God
God चा उल्लेख असलेली वचने
त्यांचा संदेश आम्हाला अनुकूल असो वा प्रतिकूल, आम्ही आमच्या याहवेहच्या आज्ञा पाळू, आम्ही तुला ज्यांच्याकडे विनंती करण्यास पाठवित आहोत, त्या आमच्या परमेश्वर याहवेहचे आम्ही ऐकू.”
दहा दिवसांनी यिर्मयाहला याहवेहचे वचन आले.
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपली विनंती सादर करण्यासाठी मला याहवेह, इस्राएलाच्या परमेश्वराकडे पाठविले, ते असे म्हणतात:
‘तुम्ही जर याच देशात राहिलात तर मी तुम्हाला उभारेन आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार नाही; मी तुम्हाला रोपीन, आणि उपटून टाकणार नाही, कारण तुमच्यावर अरिष्ट आणल्याचा मला अनुताप होत आहे.
आता ज्याला तुम्ही घाबरता त्या बाबेलच्या राजाचे मुळीच भय बाळगू नका. त्याला भयभीत होऊ नका, याहवेह असे जाहीर करतात, कारण मी तुम्हासह असेन व तुम्हाला त्याच्या हातातून सोडवेन.
त्याने तुमच्यावर दया करावी व तुम्हाला तुमच्या भूमीवर परत पुनर्वसित करावे म्हणून मी तुमच्यावर दया करेन.’
“परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा धिक्कारून म्हणाल, ‘आम्ही येथे राहणार नाही,
तर तुम्हाला याहवेहचे हे वचन मिळत आहे, हे यहूदीयाच्या अवशेषा, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘जर तुम्ही इजिप्तमध्ये जाण्याचा व तिथेच राहण्याचा हट्ट कराल,
तुमच्यापैकी इजिप्तमध्ये जाऊन राहण्याचा आग्रह धरणार्या प्रत्येकाची हीच गत होईल. होय, तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल तिथे मी तुमच्यावर जी संकटे आणेन त्यातून तुमच्यापैकी एकही वाचणार नाही.’
कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘यरुशलेमच्या लोकांवर माझ्या रागाचा व क्रोधाचा वर्षाव झाला, तसाच तुम्ही इजिप्तमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्यावर होईल. तिथे तुम्ही घृणा, शाप व उपहासाचा विषय व्हाल; तुम्हाला हा देश परत कधी दिसणार नाही.’
“कारण याहवेहने तुम्हाला म्हटले आहे. ‘अहो यहूदीयातील अवशिष्ट लोकांनो, इजिप्तमध्ये जाऊ नका! आज मी तुम्हाला इशारा दिला आहे, तो कधी विसरू नका.
तुम्ही ही भयानक चूक केली आहे, तुम्हीच मला याहवेह, तुमच्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी पाठविले होते व सांगितले की आमच्या याहवेह परमेश्वराकडे प्रार्थना करून ते काय म्हणतात ते सर्व आम्हाला सांग, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे करू.’
याहवेह तुमचे परमेश्वर यांनी जे सांगण्यास मला तुमच्याकडे पाठविले, ते मी तुम्हाला आज सांगितले, परंतु तुम्ही ते अद्यापि पाळले नाही.
जेव्हा यिर्मयाहने याहवेहचे वचन सर्व लोकांना सांगणे संपविले—जे सर्व त्यांना सांगण्यास याहवेह त्यांचे परमेश्वर यांनी त्याला पाठविले होते—तेव्हा
होशयाहचा पुत्र अजर्याह, कारेहचा पुत्र योहानान व इतर सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाहला म्हणाली: “तू खोटे बोलतोस! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन तिथे वसती करू नये,’ असे आम्हाला सांगण्यास तुला आमचे परमेश्वर याहवेहने पाठविले नाही.
अशाप्रकारे कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख व सर्व लोकांनी यहूदीयात राहण्याची याहवेहची अवज्ञा केली.
त्यांनी याहवेहची आज्ञा न पाळता इजिप्तमध्ये प्रवेश केला आणि ते तहपनहेस पर्यंत येऊन पोहोचले.
तहपनहेस येथे यिर्मयाहला याहवेहचे वचन आले:
आणि मग त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला इजिप्तमध्ये पाठवेन. मी त्याचे सिंहासन याच लपविलेल्या धोंड्यावर स्थापन करेन; मग तो त्यावर आपला राजमंडप पसरेल.
“सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: यरुशलेम व यहूदीयाची सर्व नगरे यांच्यावर मी कसा विनाश आणला, ते तुम्ही पाहिले आहे. ते आता टाकलेल्या लोकागत भग्नावशेषात निवास करतात,
त्यांनी केलेल्या दुष्टाईमुळेच असे झाले. त्यांनी इतर दैवतांना धूप जाळला व त्यांची आराधना केली म्हणून माझा क्रोध त्यांच्यावर भडकला. अशी दैवते जी त्यांना किंवा तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनाही माहीत नव्हती.
मी माझे सेवक संदेष्टे त्यांच्याकडे वारंवार पाठविले, हे सांगण्यास, ‘ज्यांचा मला तिरस्कार वाटतो, त्या घृणास्पद गोष्टी करू नका!’
यामुळे माझा क्रोधाग्नी उफाळून आला; त्याचा यहूदीयातील नगरांवर, यरुशलेमच्या रस्त्यावर वर्षाव झाला. त्याने ती नगरे ओसाड केली, जसे ते आजही आहेत.
“आता सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही स्वतःवर विनाश आणला. यहूदीयातील तुमचे पुरुष, स्त्री, अथवा लेकरे व तान्हीमुले देखील वाचणार नाहीत व तुमचे कोणीही अवशेष राहणार नाहीत असे तुम्ही का करीत आहात?
इथे तुम्ही बनविलेल्या मूर्ती केल्या. इजिप्तमध्ये, जिथे तुम्ही निवास करण्यास आला आहात, तेथील इतर दैवतांना धूप जाळून, तुम्ही माझा क्रोध का भडकावित आहात व तुमचा पूर्ण नाश करावयाला मला का लावत आहात? तुम्ही स्वतःस पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शाप व त्यांच्या उपहासाचा विषय बनवित आहात.