मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि सर्व कास्य ते बाबेलास घेऊन गेले.

  2. याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी व त्याखालील बारा बैल आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते.

  3. तिचे प्रतिपक्षी तिचे मालक बनले आहेत; तिचे शत्रू सुखात आहेत. याहवेहने तिला दुःख दिले आहे, कारण तिने अनेक पापे केली आहेत. तिचे बालक बंदिवासात गेले आहेत. ते तिच्या शत्रूचे गुलाम झाले आहेत.

  4. तिची अशुद्धता तिच्या वस्त्राला चिकटली आहे; तिने तिच्या भविष्याचा विचार केला नाही. तिचे पतन अचंबित करून सोडणारे होते; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे याहवेह, माझी दुर्दशा पाहा, शत्रू विजयी झाला आहे.”

  5. तिच्या सर्व संपत्तीवर तिच्या शत्रूंनी हात टाकला आहे. परकीय राष्ट्रांनी तिच्या पवित्र मंदिरात प्रवेश करताना तिने बघितले होते— तुम्ही निषिद्ध केलेल्यांनी तुमच्या सभास्थानात प्रवेश केला.

  6. अन्नाचा शोध घेत असताना तिचे लोक कण्हत आहेत; मौल्यवान वस्तूच्या मोबदल्यात ते अन्न विकत घेत आहेत जेणेकरून ते जिवंत राहतील. “हे याहवेह, पाहा आणि याकडे लक्ष द्या, मी कशी घृणास्पद झाले आहे.”

  7. या वाटेच्या वाटसरूंनो माझी दुर्दशा पाहून तुम्हाला काहीच वाटत नाही काय? मला जे दुःख देण्यात आले आहे, त्या माझ्या दुःखासारखे दुसरे दुःख आहे काय? याहवेहने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी ही वेदना माझ्यावर लादली आहे.

  8. त्यांनी उच्च स्थानातून अग्नी पाठविला आहे व तो माझ्या हाडांमध्ये जळत आहे. त्यांनी माझ्या पावलात सापळा पसरविला आहे व मला मागे वळविले आहे. त्यांनी मला उद्ध्वस्त केले आहे, मी दिवसभर मूर्छित होत आहे.

  9. माझी पापे गुलामगिरीचे जोखड बनली आहेत; त्यांच्या हातांनी ती एकत्र विणली गेली आहेत. ती माझ्या गळ्यात अडकविण्यात आली आहेत, आणि प्रभूने माझी शक्ती खचविली आहे. मी ज्यांचा सामना करू शकत नाही, त्यांच्या हाती मला दिले आहे.

  10. “माझ्यामध्ये असलेल्या सर्व योद्ध्यांना प्रभूने नाकारले आहे; माझ्या तरुणांना चिरडून टाकण्यासाठी प्रभूंनी एका मोठ्या सैन्यास हजर राहण्यास फर्माविले आहे. त्यांच्या द्राक्षकुंडात प्रभूंनी कुमारी कन्या यहूदीयास तुडविले आहे.

  11. सीयोन हात पसरीत आहे, पण तिचे सांत्वन करण्यास कोणीही नाही. कारण याहवेहने याकोबाविषयी फर्मान काढले आहे तिचे शेजारीच तिचे शत्रू होवोत; तिच्या शेजाऱ्यामध्ये यरुशलेम अमंगळ वस्तूसारखी झाली आहे.

  12. “याहवेह नीतिमान आहेत, तरीसुद्धा मी त्यांच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. सर्व लोकांनो, इकडे लक्ष द्या; माझ्या वेदना पाहा. कारण माझे तरुण व तरुणी बंदिवासात गेले आहेत.

  13. “हे याहवेह, माझ्या वेदना पाहा! माझे अंतःकरण यातनाग्रस्त झाले आहे, आणि माझे हृदय अस्वस्थ झाले आहे. कारण मी अत्यंत बंडखोर झाले होते. बाहेर तलवार मला मृत्यू आणते; आत तर केवळ मरणच आहे.

  14. “लोकांनी माझे कण्हणे ऐकले आहे, पण माझे सांत्वन करण्यास कोणीही नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझ्या संकटांबद्दल ऐकले आहे तुम्ही जे केले ते पाहून त्यांना आनंद झाला आहे; तुम्ही घोषणा केलेला दिवस येवो म्हणजे ते देखील माझ्यासारखेच होतील.

  15. “त्यांची सर्व दुष्कृत्ये तुमच्यापुढे येवोत; माझ्या सर्व पापांमुळे तुम्ही माझ्याशी जसा व्यवहार केला तसाच त्यांच्याशीही करा. माझे उसासे खूप आहेत व माझे हृदय मूर्छित झाले आहे.”

  16. प्रभूने सीयोनकन्येला आपल्या क्रोधरूपी मेघाने कसे आच्छादून टाकले आहे! त्यांनी इस्राएलचे वैभव स्वर्गातून पृथ्वीवर खाली धुळीत फेकले आहे; क्रोधाच्या दिवशी त्यांनी आपल्या पादासनाचेही स्मरण केले नाही.

  17. प्रभूने कसलीच दयामाया न दाखविता याकोबाच्या सर्व आवासांना गिळंकृत केले आहे; त्यांच्या क्रोधाग्नीने यहूदाह कन्येच्या तटबंदीची प्रत्येक भिंत पाडून टाकली आहे. तिचे राज्य व तिचे अधिपती या सर्वांना अपमानित करून त्यांनी जमीनदोस्त केले आहे.

  18. त्यांच्या क्रोधात त्यांनी इस्राएलचे प्रत्येक शिंग नष्ट केले आहे. शत्रूने हल्ला केला तेव्हा त्यांनी त्यांचा संरक्षण करणारा उजवा हात काढून घेतला आहे. पेटलेल्या अग्नीप्रमाणे त्यांनी याकोबाभोवती असलेले सर्वकाही भस्म करून टाकले आहे.

  19. शत्रूसारखे त्यांनी धनुष्य वाकविले आहे; त्यांचा उजवा हात सज्ज झाला आहे. शत्रूसारखे त्यांनी नयनरम्य तरुणांचा संहार केला आहे. त्यांनी त्यांच्या क्रोधाग्नीचा सीयोन कन्येच्या तंबूवर वर्षाव केला आहे.

  20. प्रभू शत्रूसारखे झाले आहेत; त्यांनी इस्राएलला गिळंकृत केले आहे. त्यांनी तिचे सर्व राजवाडे गिळंकृत केले आहेत आणि दुर्ग उद्ध्वस्त केले आहेत. यहूदीया कन्येचा शोक व विलाप त्यांनी बहुगुणित केला आहे.

  21. बागेसारख्या आवासांना त्यांनी उकिरड्यागत केले आहे; त्यांच्या भेटण्याचे स्थान नष्ट केले आहे. याहवेहने सीयोनला तिच्या सर्व निर्धारित उत्सव व शब्बाथाचे विस्मरण केले आहे; राजे व याजक या दोघांना त्यांनी क्रोधित तिरस्काराने नाकारले आहे.

  22. प्रभूने आपल्या वेदीस नाकारले आहे आणि त्यांच्या पवित्रस्थानाचा त्याग केला आहे. त्यांनी तिच्या राजवाड्यांच्या भिंती तिच्या शत्रूंच्या हातात दिल्या आहेत; एका निर्धारित उत्सवाच्या दिवसात करण्याचा जयघोष याहवेहच्या भवनात त्यांच्या शत्रूंनी केला आहे.

  23. सीयोन कन्येच्या भिंतींना धराशायी करण्याचा याहवेहने निर्धार केला आहे. त्यांनी मापक दोरी ताणली आहे विनाश करण्यास आपला हात रोखला नाही. त्यांनी संरक्षक भिंत व तटबंदीस विलाप करण्यास लावले ते एकत्रच ढासळून पडले.

  24. तिच्या वेशी जमिनीत धसल्या आहेत; त्यांच्या सळया मोडून नष्ट झाल्या आहेत. तिचे राजे आणि अधिपती इतर देशात बंदिवासात गेले आहेत, तिथे नियमशास्त्र राहिले नाही, आणि तेथील संदेष्ट्यांना आता याहवेहकडून दृष्टान्तही मिळत नाहीत.

  25. याहवेहने योजल्यानुसार केले आहे; त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे.