God
God चा उल्लेख असलेली वचने
त्या समयी तरुण कुमारिका नृत्य करून हर्षावतील, तरुण व ज्येष्ठ लोकही त्यात सहभागी होतील. कारण मी त्यांच्या विलापाचे आनंदात रूपांतर करेन; मी त्यांचे सांत्वन करेन आणि दुःखाऐवजी त्यांना हर्ष प्रदान करेन.
मी मंदिरातील याजकांना विपुल पुरवठ्याने समाधानी करेन, आणि माझे लोक भरघोस साठ्याने तृप्त होतील.” असे याहवेह जाहीर करतात.
याहवेह असे म्हणतात: “रामाह मधून आवाज ऐकू येत आहे, शोक आणि घोर आकांत, राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे. ती सांत्वन पावण्यास नकार देते, कारण ते आता राहिले नाहीत.”
परंतु याहवेह असे म्हणतात: “तुझा रुदनस्वर आणि तुझ्या डोळ्यातील अश्रू आता आवर, कारण तुझ्या कार्यास फलप्राप्ती होणार आहे,” याहवेह असे जाहीर करतात “ते शत्रूच्या देशातून परत येतील.
तुझ्या वंशजासाठी आशा आहे,” याहवेह असे जाहीर करतात. तुझी मुले आपल्या देशात परत येतील.
“मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.
मी भरकटल्यानंतर, मला पश्चात्ताप झाला; मला समज आल्यानंतर, मी दुःखातिशयाने ऊर बडवून घेतला. माझ्या तरुणपणाच्या दिवसात मी जे आचरण केले, त्यामुळे मी लज्जित व अपमानित झालो आहे.’
हा एफ्राईम माझा लाडका पुत्र नाही का, जे माझे लेकरू, मला अत्यंत सुखदायक? जरी मी बरेचदा त्याच्याविरुद्ध बोललो, तरी मला आताही त्याची आठवण येते. म्हणून माझ्या मनाला त्याची ओढ लागली आहे; मला त्याची अत्यंत दया येते.” असे याहवेह जाहीर करतात.
अगे विश्वासघातकी कन्ये, तू कुठवर भटकत राहणार? याहवेह पृथ्वीवर नवीन गोष्ट घडविणार आहेत— स्त्री पुरुषाकडे परत येईल.”
सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “मी जेव्हा बंदिवासातून त्यांना परत आणेन, तेव्हा यहूदीयामधील व त्यांच्या नगरांमधील लोक असे म्हणतील: हे समृद्ध नगरी, ‘हे पवित्र डोंगरा, याहवेह तुला आशीर्वादित करो’
मी थकलेल्यांना व मूर्छित झालेल्यांना ताजेतवाने व संतुष्ट करेन.”
एवढ्यात मी जागा झालो व सभोवती पाहिले. माझी झोप अत्यंत सुखद होती.
याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत जेव्हा लोकांच्या व गुरांच्या वंशजाचे मी इस्राएल व यहूदीयामध्ये रोपण करेन.
जसे त्यांना उपटून टाकताना व विदीर्ण होतांना, जमीनदोस्त होतांना, नष्ट होतांना व विपत्ती येत असताना लक्षपूर्वक नजर ठेवून होतो, तर पुन्हा त्यांचे रोपण व उभारणेही लक्ष लावून बघेन,” असे याहवेह जाहीर करतात.
“असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन,” याहवेह म्हणतात.
“मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे हा करार नसेल. मी जरी त्यांचा पती होतो, तरी त्यांनी माझा करार मोडला.” असे याहवेह जाहीर करतात.
“परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा” याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन, मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.
कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘याहवेहला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील,” असे याहवेह जाहीर करतात. “मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”
याहवेह असे म्हणतात, दिवसा सूर्यप्रकाश द्यावा म्हणून ज्यांनी सूर्याला नियुक्त केले, व रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्र व ताऱ्यांना आज्ञा दिली, गर्जना करणार्या लाटा उसळाव्यात म्हणून जे समुद्र ढवळतात; त्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह असे आहे:
“जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.” याहवेह असे जाहीर करतात.
याहवेह असे म्हणतात: “जर आकाशाचे मोजमाप करता आले असते व पृथ्वीच्या पायांचा थांग लावता आला असता, तर मी माझ्या इस्राएली लोकांच्या सर्व वंशजांना त्यांनी जे सर्व केले त्याबद्दल त्यांना नाकारले असते,” याहवेह जाहीर करतात.
याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल.
संपूर्ण खोरे जिथे प्रेते व राख फेकण्यात येत असे, व त्याचप्रमाणे किद्रोनच्या खोऱ्यापर्यंतची आणि तिथून पूर्वेकडील घोडवेशी पर्यंतची सर्व शेते याहवेहला पवित्र अशी होतील. या नगराचा पुन्हा कधीही पाडाव किंवा विध्वंस होणार नाही.”
यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या राजवटीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, याहवेहकडून यिर्मयाहला पुढील वचन प्राप्त झाले:
यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला कैदेत टाकले, असे म्हणून, “तू असा संदेश का देतोस? तू म्हणतोस याहवेह असे म्हणतात: ‘मी आता बाबेलच्या राजाच्या हातात हे नगर देणार आहे, आणि तो ते हस्तगत करणार आहे.