना ते लुटतील आणि ज्यांनी त्यांना लुबाडले, त्यांना ते लुबाडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  5. “ ‘त्या दिवशी मी गोगला इस्राएलमध्ये मृतकांना पुरण्याचे एक ठिकाण देईन, जे समुद्राच्या पूर्वेकडे प्रवास करणार्‍यांच्या खोर्‍यामध्ये आहे. त्यामुळे प्रवाशांची वाट अडविली जाईल, कारण गोग आणि त्याचे सर्व सैन्य तिथे पुरले जातील. म्हणून त्याला हामोन-गोगचे खोरे म्हटले जाईल.

  6. देशातील सर्व लोक त्यांना पुरतील आणि मी माझे वैभव प्रकट करेन तो दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय असेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  7. “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: प्रत्येक प्रकारच्या पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना बोलावून सांग: ‘एकवट व्हा आणि जो यज्ञ, एक मोठा यज्ञ मी इस्राएलच्या पर्वतांवर तयार करीत आहे त्यासाठी चहूकडून एकत्र या. तिथे तुम्ही मांस खाल व रक्त प्याल.

  8. जो यज्ञ मी तुम्हासाठी तयार करीत आहे, त्यात तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल व पिऊन मस्त होईपर्यंत रक्त प्याल.

  9. माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, बलवान पुरुष आणि सर्वप्रकारच्या सैनिकांना खाऊन तुम्ही तृप्त व्हाल,’ असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  10. “राष्ट्रांमध्ये मी माझे वैभव प्रकट करेन आणि त्यांना मी केलेली शिक्षा आणि मी त्यांच्यावर उगारलेला हात, सर्व राष्ट्रे पाहतील.

  11. त्या दिवसापासून पुढे इस्राएली लोक जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.

  12. आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएली लोक त्यांच्या पापामुळे निर्वासित झाले, कारण ते माझ्याशी अविश्वासू होते. म्हणून त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले आणि त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हाती सोपविले, आणि ते सर्व तलवारीने पडले.

  13. त्यांच्या अशुद्धतेनुसार आणि पापांनुसार त्यांच्याशी व्यवहार केला आणि त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले.

  14. “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी याकोबाची संपत्ती परत करेन आणि इस्राएलच्या सर्व लोकांवर दया करेन आणि माझ्या पवित्र नावासाठी ईर्षा बाळगेन.

  15. जेव्हा ते त्यांच्या देशात सुरक्षित राहतील आणि त्यांना घाबरविण्यास कोणीही नसेल, तेव्हा त्यांची लज्जा व मला दाखविलेले सर्व अविश्वासूपण ते विसरून जातील.

  16. जेव्हा मी त्यांना राष्ट्रांतून परत आणेन आणि त्यांच्या शत्रूंच्या देशांमधून त्यांना एकत्र करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे अनेक राष्ट्रांच्या दृष्टीत मी पवित्र मानला जाईन.

  17. तेव्हा ते जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, कारण जरी राष्ट्रांमध्ये मी त्यांना निर्वासित असे पाठवले, तरी मी त्यांना त्यांच्या देशात एकत्र करेन, कोणीही मागे सोडला जाणार नाही.

  18. यापुढे मी आपले मुख त्यांच्यापासून लपवणार नाही, कारण इस्राएली लोकांवर मी माझा आत्मा ओतेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  19. आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, वर्षाच्या सुरुवातीला, महिन्याच्या दहाव्या दिवशी, शहराचे पतन झाल्यानंतर चौदाव्या वर्षी; त्याच दिवशी याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला तिथे नेले.

  20. परमेश्वराच्या दृष्टान्तांमध्ये याहवेहनी मला इस्राएल देशात नेले आणि एका अत्यंत उंच पर्वतावर ठेवले. त्याच्या दक्षिणेकडे काही इमारती होत्या, ज्या शहरासारख्या दिसत होत्या.

  21. याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता.

  22. आणि उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे. हे सादोकचे पुत्र आहेत, केवळ तेच लेवी आहेत, जे याहवेहची सेवा करताना याहवेहसमोर येऊ शकतात.”

  23. तिथे एक लाकडी वेदी होती ती तीन हात उंच आणि दोन हात लांब होती, तिचे कोपरे, तिची बैठक आणि तिच्या बाजू लाकडाच्या होत्या. तो मनुष्य मला म्हणाला, “हा तोच मेज आहे जो याहवेहसमोर असतो.”

  24. तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मंदिराच्या अंगणासमोर उत्तर व दक्षिणेच्या बाजूला असलेल्या खोल्या याजकांच्या खोल्या आहेत, तिथे जे याजक याहवेहसमोर जातात ते परमपवित्र अर्पणे; म्हणजेच धान्यार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे खातील; कारण ते ठिकाण पवित्र आहे.

  25. आणि मी इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव पूर्वेकडून येताना पाहिले. जोरदार पाण्याच्या गर्जनेप्रमाणे त्याचा आवाज होता आणि परमेश्वराच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशमय झाली.