मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते स्वखुशीने माणसांना पीडा देत नाहीत व त्यांना दुखवित नाहीत.

  2. जगातील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडवून चिरडणे,

  3. परमोच्चांनी दिलेले हक्क त्यांच्यापासून हिरावून घेणे,

  4. कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे— या गोष्टी प्रभू बघणार नाहीत काय?

  5. प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे?

  6. अनिष्ट व इष्ट ही दोन्हीही परमोच्चाच्या मुखातून येत नाहीत काय?

  7. आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ, आणि परत याहवेहकडे वळू.

  8. आपण स्वर्गातील परमेश्वराकडे आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू:

  9. आम्ही पाप केले आणि बंड केले आणि तुम्ही त्याची क्षमा केली नाही.

  10. “तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला; तुम्ही निर्दयपणे संहार केला.

  11. तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे जेणेकरून कोणतीही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचू नये.

  12. याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून पाहीपर्यंत ते वाहत राहतील.

  13. याहवेह, त्या खोल डोहातून मी तुमच्या नावाचा धावा केला,

  14. तुम्ही माझी विनंती ऐकली: “माझ्या विनवणीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.”

  15. मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले आणि म्हणाले, “भिऊ नकोस.”

  16. हे प्रभू, तुम्हीच माझा वाद चालविला; तुम्ही माझ्या जीवनाची खंडणी दिली.

  17. याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. तुम्हीच माझी बाजू उचलून धरा!

  18. याहवेह, त्यांनी केलेले अपमान तुम्ही ऐकले आहेत, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान—

  19. हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल ते ज्यास पात्र आहेत, असे प्रतिफळ त्यांना द्या.

  20. त्यांच्या हृदयावर आवरण टाका, तुमचा शाप त्यांच्यावर पडो!

  21. क्रोधाने त्यांचा पाठलाग करा आणि याहवेहच्या आकाशाखालून त्यांना पूर्णपणे नाहीसे करा.

  22. याहवेहने त्यांच्या क्रोधास निर्बंध सोडले आहे; त्यांचा अत्यंत भयानक क्रोध ओतला गेला आहे. त्यांनी सीयोनमध्ये अग्नी पेटविला त्या अग्नीने तिच्या पायांना भस्म करून टाकले आहे.

  23. स्वतः याहवेहने त्यांची पांगापांग केली आहे; ते आता त्यांचा सांभाळ करणार नाहीत. याजक सन्मानयोग्य राहिले नाहीत, वडीलजन कृपेयोग्य राहिले नाहीत.

  24. याहवेह द्वारा अभिषिक्त, आमच्या जीवनाचा श्वास, त्यांच्या जाळ्यात अडकला. आम्ही विचार केला होता की त्यांच्या छत्राखाली कोणत्याही परकीय राष्ट्रात आम्ही रहिवास करू.

  25. सीयोनकन्ये, तुझी शिक्षा संपेल, ते तुझा बंदिवास वाढविणार नाहीत. पण एदोम कन्ये, तुझ्या पापांची ते तुला शिक्षा देतील, आणि तुझी दुष्टता उघडकीस आणतील.