मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वारातून याहवेहच्या वैभवाने मंदिरात प्रवेश केला.

  2. तेव्हा आत्म्याने मला उचलून आतील अंगणात आणले आणि याहवेहच्या वैभवाने मंदिर भरले.

  3. तो मनुष्य माझ्याशेजारी उभा असता, मंदिरातून कोणी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले.

  4. परमेश्वराने मला म्हटले: “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थान, माझ्या तळपायाचे ठिकाण आहे. या ठिकाणी इस्राएली लोकांमध्ये मी सर्वकाळ राहीन. इस्राएली लोक; ते किंवा त्यांचे राजे यापुढे त्यांच्या वेश्यावृत्तीने आणि त्यांच्या राजांच्या अंत्यविधीच्या अर्पणांद्वारे माझे नाव पुन्हा कलंकित करणार नाहीत.

  5. जेव्हा त्यांनी त्यांचे उंबरठे माझ्या उंबरठ्याशेजारी आणि त्यांच्या द्वाराच्या चौकटी माझ्या चौकटीशेजारी उभारल्या, माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती, त्यांच्या अमंगळ कृत्यांनी त्यांनी माझे पवित्र नाव कलंकित केले. म्हणून माझ्या रागाने मी त्यांचा नाश केला.

  6. आता त्यांनी त्यांची वेश्यावृत्ती आणि त्यांच्या राजांसाठी अंत्यविधीची अर्पणे माझ्यापासून दूर करावी आणि मी सर्वकाळ त्यांच्यामध्ये राहीन.

  7. तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: होमार्पणासाठी व वेदी बांधून झाल्यावर त्यावर रक्त शिंपडण्यासाठी जे नियम आहेत ते हे:

  8. सादोकच्या कुटुंबाच्या लेवी कुळातील याजकांना तुम्ही पापार्पणासाठी एक गोर्‍हा द्यावा. हे याजक माझी सेवा करण्यास माझ्यासमोर येतात, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  9. त्यांना तू याहवेहसमोर अर्पण करावे आणि याजकांनी त्यांच्यावर मीठ टाकावे आणि होमार्पण म्हणून याहवेहसमोर अर्पण करावे.

  10. हे दिवस समाप्त झाल्यानंतर, आठव्या दिवसापासून पुढे, याजकांनी तुमची होमार्पणे व शांत्यर्पणे वेदीवर अर्पण करावी. तेव्हा मी तुमचा स्वीकार करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  11. याहवेहने मला म्हटले, “हे द्वार बंदच असावे. ते उघडले जाऊ नये; त्यातून कोणीही प्रवेश करू नये. ते बंदच असावे कारण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने त्यातून प्रवेश केला.

  12. केवळ राजपुत्रच स्वतः द्वारात बसून याहवेहसमोर भोजन करू शकेल. त्याने देवडीच्या द्वारातून आत यावे आणि तिथूनच बाहेर जावे.”

  13. नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडील द्वारातून मंदिरासमोर आणले. तेव्हा मंदिर याहवेहच्या वैभवाने भरत असताना मी पाहिले आणि मी तिथे उपडा पडलो.

  14. याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा, जवळून ऐक आणि याहवेहच्या मंदिराविषयी जे सर्व नियम व सूचना मी तुला सांगतो त्या सर्वांकडे लक्ष दे. मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांकडे आणि पवित्रस्थानातून बाहेर जाण्याच्या मार्गांकडे लक्ष दे.

  15. बंडखोर इस्राएलास सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अहो इस्राएली लोकांनो तुम्ही जी अमंगळ कृत्ये केली ती पुरे!

  16. तुमच्या अमंगळ कृत्यांसह तुम्ही हृदयाने आणि शरीराने बेसुंती असे विदेशी लोक माझ्या पवित्रस्थानात आणले, अन्न, चरबी आणि रक्ताची अर्पणे करून तुम्ही माझे मंदिर भ्रष्ट केले आणि माझा करार मोडला.

  17. माझ्या पवित्र वस्तूंबाबत तुमची जबाबदारी पार पाडण्याऐवजी, तुम्ही माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये इतरांना सोपविली.

  18. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हृदयाने व शरीराने बेसुंती असे विदेशी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करणार नाहीत, जे विदेशी इस्राएलात राहतात त्यांनी सुद्धा येऊ नये.

  19. “ ‘इस्राएली लोक बहकले तेव्हा जे लेवी माझ्यापासून भरकटले व दूर गेले आणि त्यांच्या मूर्तींच्या मागे गेले ते त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगतील.

  20. मंदिराच्या द्वारांवर पहारा करीत तिथे माझ्या पवित्रस्थानात सेवा करू शकतील; लोकांसाठी होमार्पण व यज्ञाचे पशू ते कापतील आणि लोकांपुढे उभे राहून त्यांची सेवा करतील.

  21. परंतु त्यांनी त्यांच्या मूर्तीसमोर लोकांची सेवा केली आणि इस्राएली लोकांना पाप करण्यास भाग पाडले, म्हणून मी उंचावलेल्या बाहूंनी शपथ घेतली आहे की त्यांनी त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगावे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  22. त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करण्यास जवळ येऊ नये किंवा माझ्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या किंवा परमपवित्र अर्पणांच्या जवळ येऊ नये; त्यांनी त्यांच्या अमंगळ कृत्यांची लाज भोगावी.

  23. मंदिराची राखण करण्यासाठी व तिथे जी सर्व कामे केली जातात त्यावर मी त्यांची नेमणूक करेन.

  24. “ ‘परंतु लेवी गोत्रातील याजक जे सादोकचे वंशज आहेत, इस्राएली लोक माझ्यापासून बहकून गेले होते, तेव्हा ज्यांनी माझ्या पवित्रस्थानाची राखण केली, ते माझ्यासमोर सेवा करण्यास जवळ येतील; चरबी व रक्ताची यज्ञे अर्पिण्यासाठी ते माझ्यासमोर उभे राहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  25. केवळ तेच माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करतील, केवळ तेच माझ्यासमोर सेवा करण्यास माझ्या मेजाजवळ येतील आणि पहारेकरी म्हणून माझी सेवा करतील.