God
God चा उल्लेख असलेली वचने
मग तुम्ही माझ्याकडे याल व माझी प्रार्थना कराल, तेव्हा त्या मी ऐकेन.
तुम्ही माझा शोध कराल, मनापासून माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन.”
याहवेह जाहीर करतात, “मी तुम्हाला आढळेन व तुमच्या दास्यातून तुम्हाला परत आणेन, तुम्हाला ज्या सर्व राष्ट्रातून व ठिकाणाहून इतर देशात बंदिवासात पाठविले, तर तुम्हाला त्याच ठिकाणी परत आणेन,” असे याहवेह जाहीर करतात.
तुम्ही म्हणाल, “याहवेहने बाबेलमध्ये आपल्यासाठी संदेष्टे उभे केले आहेत,”
परंतु याहवेह असे म्हणतात, जो दावीदाच्या सिंहासनावर बसलेला राजा आणि या नगरात उरलेल्या लोकांबद्दल आहे, जे तुमचे बांधव म्हणून बंदिवासात गेले नाहीत—
होय, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन, व त्यांना नासक्या आणि खाण्यास अयोग्य अशा अंजिरासारखे करेन.
मी त्यांचा तलवार, दुष्काळ व मरीने पाठलाग करेन, जगभरातील सर्व राष्ट्राचे लोक त्यांची घृणा करतील, व त्यांना मी जिथेही हाकलून लावले तेथील लोक शाप देतील, त्यांची नाचक्की करतील, त्यांची चेष्टा करतील.
कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही, माझी वचने घेऊन माझे सेवक संदेष्टे मी त्यांच्याकडे पुनः पुन्हा पाठविले, परंतु तुम्ही बंदिवानांनीही माझे ऐकण्यास नकार दिला,” असे याहवेह जाहीर करतात.
म्हणून यरुशलेम येथून बाबिलोन येथे मी पाठविलेल्या सर्व यहूदी बंदिवानांनो, आता याहवेहचे वचन ऐका.
सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर कोलायाहचा पुत्र अहाब व मासेयाहचा पुत्र सिद्कीयाह या तुमच्या खोट्या संदेष्ट्याविषयी असे म्हणतात: “त्यांचा तुमच्यासमोर जाहीरपणे वध व्हावा म्हणून मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हवाली करणार आहे.
ज्या लोकांना यहूदीयामधून खास्द्यांमध्ये बंदिवान म्हणून नेले, ते शाप देताना म्हणतील: ‘ज्याप्रमाणे बाबेलच्या राजाने सिद्कीयाह व अहाब यांना जिवंत जाळले, त्यांच्याप्रमाणेच याहवेह तुझे करो.’
कारण त्यांनी इस्राएलमध्ये एक अति घृणास्पद कृत्य केले आहे; त्यांनी आपल्या शेजार्यांच्या स्त्रियांशी व्यभिचार केला, आणि माझ्या नावाने खोटे संदेश दिले—जो अधिकार मी त्यांना दिला नव्हता. हे मला माहीत आहे, कारण त्यांचे प्रत्येक कृत्य मी पाहिले आहे,” असे याहवेह जाहीर करतात.
“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तू स्वतःच्या नावाने मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक याला, इतर सर्व याजकांना व यरुशलेममधील प्रत्येकाला पत्रे लिहिली आहेस. तू सफन्याहला असे म्हटले,
‘यहोयादाच्या जागेवर याजक म्हणून याहवेहने तुला नेमले आहे; म्हणून एखादा वेडा मनुष्य स्वतःला संदेष्टा म्हणवू लागला, तर त्याला खोड्यात घालून लोखंडी गळपट्टा घालण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे.
तेव्हा याहवेहचे यिर्मयाहला हे वचन मिळाले:
“खास्द्यांमध्ये बंदिवासात असलेल्या सर्वांना हा संदेश पाठव: ‘नेहेलामी शमायाहविषयी याहवेह असे म्हणतात: कारण त्याला मी पाठविले नसतानाही त्याने तुम्हाला संदेश दिला, आणि त्याच्या खोट्या वचनावर विश्वास ठेवण्यास तुम्हाला विवश केले,
याहवेह असे म्हणतात: मी नेहेलामी शमायाहला व त्याच्या वंशजांना निश्चितच शिक्षा करेन. त्याच्या लोकांपैकी कोणीही हयात राहणार नाही, माझ्या लोकांचे जे अभीष्ट मी करणार आहे, ते तो बघू शकणार नाही, असे याहवेह जाहीर करतात, कारण माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्याचा त्याने संदेश दिला आहे.’ ”
याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:
“इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला सांगितलेली सर्व वचने एका नोंदवहीत लिहून ठेव.
याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत की जेव्हा मी इस्राएल आणि यहूदीयातील माझ्या लोकांना बंदिवासातून परत आणेन व त्यांच्या पूर्वजांना मी वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पुनर्स्थापित करेन,’ असे याहवेह म्हणतात.”
इस्राएल व यहूदीया यांच्यासंबंधी याहवेह असे म्हणतात:
“याहवेह म्हणतात: “ ‘त्यांचा भयभीत आक्रोश ऐकू येत आहे— शांती नव्हे, तर दहशत.
विचारून पाहा: पुरुष मुले प्रसवू शकतात काय? मग प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांप्रमाणे आपल्या पोटावर हात ठेऊन मेल्यागत फिक्के पडलेल्या चेहऱ्याचे बलवान पुरुष मला का दिसत आहेत?
“कारण सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘त्या दिवशी,’ मी त्यांच्या मानेवरचे जू मोडून टाकेन, त्यांच्या बेड्या तोडेन, आणि यापुढे परकीय लोक त्यांना गुलाम करणार नाहीत;
याउलट, ते व दावीद, त्यांचा राजा, ज्याला मी त्यांच्यातून उभारेन, ते त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करतील!