मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि ते पुन्हा त्यांच्या मूर्तींनी व अमंगळ प्रतिमांनी किंवा त्यांच्या पातकांनी यापुढे स्वतःला भ्रष्ट करणार नाहीत, कारण त्यांच्या सर्व पापमय घसरणीपासून मी त्यांना वाचवेन आणि मी त्यांना शुद्ध करेन. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.

  2. “ ‘माझा सेवक दावीद, त्यांच्यावर राजा होईल, आणि त्या सर्वांना एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमांचे अनुसरण करतील आणि माझे विधी काळजीपूर्वक पाळतील.

  3. माझा सेवक याकोबाला मी दिलेल्या देशात, जिथे तुमचे पूर्वज राहिले तिथे ते राहतील. ते व त्यांची लेकरे आणि त्यांच्या लेकरांची लेकरे सर्वकाळ तिथे राहतील आणि माझा सेवक दावीद सर्वकाळासाठी त्यांचा राजपुत्र असेल.

  4. मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन; तो सर्वकाळचा करार असेल. मी त्यांना स्थापित करेन आणि त्यांची संख्या बहुगुणित करेन, आणि मी माझे पवित्रस्थान सर्वकाळासाठी त्यांच्यात ठेवेन.

  5. माझे निवासस्थान त्यांच्याबरोबर राहील; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.

  6. जेव्हा माझे पवित्रस्थान सदासर्वकाळ त्यांच्यामध्ये राहील, तेव्हा सर्व राष्ट्रे जाणतील की मी याहवेह इस्राएलला पवित्र करतो.’ ”

  7. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  8. आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख व तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष, मी तुझ्याविरुद्ध आहे.

  9. मी तुला उपडे पाडेन, तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझे घोडे व संपूर्ण हत्यारबंद असलेले घोडेस्वार आणि मोठ्या व लहान ढाली घेतलेल्या लोकांचा मोठा समूह, सर्व धनुर्धारी यासर्वांसह मी तुला बाहेर काढेन.

  10. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तुमच्या मनात विचार येतील आणि तुम्ही वाईट युक्ती योजाल.

  11. तू म्हणशील, “तट नसलेल्या गावांवर मी आक्रमण करेन; शांतीच्या व निश्चिंत असलेल्या लोकांवर मी हल्ला करेन; ते सर्व तटाशिवाय व दरवाजे व कुंपणाशिवाय राहतात.

  12. “यास्तव, मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि गोगला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी, जेव्हा माझे इस्राएली लोक सुरक्षिततेत राहात आहेत, त्यांची नोंद तू घेणार नाही काय?

  13. मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्‍या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.

  14. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तूच तो आहे, ज्याबद्दल मी पुरातन काळी माझ्या सेवकांद्वारे व इस्राएलच्या संदेष्ट्यांद्वारे बोललो होतो. त्यावेळी त्यांनी पुष्कळ वर्षे भविष्यवाणी केली की मी तुला त्यांच्याविरुद्ध आणेन.

  15. त्या दिवशी असे होईल: जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करेल, तेव्हा माझा तापलेला क्रोध भडकेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  16. माझी ईर्षा व पेटलेल्या संतापाने मी जाहीर करतो की, त्यावेळी इस्राएल देशात मोठा भूकंप येईल.

  17. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, रानातील पशू, भूमीवर सरपटणारा प्रत्येक प्राणी आणि पृथ्वीच्या पाठीवरील सर्व लोक माझ्या समक्षतेत थरथर कापतील. पर्वत कोसळतील, कडे खचतील आणि प्रत्येक भिंत जमिनीवर पडेल.

  18. मी गोगविरुद्ध माझ्या सर्व पर्वतांवर तलवार बोलवेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. प्रत्येकाची तलवार आपआपल्या भावाविरुद्ध चालेल.

  19. मरी व रक्तपाताद्वारे मी त्याच्यावर न्याय आणेन; त्याच्यावर व त्याच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर असलेल्या पुष्कळ राष्ट्रांवर मी मुसळधार पाऊस, गारा व जळते गंधक ओतेन.

  20. अशाप्रकारे मी माझी महानता व पवित्रता दाखवेन, आणि अनेक राष्ट्रांदेखत मी स्वतःस प्रकट करेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’

  21. “मानवपुत्रा, गोगविरुद्ध भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख आणि तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष, मी तुझ्याविरुद्ध आहे.

  22. मी तुला उपडे पाडून तुला ओढत नेईन. मी तुला दूर उत्तरेकडून आणेन आणि इस्राएलच्या पर्वतांविरुद्ध पाठवेन.

  23. मग मी तुझ्या डाव्या हातातला धनुष्य मारीन आणि तुझ्या उजव्या हातातील बाण खाली पाडीन.

  24. तू इस्राएलच्या पर्वतांवर पडशील, तू व तुझे सैन्य आणि तुझ्याबरोबरची राष्ट्रे सुद्धा पडतील. मी तुम्हाला सर्वप्रकारच्या मांसाहारी हिंस्र पक्ष्यांना व हिंस्र पशूंना भक्ष म्हणून देईन.

  25. तू मोकळ्या रानात पडशील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.