मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “या नगराबद्धल तुम्ही असे म्हणता, ‘तलवार, दुष्काळ व मरी यामुळे हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती पडेल, परंतु याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात:

  2. परंतु माझ्या महाक्रोधाने व उग्र कोपाने मी त्यांना ज्या देशात हाकलून दिले, त्या सर्व देशातून मी माझ्या लोकांना एकत्र करेन; मी त्यांना याच ठिकाणी परत आणेन आणि ते सुरक्षितपणे वस्ती करतील.

  3. मग ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.

  4. मी त्यांना एकनिष्ठ अंतःकरण व एकमात्र कार्य देईन, जेणेकरून ते नेहमी माझे भय धरतील आणि त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचे सर्वदा कल्याण होईल.

  5. मी त्यांच्याबरोबर अनंतकाळचा करार करेन: मी त्यांचे कल्याण करणे कधीही थांबविणार नाही, त्यांना माझे भय धरण्यास प्रोत्साहित करेन, जेणेकरून ते माझ्यापासून कधीही विमुख होणार नाहीत.

  6. त्यांचे कल्याण करण्यात मला आनंद वाटेल व माझ्या पूर्ण मनाने व आत्म्याने मी त्यांना या देशामध्ये पुन्हा स्थापन करेन.

  7. “याहवेह म्हणतात ते असे: ही सर्व भयंकर संकटे मी या लोकांवर आणली, म्हणून आता मी त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे समृद्धी देईन.

  8. बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.”

  9. यिर्मयाह अद्यापही तुरुंगात असताना याहवेहचे त्याला दुसऱ्यांदा वचन आले:

  10. “याहवेह असे म्हणतात, आकाश व पृथ्वी ज्यांनी निर्माण केली व स्थापित केली—ज्यांचे नाव याहवेह आहे, ते म्हणतात:

  11. ‘मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला माहीत नसलेल्या महान आणि शोधता न येणाऱ्या गोष्टी तुला सांगेन.’

  12. याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, या नगरातील जी घरे आणि यहूदीयातील राजवाडे वेढा देऊन व तलवारीच्या प्रहाराचा उपयोग करून पाडून टाकण्यात आले आहेत, त्याविषयी असे म्हणतात,

  13. बाबेलांशी युद्ध करताना: ‘ज्या लोकांवर मी माझ्या कोपाने प्रहार करणार आहे, ते त्या लोकांच्या शवांनी भरून जातील. त्यांनी केलेल्या सर्व दुष्टतेमुळे मी या नगराला विमुख होईन.

  14. “ ‘तरी देखील, मी यरुशलेमला आरोग्य व स्वास्थ्य प्रदान करेन; मी त्यांना आरोग्य देईन व विपुल शांती आणि सुरक्षितेचा आनंद उपभोगू देईन.

  15. मी यहूदीया आणि इस्राएलना बंदिवासातून परत आणेन व त्यांची पुनर्बांधणी करून त्यांना पूर्ववत करेन.

  16. त्यांनी माझ्याविरुद्ध केलेली सर्व पापे मी शुद्ध करेन, आणि माझ्याविरुद्ध बंडखोरी करून केलेल्या सर्व पापांची क्षमा करेन.

  17. मग पृथ्वीवरील जी सर्व राष्ट्रे मी त्यांच्यासाठी केलल्या सर्व चांगल्या गोष्टी ऐकतील, त्यांच्यापुढे हे नगर मला बहुमानास्पद, आनंददायक, प्रशंसा व आदर देणारे होईल; माझ्या लोकांना मी प्रदान केलेली विपुल समृद्धी व शांती पाहून, त्या राष्ट्रांना दरारा व आदरयुक्त भीती वाटेल.’

  18. “याहवेह असे म्हणतात: ‘या नगराविषयी तुम्ही म्हणता, “हे उद्ध्वस्त झालेले ठिकाण आहे, इथे ना लोक राहतात ना पशू.” तरी देखील वैराण झालेल्या यहूदीयाच्या नगरात व यरुशलेमच्या रस्त्यांवर पुन्हा ते स्वर ऐकू येतील.

  19. आनंद व हर्षाचे स्वर, वरांचे आणि वधूंचे आवाज आणि याहवेहला उपकारस्तुतीची अर्पणे आणणार्‍यांची हर्षगीते पुन्हा ऐकू येतील. ते म्हणतील, “याहवेहला धन्यवाद द्या, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.” मी हा देश आधी होती तशी समृद्धी परत देऊन पुनर्वसित करेन,’ याहवेह असे म्हणतात.

  20. “याहवेह असे म्हणतात: ‘कोणीही मनुष्य व पशू नसलेल्या या उजाड ठिकाणी—यातील सर्व नगरात कळपांना विश्रांती मिळण्यासाठी मेंढपाळांना कुरणे मिळतील.

  21. पश्चिमेकडील डोंगरातील गावात व तळवटीत, व नेगेवच्या गावात, बिन्यामीन प्रांतात, यरुशलेमच्या सभोवतालच्या प्रदेशात आणि यहूदीयाच्या सर्व नगरात, मोजणाऱ्यांच्या हाताखालून पुन्हा त्यांचे कळप जातील,’ असे याहवेह म्हणतात.

  22. “ ‘असे दिवस येतील, जेव्हा इस्राएल व यहूदीयाला दिलेले अभिवचन मी पूर्ण करेन, याहवेह जाहीर करतात.

  23. “ ‘त्या दिवसात व त्या समयी मी दावीदाच्या वंशातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन; आणि तो या राष्ट्रात न्यायाने व नीतीने कार्य करेल.

  24. त्या दिवसात यहूदीयाचा बचाव होईल व यरुशलेम येथील लोक सुरक्षितपणे राहतील. याहवेह जे आमचे नीतिमान तारणकर्ता या नावाने संबोधित करण्यात येईल.’

  25. कारण याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएलाच्या सिंहासनावर बसण्यासाठी दावीदाला वारसाचा अभाव कधीही होणार नाही.