मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. नगरीला वेढा घाला; कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. तिच्या कृत्याची परतफेड करा; तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला उद्दामपणे तुच्छ लेखले,

  2. म्हणून, तिचे तरुण रस्तोरस्ती धराशायी होतील; त्या दिवशी तिचे सर्व योद्धे निःशब्द होतील,” हे याहवेह जाहीर करतात.

  3. “पाहा, अहो गर्विष्ठ लोकांनो, मीच तुमच्याविरुद्ध आहे आता तुमचा दिवस आला आहे, तुम्हाला शिक्षा देण्याचा समय आला आहे! प्रभू सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.

  4. गर्विष्ठ अडखळतील व पडतील, तिला मदतीचा हात देऊन कोणीही उठविणार नाही; मी तिच्या नगरांमध्ये अग्नी पेटवेन तो अग्नी सभोवतालचे सर्वकाही गिळंकृत करेल.”

  5. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “इस्राएलाच्या लोकांवर जुलूम झाला आहे. व यहूदीयाच्या लोकांवरही झाला आहे. त्यांना कैद करणार्‍यांनी त्यांना घट्ट पकडून ठेवले आहे व त्यांना जाऊ देण्याचे ते नाकारतात.

  6. परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत; सर्वसमर्थ याहवेह असे त्यांचे नाव आहे. ते जोमाने त्यांचा बचाव करतील आणि इस्राएली देशात त्यांना शांतीने राहता यावे, म्हणून ते त्यांच्या भूमीला शांती प्रदान करतील, परंतु, बाबेलच्या लोकांना अशांती मिळेल.

  7. “बाबेलवर तलवारीचा प्रहार होईल! ती बाबेलमध्ये राहणाऱ्या लोकांवर आणि तिच्या अधिपतींवर, सुज्ञ लोकांवरही प्रहार करेल! याहवेह असे जाहीर करतात.

  8. याहवेह जाहीर करतात, जसा मी परमेश्वराने सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश केला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही. त्यात लोक वस्ती करणार नाहीत.

  9. यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्‍या सिंहाप्रमाणे, बाबेलच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”

  10. बाबेलविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. बाबेलच्या लोकांच्या भूमीविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.

  11. याहवेहचे म्हणणे हे असे आहे, “बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांवर चाल करून जाण्यास मी एका संहारक आत्म्याला प्रेरित करेन.

  12. त्यांची भूमी इस्राएलच्या पवित्र परमेश्वरासमोर जरी तिच्या अपराधाने भरलेली आहे तरीही त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेह यांनी इस्राएल व यहूदीयाचा त्याग केला नाही.

  13. “बाबेलमधून पलायन करा! आपला जीव वाचविण्यास पळा! तिच्या पापांमुळे तुम्ही तुमचा नाश करून घेऊ नका. हा याहवेहचा सूड घेण्याचा समय आहे; ज्यास ती पात्र आहे, त्याचा मोबदला ते तिला देतील.

  14. बाबिलोन याहवेहच्या हातातील सुवर्णपात्र होते; तिने संपूर्ण पृथ्वीला ते पाजून मद्यधुंद केले. सर्व राष्ट्र तिचे मद्य प्याले; म्हणून आता ते वेडे झाले आहेत.

  15. “ ‘याहवेहने आम्हाला निर्दोष घोषित केले आहे; चला, आपण सीयोनात जाऊन सांगू आमचे परमेश्वर याहवेहने काय केले आहे.’

  16. “बाणांना धार लावा, ढाली उचलून घ्या! याहवेहनी मेदियाच्या राजाला प्रेरित केले आहे, कारण त्यांचा हेतू बाबेलचा नाश करण्याचा आहे. याहवेह बाबेल्यांचा सूड उगवतील, हा त्यांच्या मंदिराबद्दलचा सूड आहे.

  17. बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.

  18. सर्वसमर्थ याहवेह, स्वतःच्याच नावाची शपथ घेतातः मी निश्चितच तुम्हाला टोळधाडीसारख्या असंख्य सैनिकांनी भरून टाकेन आणि लोक तुमच्यावरील विजयोन्मादाने गर्जना करतील.

  19. “त्यांनी त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले.

  20. जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघ गर्जना करतात; ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. ते विजा आणि पाऊस पाठवितात आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.

  21. परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.

  22. “तू माझ्या युद्धाचा सोटा आहेस. माझे युध्दशस्त्र— तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना डळमळीत करेन, तुझ्याद्वारे मी राज्ये नष्ट करेन,

  23. तुझ्याद्वारे मी घोडा आणि घोडेस्वाराचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी रथ आणि सारथी यांचा संपूर्ण नाश करेन,

  24. तुझ्याद्वारे मी पुरुष व स्त्रीचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी वृद्धाचा व तरुणाचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी तरुण व तरुणींचा संपूर्ण नाश करेन,

  25. तुझ्याद्वारे मी मेंढपाळांचा आणि कळपांचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी शेतकर्‍यांचा आणि बैलांचा संपूर्ण नाश करेन, तुझ्याद्वारे मी राज्यपालांचा आणि अधिपतींचा संपूर्ण नाश करेन.