मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि अद्यापही कोणी लीन होऊन माझ्याविषयी श्रद्धा व्यक्त केली नाही, किंवा मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेले नियम व आज्ञा पाळल्या नाही.

  2. “म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी तुम्हावर अरिष्ट आणून संपूर्ण यहूदीयाचा नाश करण्याचा निर्धार केला आहे.

  3. इजिप्तमध्ये जाण्याचा हट्ट धरणार्‍या या यहूदीयातील उरलेल्या लोकांना मी नाहीसे करेन. ते सर्वजण इजिप्तमध्ये नष्ट होतील; ते तलवारीने वा दुष्काळाने मरण पावतील. अगदी लहानांपासून थोरापर्यंत सर्व तलवारीने वा दुष्काळाने मरतील. ते एक असा शाप होतील, ते भयानकतेचा, तिरस्काराचा, व शापाचा विषय होतील.

  4. यरुशलेममध्ये राहणाऱ्यांना मी जशी शिक्षा केली, तशीच या इजिप्तमध्ये राहणाऱ्यांनाही मी तलवार, दुष्काळ व मरी यांनी शिक्षा करेन.

  5. “याहवेहच्या नावाने तू देत असलेले संदेश आम्ही ऐकणार नाही!

  6. “तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे व अधिपती, आणि सर्व लोक यहूदीयाच्या नगरामध्ये, आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर मूर्तींपुढे धूप जाळीत होता, हे याहवेहच्या स्मरणात नाही का व ते त्यांनी दर्शवून दिले नाही का?

  7. तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे.

  8. जी तुम्ही बघता ती भयानक संकटे तुमच्यावर कोसळली याचे खरे कारण एकच आहे, ते म्हणजे तुम्ही मूर्तींपुढे धूप जाळला, याहवेहविरुद्ध पाप केले आणि त्यांच्या आज्ञा, नियम व करार पाळण्याचे नाकारले.”

  9. मग यिर्मयाह पुन्हा त्या सर्वांना व त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रियांना म्हणाला, “इजिप्तमध्ये असलेल्या यहूदीयाच्या सर्व नागरिकांनो, याहवेहचा संदेश ऐका!

  10. सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा!

  11. तरीपण इजिप्त देशात राहणार्‍या सर्व यहूद्यांनो, याहवेहचे वचन ऐका: ‘मी आपल्या थोर नामाची शपथ घेत आहे, याहवेह म्हणतात, इजिप्त देशात राहणारे कोणीही यहूदीयाचे नागरिक “सार्वभौम याहवेहच्या नावाची शपथ.” असे कधीही म्हणणार नाही.

  12. इजिप्तमधील सर्व यहूदी लोक तलवारीने व दुष्काळाने नाश पावतील; तोपर्यंत त्यांच्या भल्यासाठी नव्हे तर अनिष्टासाठी माझी त्यांच्यावर नजर आहे.

  13. तलवारीपासून वाचलेले जे इजिप्त देशातून यहूदीयाला परत जातील, ते अगदी थोडके असतील. मग इजिप्त देशात येऊन राहणाऱ्या यहूदीयाच्या सर्व अवशेष नागरिकांना कळेल की कोणाचा शब्द खरा ठरतो—माझा की त्यांचा.

  14. “ ‘याहवेह जाहीर करतात, या ठिकाणी मी तुम्हाला शिक्षा करण्याचे हे चिन्ह मी तुम्हाला देईन, म्हणजे तुमच्यावर संकटे कोसळणार या मी दिलेल्या धमक्या खऱ्या आहेत हे तुम्हाला कळेल.’

  15. याहवेह असे म्हणतात: ‘जसे मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍या बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरच्या हवाली केले होते, तसेच मी इजिप्तचा राजा, फारोह होफ्रा, याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हातात देईन.’ ”

  16. “हे नेरीयाहचा पुत्र बारूखा, याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला असे सांगत आहेत:

  17. तू म्हणालास, ‘मला धिक्कार असो! माझ्या क्लेशात याहवेहने दुःखाची भर घातली आहे; मी उसासे टाकून थकून गेलो आहे आणि मला काही विश्रांती मिळत नाही.’

  18. परंतु याहवेहने मला तुला हे सांगण्यास म्हटले, ‘याहवेह असे म्हणतात: जे मी बांधलेले आहे ते मी नष्ट करेन, संपूर्ण पृथ्वीवर मी जे पेरले, ते मीच उपटून टाकेन.

  19. मग तू स्वतःसाठी मोठमोठ्या गोष्टी मिळवू पाहतोस काय? तसे करू नकोस, कारण या सर्व लोकांवर मी महान विपत्ती आणणार असलो, तरी मात्र तू जिथे जाशील, तिथे मी तुझा जीव वाचवेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”

  20. राष्ट्रांसंबंधी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:

  21. मी हे काय पाहात आहे? ते भयभीत झालेले आहेत, ते माघार घेत आहेत, त्यांचे योद्धे पराजित झाले आहेत. मागे वळूनदेखील न पाहता ते घाईघाईत पळत आहेत, आणि सर्वत्र आतंक पसरला आहे,” याहवेह जाहीर करतात.

  22. इजिप्त नाईल नदीसारखी उभारून येत आहे, पाण्याने उफाळणार्‍या नदीसारखी. ती म्हणते, ‘मी उभारेन व पृथ्वी व्यापून टाकेन; मी नगरांना व त्यांच्या लोकांना नष्ट करेन.’

  23. कारण हा दिवस प्रभू, सर्वसमर्थ याहवेहचा आहे— हा सूड उगविण्याचा, त्यांच्या शत्रूंवर सूड उगविण्याचा दिवस आहे. रक्त पिऊन तिची तृप्ती होईपर्यंत तलवार तृप्त होईपर्यंत गिळंकृत करीत राहील. कारण प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, उत्तरेकडील फरात नदीकाठील प्रदेशात यज्ञार्पण करणार.

  24. यानंतर याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला जो संदेश दिला तो इजिप्तवर हल्ला करावयास येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याविषयी होता:

  25. तुमचे योद्धे कोलमडून का पडले? ते उभे राहू शकत नाहीत, कारण याहवेहने त्यांना खाली ढकलले आहे.