मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ज्याचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे, ते महाराज म्हणतात, ‘माझ्या जीविताची शपथ,’ जो येणार आहे, तो पर्वतांमधील ताबोर पर्वतासारखा, समुद्राजवळील कर्मेलासारखा आहे.

  2. याहवेह जाहीर करतात, कितीही घनदाट असलेले जंगल ते कापून नष्ट करतील. ते टोळांपेक्षाही असंख्य असे असतील, ज्यांची संख्या मोजता येणार नाही.

  3. सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: मी थेबेस येथील दैवत आमोनला, फारोहला, इजिप्तला व तिच्या दैवतांना, तिच्या राजाला आणि तिची सर्व दैवते व तिच्यावर भरवसा ठेवणार्‍यांनाही शिक्षा करणार आहे.

  4. त्यांना ठार मारावे अशी इच्छा धरणारे—बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सैन्य यांच्या तावडीत मी त्यांना देईन. परंतु नंतर मात्र हा इजिप्त लढाईच्या उत्पातातून सावरेल आणि तिथे पूर्ववत वस्ती होईल, असे याहवेह जाहीर करतात.

  5. “याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नको; इस्राएला, निराश होऊ नका. मी बंदिवासाच्या देशातून तुमच्या वंशजांचा दूर देशातून तुमचा बचाव करेन, याकोबाला पुन्हा शांती व संरक्षण मिळेल, त्याला कोणीही भयभीत करणार नाही.

  6. याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे.” असे याहवेह जाहीर करतात. “मी तुला ज्या राष्ट्रांमध्ये विखरून दिले होते, त्या राष्ट्रांचा जरी नाश केला, परंतु तुझा संपूर्ण नाश करणार नाही. मी तुला शिस्त लावण्यासाठी एका मर्यादेत शिक्षा करेन. तुला पूर्णपणे विना शिक्षेचे मी सोडणार नाही.”

  7. गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे:

  8. याहवेह हे असे म्हणतात: “पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे; तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल. जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेल म्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे. लोक किंकाळ्या मारतील; त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील. कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज, शत्रूंच्या रथाचा आवाज आणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे. त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत; त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत.

  9. कारण सर्व पलिष्टी लोकांचा नाश करण्यास आणि सर्व अवषेशांना बाहेर काढण्याचा, सोर व सीदोन येथील लोकांना मदत करण्याचा समय आला आहे. याहवेह पलिष्टी लोकांचा नाश करणार आहेत, कफतोरहून आलेल्या रहिवाशांचा निःपात करणार आहेत.

  10. “ ‘हाय रे, याहवेहच्या तलवारी, तू पुन्हा केव्हा विसावा घेणार? जा! आपल्या म्यानात परत जा; शांत राहा व स्तब्ध हो.’

  11. परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे, तर ती स्वस्थ कशी बसेल, त्यांनीच तिला आदेश दिला आहे ना अष्कलोन व समुद्राकाठी राहणार्‍यांवर हल्ला कर?”

  12. मोआबी लोकांविषयी: इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, यांनी दिलेला संदेश हा आहे: “नबो शहराचा धिक्कार असो, कारण त्याचा विध्वंस होईल. किर्याथाईम लज्जित होईल व हस्तगत करण्यात येईल; तेथील किल्ले लज्जित होतील व चक्काचूर करण्यात येतील.

  13. विनाशक प्रत्येक नगराविरुद्ध येईल, एकाही नगराची त्याच्या हातून सुटका होणार नाही. दर्‍याखोर्‍यांचा नाश होईल, आणि पठारे उद्ध्वस्त होतील, कारण याहवेहने तसे म्हटले आहे.

  14. “याहवेहने सोपविलेले कार्य आळशीपणाने करणारा शापित असो! रक्तपात न करता तलवार म्यानात ठेवणारे शापित असो!

  15. परंतु याहवेह म्हणतात, लवकरच असे दिवस येत आहेत, मी तिला बुधल्यातून ओतणारी माणसे पाठवेन, ते तिला या पात्रातून ओतून बाहेर टाकतील; ते तिचे बुधले रिकामी करतील व नंतर तिची पात्रे फोडून टाकतील.

  16. परंतु आता मोआबचा सर्वनाश होणार आहे, तिची नगरे हस्तगत केली जाणार आहेत; तिच्या अत्यंत उमद्या तरुणांची कत्तल होईल,” असे राजाधिराज, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे ते म्हणतात.

  17. मोआबभूमीचे शिंग तोडून टाकण्यात आले आहे. तिचे बाहू मोडले आहेत.” असे याहवेह जाहीर करतात.

  18. “तिला एखाद्या दारुड्यागत होऊ दे, कारण तिने याहवेहविरुद्ध बंड केले आहे. मोआबभूमी आपल्याच वांतीत लोळू दे; तिला उपहासाचा विषय होऊ दे.

  19. याहवेहने जाहीर केले, मला मोआब भूमीचा उद्धटपणा माहीत आहे, परंतु तो व्यर्थ आहे, तिच्या फुशारक्यांनी काहीही प्राप्त होत नाही.

  20. म्हणून मी मोआबभूमीसाठी विलाप करतो, मी मोआबसाठी अश्रू गाळतो, कीर-हरेसेथच्या लोकांसाठी मी शोक करतो.

  21. जसे याजेर शोक करतो, तसे मी सिबमाहच्या द्राक्षलतांसाठी शोक करतो. तुमच्या फांद्या समुद्रापर्यंत पसरलेल्या आहेत, त्या याजेरपर्यंत पोहोचतात; संहार करणाऱ्याने तुमच्या पिकलेल्या फळांवर व द्राक्षांवर हल्ला केला आहे.

  22. मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून आनंद व हर्ष लयास गेले आहेत. द्राक्षकुंडातून द्राक्षारसाचा प्रवाह मी बंद केला आहे; हर्षनाद करून द्राक्षे तुडविणारा कोणी नाही. ओरडणे आहे, होय पण ते आनंदाचे नाही.

  23. जे उच्चस्थळी जाऊन अर्पणे वाहतात, आणि त्यांच्या खोट्या दैवतांना धूप जाळतात त्या मोआबभूमीत या गोष्टी मी आता बंद पाडेन,” याहवेह असे जाहीर करतात.

  24. “माझे अंतःकरण मोआबसाठी जणू बासरीवर शोकगीत गात आहे; कीर-हरेसेथसाठी विलापाने बासरीगत गीत गात आहे. त्यांनी साठविलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.

  25. मोआबभूमीतील प्रत्येक घराच्या छतावर आणि प्रत्येक चौरस्त्यावर केवळ आकांतच आढळत आहे, कारण जुन्या निकामी पात्रांचा चक्काचूर करावा त्याप्रमाणे मोआब भूमीचा मी चुराडा केला आहे,” याहवेह असे जाहीर करतात.