मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “लवकर दूर पळा! हासोरवासीयांनो, खोल गुहेत दडून बसा,” कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे; नबुखद्नेस्सर, त्याने तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले आहे, याहवेह जाहीर करतात.

  2. “सज्ज हो आणि सुखात राहणार्‍या राष्ट्रांवर हल्ला कर, जे आत्मविश्वासाने जगतात,” याहवेह जाहीर करतात. “ज्या राष्ट्रांना प्रवेशद्वार नाही वा सळया नाहीत; त्यातील लोक धोक्यांपासून दूर राहतात.

  3. त्यांचे सर्व उंट लुटून नेले जातील, व त्यांचे मोठमोठे कळप युद्धाची लूट सामुग्री होतील. या मूर्तिपूजक लोकांची मी वाऱ्यागत पांगापांग करेन मी त्यांच्यावर चहूकडून अरिष्ट आणेन. याहवेह असे जाहीर करतात.

  4. यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याच्या कारकिर्दीच्या आरंभी एलामविषयी याहवेहकडून हा संदेश यिर्मयाह संदेष्ट्याला प्राप्त झाला.

  5. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी एलामचा धनुष्य तोडणार आहे, जो त्यांच्या सामर्थ्याचा मुख्य आधार आहे.

  6. मी एलामच्या विरुद्ध चारही दिशातील वार्‍याला आणेन; ते आकाशाच्या चारही कोपऱ्यातून येतील; मी त्यांना चारही दिशातील वार्‍यावर पसरवून टाकेन, असे एकही राष्ट्र नसेल जिथे एलामचे निर्वासित नसतील.

  7. जे एलामचा वध करू इच्छितात, त्या त्यांच्या शत्रूदेखत मी पांगापांग करेन; मी त्यांच्यावर अरिष्ट आणेन, माझा भयंकर क्रोधही आणेन,” असे याहवेह जाहीर करतात. “मी त्यांचा समूळ नाश करेपर्यंत त्यांचा तलवारीने पाठलाग करेन.

  8. मी माझे राजासन एलाम येथे स्थापन करेन मी तिचा राजा व तिचे सरदार यांचा नाश करेन. असे याहवेह जाहीर करतात.

  9. “तरी येत्या दिवसात मी एलामची समृद्धी परत आणेन,” याहवेह जाहीर करतात.

  10. बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांचा देश यांच्याविरुद्ध याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला सांगितलेले हे वचन आहे:

  11. “त्या समयी, त्या दिवसात इस्राएलचे लोक आणि यहूदीयाचे लोक एकत्र येतील, आणि अश्रू गाळीत त्यांचे परमेश्वर याहवेहचा शोध घेतील, याहवेह जाहीर करतात.

  12. ते सीयोनकडे जाणार्‍या मार्गाची विचारणा करतील आणि त्या दिशेने ते अभिमुख होतील. ते येतील व याहवेहशी, कधीही विस्मृतित न जाणाऱ्या, एका सार्वकालिक कराराशी जडून जातील.

  13. ज्यांना ते सापडले, त्यांनी त्यांना गिळंकृत केले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘आपण दोषी नाही, कारण याहवेह, त्यांचे हिरवेगार कुरण, आणि त्यांच्या पूर्वजांचे आशास्थान, यांच्याविरुद्धच ज्यांनी पाप केले आहे.’

  14. कारण मी उत्तरेकडील महान राष्ट्रांना एकवटून बाबेलवर हल्ला करण्यास प्रेरित करणार. ते बाबेलवर हल्ला करण्यास सज्ज होतील, आणि उत्तरेकडून तिचा पाडाव होईल. त्यांचे बाण लक्ष्यवेधी योद्ध्यांसारखे असतील ते रिकाम्या हाताने परत जात नसतात.

  15. तर मग बाबेलची लूट करण्यात येईल; ते सर्व तिची मनसोक्त लूट करतील,” असे याहवेह जाहीर करतात.

  16. याहवेहच्या क्रोधामुळे ती आवासित होणार नाही, पण पूर्णपणे ओसाड होईल. आणि तिची अवस्था पाहून बाबेलातून येजा करणार्‍यांना दहशत वाटेल; तिच्या जखमा पाहून ते तिचा उपहास करतील.

  17. “बाबेलच्या सभोवती तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा, धनुर्धाऱ्यांनो तिच्यावर बाणांचा नेम धरा. तिच्यावर बाण मारा, कोणताही बाण राखून ठेवू नका. कारण तिने याहवेहविरुद्ध पाप केले आहे.

  18. तिच्याविरुद्ध चहूबाजूंनी आवाज उठवा! ती शरण येत आहे, तिचे बुरूज धराशायी झाले आहेत, तिच्या तटाच्या भिंती कोसळल्या आहेत. हा याहवेहने घेतलेला सूड आहे, तुम्हीही तिचा सूड घ्या; जसे तिने इतरांचे केले तसेच तिचेही करा.

  19. म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: “मी बाबेलच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन, अश्शूरच्या राजाला व त्याच्या भूमीला शिक्षा देईन.

  20. पण मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या कुरणात परत आणेन, ते कर्मेल व बाशान येथे चरतील; एफ्राईम व गिलआदच्या डोंगरावर ते खाऊन तृप्त होतील.

  21. त्या दिवसात, त्या समयी, याहवेह घोषित करतात, इस्राएलमध्ये दोषाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी ते आढळणार नाहीत, आणि यहूदीयामध्ये पाप शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी आढळणार नाही, लोकांना मी क्षमा करेन. कारण मी वाचवून ठेवलेल्या अवशेषाला क्षमा करेन.

  22. “मराथाईम प्रदेशावर आक्रमण करा आणि पकोड येथील रहिवाशांवर स्वारी करा. त्यांचा पाठलाग करा, त्यांचा वध करा व त्यांना समूळ नष्ट करा.” असे याहवेह जाहीर करतात. “मी तुम्हाला आज्ञापिलेले सर्वकाही करा.

  23. अगे बाबिलोन, मी तुझ्यासाठी सापळा लावला आणि तुला कळण्या आधीच तू त्यात अडकलीस; तू सापडलीस व पकडण्यात आलीस कारण तू याहवेहस विरोध केला.

  24. याहवेहने आपले शस्त्रागार उघडले व आपल्या क्रोधाचा स्फोट करण्यासाठी शस्त्रे बाहेर काढली, कारण सार्वभौम सर्वसमर्थ याहवेहस बाबेलच्या भूमीवर कार्य करावयाचे आहे.

  25. बाबेलमधील फरारी व निर्वासित लोक सीयोनात काय म्हणतात ते ऐका याहवेह, आमच्या परमेश्वराने कसा सूड घेतला, त्यांच्या मंदिराबद्दल सूड घेतला. हे याहवेह जाहीर करतात.