मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “रेखाबी लोकांच्या घराण्याकडे जा आणि त्यांना याहवेहच्या मंदिरातील एखाद्या आतील खोलीत ने आणि द्राक्षारस प्यावयास दे.”

  2. सर्वांना मी याहवेहच्या मंदिरात आणले व इग्दल्याह, परमेश्वराच्या मनुष्याचा पुत्र, हानानाचे पुत्र जी खोली वापरीत असत, त्या खोलीत त्यांना नेले. ही खोली राजवाड्याचे अधिकारी वापरीत असलेल्या खोलीच्या बाजूस आणि मंदिराचा द्वारपाल शल्लूमचा पुत्र मासेयाह, याच्या खोलीच्या बरोबर वर होती.

  3. नंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:

  4. “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: जा आणि यहूदीयाच्या लोकांना व जे यरुशलेममध्ये राहतात त्यांना सांग, ‘रेखाबवंशातील घराण्याकडून तुम्ही काही धडा शिकून माझी वचने का पाळली नाहीत?’ याहवेह असे जाहीर करतात.

  5. ‘रेखाबचा पुत्र यहोनादाब याने त्याच्या वंशजांना आज्ञा दिली होती की द्राक्षारस पिऊ नये, आणि ही आज्ञा त्यांनी पाळली. त्यांच्या पूर्वजांची आज्ञा पाळण्याकरिता, आजतागायत ते द्राक्षारस पीत नाहीत. मी तुमच्याशी पुन्हापुन्हा बोललो, पण माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या नाहीत.

  6. पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही.

  7. रेखाबचा पुत्र यहोनादाबच्या वंशजांनी आपल्या पित्याच्या आज्ञा संपूर्णपणे पाळल्या आहेत, पण या लोकांनी माझ्या आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे.’

  8. “म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘ऐका! मी यहूदीयावर व यरुशलेमवर जी अरिष्टे आणण्याची घोषणा केली होती ती अरिष्टे आणेन. मी त्यांच्याशी बोललो, पण ते ऐकत नाहीत; मी हाक मारतो, तेव्हा ते उत्तर देत नाहीत.’ ”

  9. मग यिर्मयाह रेखाबी लोकांच्या कुटुंबाकडे वळून त्यांना म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘तुम्ही तुमचे पूर्वज यहोनादाबचे प्रत्येक बाबतीत आज्ञापालन केले व त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्या.’

  10. म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘रेखाबचा पुत्र योनादाबच्या वंशामध्ये माझी सेवा करणाऱ्यांचा कधीही अभाव होणार नाही.’ ”

  11. योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाहला याहवेहचे हे वचन आले:

  12. “तू एक गुंडाळी घेऊन त्याच्यावर इस्राएल, यहूदीया व इतर राष्ट्रे यांच्याविषयी योशीयाहच्या काळापासून आतापर्यंत मी जे सर्व संदेश देत आलो आहे, ते लिही.

  13. जी भयानक संकटे मी यहूदीयाच्या लोकांवर आणणार आहे, ती त्यांनी चर्मपत्रावर लिहिलेली प्रत्यक्ष पाहिली, तर कदाचित ते त्यांच्या दुष्टकर्मापासून मागे वळतील; मग मी त्यांच्या दुष्कर्माची व पापांची क्षमा करेन.”

  14. तेव्हा यिर्मयाहने नेरीयाहचा पुत्र बारूख, याला बोलावून त्याला याहवेहने सांगितलेली सर्व वचने बोलून दाखविली आणि बारूखने ते चर्मपत्रावर लिहिले.

  15. मग यिर्मयाह नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाला, “माझ्यावर इथे प्रतिबंध लावण्यात आला आहे; मला याहवेहच्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही.

  16. म्हणून उपवासाच्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जा आणि मी सांगून तू चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने वाचून दाखव. त्या दिवशी यहूदीया प्रांताच्या नगरांतून आलेल्या सर्व लोकांना वाचून दाखव.

  17. कदाचित ते याहवेहकडे क्षमेची याचना करतील व आपल्या दुष्ट मार्गापासून वळतील, कारण या लोकांविरुद्ध याहवेहने उच्चारलेले संताप व प्रकोप अत्यंत घोर आहेत.”

  18. यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूखने ते सर्व केले; याहवेहच्या मंदिरात चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने लोकांना वाचून दाखविली.

  19. योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती.

  20. शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.

  21. शाफानचा नातू, गमर्‍याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली,

  22. याउलट, राजाने राजपुत्र यरहमेल, अज्रीएलचा पुत्र सेरायाह व अब्देलचा पुत्र शेलेम्याह यांना हुकूम केला की त्यांनी नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूख व यिर्मयाह संदेष्टा यांना अटक करावी. परंतु याहवेहने त्यांना लपवून ठेवले.

  23. राजाने यिर्मयाह संदेष्ट्याला सांगून नेरीयाहचा पुत्र बारूखाने लिहिलेली वचने असलेले ते चर्मपत्र जाळून टाकल्यावर, यिर्मयाहला याहवेहची वचने आली:

  24. याशिवाय यहूदीयाचा राजा यहोयाकीमला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू ते चर्मपत्र जाळले व म्हटले, “बाबेलचा राजा निश्चितच येईल व हा देश नष्ट करेल आणि मनुष्य व पशूंना पूर्णपणे नाहीसे करेल, असे त्या चर्मपत्रावर का लिहिले?”

  25. म्हणून यहूदीयाचा राजा यहोयाकीमविषयी, याहवेह असे म्हणतात: दावीदाच्या राजासनावर बसण्यासाठी त्याला कोणीही वारस असणार नाही; त्याचे प्रेत बाहेर दिवसा उन्हामध्ये व रात्रीच्या हिवात पडून राहील.