मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नबुखद्नेस्सर त्या धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ गेला आणि मोठ्याने हाक मारून म्हणाला, “परमोच्च परमेश्वराचे सेवक शद्रख, मेशख आणि अबेदनगो, बाहेर या! इकडे या!” तेव्हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो अग्नीतून बाहेर आले,

  2. तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेदनगोचे परमेश्वर धन्यवादित असो. ज्यांनी राजाची आज्ञा मोडून आपल्या परमेश्वराशिवाय अन्य दैवतांची सेवा किंवा उपासना करावयाची नाही असे ठरवून मरण पत्करले, तेव्हा त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या विश्वासू सेवकांची सुटका केली.

  3. म्हणून मी असे फर्मान काढतो की शद्रख, मेशख आणि अबेदनगोच्या परमेश्वराविरुद्ध कोणतेही राष्ट्र किंवा भाषा बोलणारे काहीही बोलतील तर त्यांचे तुकडे तुकडे करावेत आणि त्यांच्या घरादाराचेही उकिरडे करण्यात यावे. कारण परमेश्वर जसे सोडवितात, तसे दुसर्‍या कोणत्याही दैवताला करता येणार नाही.”

  4. परमोच्च परमेश्वराने मला जी चिन्हे व चमत्कार दाखविले ते तुम्ही सर्वांना सांगण्यात मला आनंद होत आहे.

  5. किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे,

  6. “ ‘हा निर्णय दूतांद्वारे घोषित केला जातो, पवित्र लोक हा निर्णय जाहीर करतात, जेणेकरून जिवंतांना हे कळावे की जे परात्पर आहेत, ते पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च राज्यकर्ता आहेत आणि ज्याला ते इच्छितात, त्यांना ते देतात आणि त्यांच्यावर अगदी कनिष्ठाला नियुक्त करतात.’

  7. तुला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तू वन्यप्राण्यांसह राहशील; तू बैलाप्रमाणे गवत खाशील. सात कालखंड संपेपर्यंत तू असे स्वीकारशील की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला राज्ये देतात.”

  8. निर्धारित कालखंडाच्या शेवटी, मी, नबुखद्नेस्सरने माझी नजर वर स्वर्गाकडे वळवली आणि माझी बुद्धी मला पुन्हा लाभली. मग मी परात्पर परमेश्वराची महिमा केली; त्यांना आदर आणि गौरव दिला, जे सदासर्वकाळ जिवंत आहेत,

  9. पृथ्वीवरील सर्व लोक

  10. आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.

  11. म्हणून यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणण्यात आली आणि राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ लागली.

  12. “महाराज, परात्पर परमेश्वराने तुमचे पिता नबुखद्नेस्सर राजाला राज्य आणि महानता वैभव आणि गौरव दिले होते.

  13. कारण त्यांनी राजाला असे उच्च स्थान दिले की, सर्व राष्ट्रे आणि प्रत्येक भाषा बोलणारे त्यांच्यासमोर थरथर कापत आणि त्याला भीत असत. राजाला ज्याला ठार करावयाचे होते त्याला ठार करीत असत; ज्याला वाचवायचे होते त्याला वाचवित असत; ज्याला बढती द्यायची त्याला बढती देत असत; आणि ज्याला नम्र करावयाचे त्याला नम्र करीत असत.

  14. त्यांना लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि प्राण्याचे मन देण्यात आले; ते रानगाढवांमध्ये राहिले आणि बैलासारखे गवत खात असत; आणि त्यांचे शरीर आकाशाच्या दवबिंदूंनी भिजले होते, जोपर्यंत त्यांनी हे मान्य केले नाही की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि त्यांना पाहिजे त्याला ते राज्यांचा अधिपती म्हणून नियुक्त करतात.

  15. त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही.

  16. म्हणून त्यांनी हा हात पाठविला आहे, ज्याने हे लिखाण लिहिले आहे.

  17. “या शब्दांचा अर्थ हा असा: “मने: परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे.

  18. शेवटी हे लोक म्हणाले, “आम्हाला दानीएलाविरुद्ध त्याच्या परमेश्वराच्या नियमाशिवाय कोणत्याही बाबतीत आरोपाचे कारण सापडणार नाही.”

  19. आम्ही सर्वांनी म्हणजे अध्यक्ष, राज्यपाल, मंत्री नायब यांनी एकमताने ठरविले आहे की, महाराजांनी एक फर्मान काढावे व त्याचे पालन करण्यात यावे, त्यानुसार येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे.

  20. जेव्हा दानीएलला हे फर्मान निघाल्याचे समजले, तेव्हा तो घरी गेला व माडीवर खोलीत गेला. या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे उघडलेल्या होत्या. आपल्या नित्याच्या रिवाजाप्रमाणे दिवसातून तीन वेळा त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्याच्या परमेश्वराचे आभार मानले.

  21. नंतर हे लोक त्याच्या घरी जमावाने आले आणि त्यांनी दानीएलला परमेश्वराला प्रार्थना करताना व मदत मागताना पाहिले.

  22. मग ते राजाकडे गेले आणि त्याच्यासोबत त्याच्या फर्मानाबद्दल बोलले: तुम्ही फर्मान काढले नाही काय की येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे? राजाने उत्तर दिले, “हे फर्मान कायम आहे—मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”

  23. तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!”

  24. जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?”

  25. माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.”