God
God चा उल्लेख असलेली वचने
तसेच माझ्या समक्षतेत निरंतर होमार्पणे, अन्नार्पणे व यज्ञार्पणे करण्यासाठी लेवीय याजकाचा अभाव कधीही होणार नाही.’ ”
नंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:
“याहवेह असे म्हणतात, ‘मी दिवसाशी केलेला करार व रात्रीशी केलेला करार तुम्ही मोडू शकला, तर दिवस व रात्र योग्य समयी येणार नाहीत,
मग माझा सेवक दावीद याच्या बरोबरचा माझा करार—त्याचप्रमाणे माझ्या समक्षतेत उभे राहून सेवा करणारे लेवीय याजक यांच्या बरोबरचा माझा करार—भंग पावू शकेल आणि दावीदाच्या सिंहासनावर बसून राज्य करण्यास त्याचा कोणीही वंशज असणार नाही.
ज्याप्रमाणे आकाशातील तारे मोजता येत नाहीत व समुद्र किनार्यावरील वाळूचे मापन करता येत नाही, त्याचप्रमाणे माझा सेवक दावीद याचे वंशज आणि माझी सेवा करणाऱ्या लेवी वंशज यांना मी असंख्य करेन.’ ”
याहवेहचे वचन यिर्मयाहला आले:
“लोक काय म्हणतात ते तुझ्या लक्षात आले आहे काय, ते म्हणतात, ‘याहवेहने निवडलेल्या यहूदीया व इस्राएल राज्यांचा त्याग केला’? म्हणून ते माझ्या लोकांची घृणा करतात आणि त्यांना एक राष्ट्र म्हणून ओळखत नाहीत.
यावर याहवेह असे म्हणतात: ‘जर मी रात्र व दिवस यांच्याशी करार केला नसता व आकाश व पृथ्वी स्थापित केले नसते,
तर मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या या वंशजांवर राज्य करण्यास याकोबाचे व माझा सेवक दावीदाचे वंशज नाकारले असते व दावीदाच्या पुत्राला निवडले नसते. पण मी त्यांची पूर्वीची समृद्धी त्यांना परत देईन व त्यांच्यावर दया करेन.’ ”
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, त्याची संपूर्ण सेना व त्याच्या अंकित असलेल्या सर्व राज्यांच्या व लोकांच्या सेना, यरुशलेम व सभोवतालची सर्व नगरे यांच्याबरोबर युद्ध करीत असताना, यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:
“इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याला जाऊन सांग की याहवेह म्हणतात, ‘मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हातात देईन व तो ते जाळून टाकील.
“ ‘परंतु हे सिद्कीयाह, यहूदीयाच्या राजा, याहवेहचे हे वचन ऐक! याहवेह तुझ्याविषयी असे म्हणतात: तलवारीने तुझा वध होणार नाही;
पण तू शांतीने मरण पावशील. जसा तुझ्याआधी होऊन गेलेल्या राजांसाठी लोकांनी सन्मानदर्शक मृतकाग्नी जाळला, तसा तुझ्या सन्मानार्थही जाळतील आणि ते तुझ्यासाठी विलाप करून म्हणतील, “हाय हाय! आमच्या स्वामी!” मी स्वतः हे वचन देत आहे, असे याहवेह घोषित करतात.’ ”
यहूदीयाचा राजा, सिद्कीयाह, याने सर्व गुलामांची मुक्तता करण्याचा यरुशलेममधील लोकांशी करार केल्यानंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले.
मग यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:
“इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले, त्यावेळी मी त्यांच्याशी एक करार केला होता. मी म्हटले,
‘प्रत्येक सातव्या वर्षी कोणत्याही इब्री गुलामाला, ज्याने स्वतःस तुम्हाला विकले होते, त्यांना तुम्ही मुक्त केले पाहिजे. सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही त्यांना मुक्त केले पाहिजे.’ तुमच्या पूर्वजांनी मात्र माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही.
अलीकडेच तुम्ही पश्चात्ताप केला व माझ्या दृष्टीने योग्य ते केले: आपल्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा केली. आम्ही तसे करू, असे तुम्ही मला माझे नाव धारण केलेल्या मंदिरात शपथपूर्वक वचन दिले होते.
परंतु आता तुम्ही मागे वळले व माझे नाव अपवित्र केले; प्रत्येकाने त्यांना हवे तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य असण्यास मुक्त केलेले दास व दासी परत घेतले. यांना परत गुलाम होण्याची बळजबरी केली.
“म्हणून याहवेह असे म्हणतात: तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही; तुमच्या स्वतःच्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा करीत नाही. म्हणून मी आता तुमची ‘मुक्तता’ करेन, असे याहवेह जाहीर करतात—युद्ध, दुष्काळ व मरी यांच्याद्वारे तुम्हाला मरणाची ‘मुक्तता’ मिळेल. सर्व जगातील राज्यात मी तुम्हाला घृणास्पद असे करेन.
ज्यांनी माझा करार मोडला व माझ्या करारातील अटी पूर्ण करण्याचे नाकारले आहे, त्यांना ज्याप्रमाणे वासरू कापून त्याचे दोन भाग करून त्यामधून चालत जावे, त्याचप्रमाणे मी त्यांना वागवेन.
मी जे तुम्हाला ठार करू पाहतात त्या तुमच्या शत्रूंच्या हवाली करेन. त्यांची प्रेते पक्षी व हिंस्र श्वापदांचे अन्न होतील.
“बाबेलच्या राजाचे सैन्य या शहरातून काही काळासाठी गेले असले, तरी मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे अधिकारी यांना जे त्यांना ठार करू पाहतात, त्या त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.
मी हा आदेश देणार आहे, असे याहवेह जाहीर करतात, मी त्यांना या शहरात परत आणेन. ते पुन्हा या नगरांविरुद्ध लढतील, ते जिंकतील व त्यास जाळून टाकतील. यहूदीयाची सर्व शहरे मी अशी ओसाड करेन जिथे कोणीही वसती करू शकणार नाही.”
योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम, हा यहूदीयाचा राजा असताना, यिर्मयाहला याहवेहकडून आलेले वचन हेच आहे: