God
God चा उल्लेख असलेली वचने
तर आता निर्वासित असलेल्या तुझ्या लोकांकडे जा आणि त्यांच्याशी बोल. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात,’ मग ते तुझे ऐको किंवा न ऐकोत.”
मग आत्म्याने मला वर उचलले आणि माझ्या पाठीमागून मोठ्या गर्जनेचा मी आवाज ऐकला, जेव्हा धन्य याहवेहचे वैभव आपल्या स्थानातून उठले.
तेव्हा आत्म्याने मला वर उचलले आणि मी माझ्या आत्म्यात कटूत्व व रागाने भरून दूर गेलो आणि याहवेहचा मजबूत हात माझ्यावर होता.
सात दिवसांच्या शेवटी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर.
जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू त्यांना चेतावणी दिली नाहीस किंवा त्यांनी त्यांचे दुष्टमार्ग सोडून त्यांचा जीव वाचवावा म्हणून तू त्यांना सांगितले नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.
“त्याच प्रकारे, जेव्हा एखादा न्यायी आपल्या न्यायत्वापासून मागे फिरतो आणि जे वाईट ते करतो आणि मी त्यांच्यापुढे एक अडखळण ठेवेन आणि तो मरण पावेल. कारण तू त्याला चेतावणी दिली नाही, तो त्याच्या पापामुळे मरेल. जी न्यायीपणाची कृत्ये त्या व्यक्तीने केली ती आठवली जाणार नाहीत, आणि त्याच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.
त्या ठिकाणी याहवेहचा हात माझ्यावर होता, आणि ते मला म्हणाले, “ऊठ आणि मैदानाकडे जा, तिथे मी तुझ्याशी बोलेन.”
तेव्हा मी उठलो व मैदानाकडे गेलो. आणि मी खेबर नदीकाठी पाहिलेल्या वैभवासारखे याहवेहचे वैभव तिथे उभे होते आणि मी उपडा पडलो.
तू शांत असावे आणि त्यांचा निषेध करू नये म्हणून तुझी जीभ तुझ्या टाळूला चिकटेल असे मी करेन, कारण ते बंडखोर लोक आहेत.
परंतु मी तुझ्याशी बोलेन, तेव्हा मी तुझे मुख उघडेन आणि तू त्यांना सांगशील, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ ज्याला ऐकावयाचे आहे ते ऐकतील आणि ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये; कारण ते बंडखोर लोक आहेत.
त्यांच्या पापाच्या वर्षांइतके दिवस मी तुला ठरवून देत आहे. म्हणून तीनशे नव्वद दिवस तू इस्राएली लोकांच्या पापाचा भार वाहशील.
“हे संपवल्यानंतर, परंतु यावेळी आपल्या उजव्या कूशीवर तू पुन्हा पड आणि यहूदीयाच्या लोकांच्या पापाचा भार वाहा. त्यासाठी प्रत्येक वर्षासाठी एक दिवस असे चाळीस दिवस मी तुला नेमून दिले आहेत.
मी तुला दोर्यांनी बांधीन म्हणजे तुझे वेढा घालण्याचे दिवस संपेपर्यंत तू एका कूशीवरून दुसर्या कूशीवर वळू शकणार नाहीस.
याहवेह म्हणतात, “याप्रकारे ज्या राष्ट्रांमध्ये मी त्यांना घालवून देईन तिथे इस्राएली लोक अमंगळ अन्न खातील.”
तेव्हा मी म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, असे नको! मी स्वतःला कधी विटाळले नाही. माझ्या लहानपणापासून आजपर्यंत मेलेले किंवा जंगली जनावरांनी फाडलेले असे मी काहीही खाल्ले नाही. कोणतेही अशुद्ध मांस माझ्या मुखात कधीही गेले नाही.”
तेव्हा याहवेहने म्हटले, “तर मग ठीक आहे, मानवी विष्ठेऐवजी गाईच्या शेणावर आपली भाकरी भाजण्यास मी तुला परवानगी देतो.”
नंतर याहवेहने मला म्हटले: “हे मानवपुत्रा, यरुशलेममध्ये मी भाकरीचा पुरवठा खंडित करणार आहे. लोक कष्टी होऊन तोलून अन्न खातील आणि निराशेने पाणी मापून पितील.
जेव्हा तुझे वेढ्याचे दिवस संपतील, तेव्हा केसांचा तिसरा भाग शहरामध्ये जाळ. मग केसांचा तिसरा भाग शहराभोवती तलवारीने कापत जा. आणि तिसरा भाग वार्यावर उडव, कारण मी आपली तलवार उपसून त्यांचा पाठलाग करेन.
“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेम आहे, ज्याला मी सर्व राष्ट्रांच्या मधोमध स्थापित केले, आणि तिच्याभोवती सर्व राष्ट्रे ठेवली.
तरीही आपल्या दुष्टतेने तिने माझे नियम व विधींचा तिच्याभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक विरोध केला आहे. तिने माझे नियम नाकारले व माझ्या विधींचे पालन केले नाही.
“यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही आपल्या सभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक मोकाट झाला आहात आणि तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळले नाही. तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांप्रमाणे देखील तुम्ही वागला नाहीत.
“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेमे, मी स्वतःच तुझ्याविरुद्ध आहे आणि मी सर्व राष्ट्रांसमक्ष तुला शासन करेन.
जे मी पूर्वी कधी केले नाही किंवा पुन्हा करणार नाही असे तुझ्या अमंगळ मूर्तींमुळे तुला करेन.
म्हणून तुझ्यामधील आईवडील आपल्या लेकरांना खातील व लेकरे त्यांच्या आईवडिलांना खातील. मी तुमच्यावर न्यायशासन आणेन आणि बाकीच्यांना वार्यावर पसरवून टाकीन.