मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही; मी तुमची गय करणार नाही. मी तुम्हाला तुमच्या कृत्यांचे आणि तुमच्यातील अमंगळ कार्याचे प्रतिफळ देईन. “ ‘तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेहने तुमच्यावर वार केला आहे.

  2. “ ‘त्यांनी कर्णे वाजविली आहे, त्यांनी सर्वकाही सज्ज केले आहे, परंतु कोणी युद्धात जाणार नाही, कारण संपूर्ण समुहावर माझा क्रोध आहे.

  3. “ ‘ते आपली चांदी रस्त्यावर फेकतील, आणि त्यांचे सोने अशुद्ध मानले जाईल. याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे चांदी व सोने त्यांची सुटका करू शकणार नाही. ते त्यांची भूक मिटवणार नाही किंवा त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांच्या संपत्तीनेच त्यांना पापात पडण्यास भाग पाडले आहे.

  4. त्यांनी त्यांच्या सुंदर दागिन्यांविषयी गर्व केला आणि त्यांच्या अमंगळ मूर्ती बनवण्यास त्यांचा उपयोग केला. त्यांनी त्यांच्या व्यर्थ प्रतिमा बनविल्या; म्हणून ते दागिने मी त्यांच्यासाठी अशुद्ध करेन.

  5. मी त्यांची संपत्ती परदेशीयांना लूट अशी देईन आणि पृथ्वीतील दुष्ट ते लुबाडून घेतील, व ते भ्रष्ट करतील.

  6. लोकांपासून मी आपले मुख वळवेन, आणि मी जतन केलेले माझे मौल्यवान स्थळ लुटारू अपवित्र करतील. ते त्यात शिरतील आणि त्यास भ्रष्ट करतील.

  7. सर्वात दुष्ट राष्ट्रांना मी आणेन जे त्यांच्या घरांचा ताबा घेतील. बलवानाच्या गर्वाचा मी शेवट करेन, आणि त्यांची पवित्रस्थाने भ्रष्ट होतील.

  8. राजा शोक करेल, राजकुमार निराशेची वस्त्रे पांघरेल, आणि देशातील लोकांचे हात थरथर कापतील. त्यांच्या कृत्यांनुसार मी त्यांच्याशी वागेन, आणि त्यांच्या स्वतःच्या मापानुसार मी त्यांचा न्याय करेन. “ ‘तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”

  9. सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, जेव्हा मी माझ्या घरात बसलो होतो आणि यहूदीयाचे वडीलजन माझ्यापुढे बसले होते, तिथे सार्वभौम याहवेहचा हात माझ्यावर आला.

  10. मी पाहिले, आणि मनुष्यासारखी दिसणारी एक आकृती मला दिसली. त्याच्या कमरेसारख्या दिसणार्‍या भागापासून खालचा भाग अग्नीसारखा होता आणि तिथून वरच्या भागाचे रूप तेजस्वी धातूसारखे प्रज्वलित होते.

  11. हातांसारख्या दिसणार्‍या आकृतिसारखे त्याने काहीतरी पुढे केले व माझे डोक्याचे केस धरले. मग आत्म्याने मला पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान वर उचलले आणि परमेश्वराच्या दृष्टान्तामध्ये त्याने मला यरुशलेमला, आतील अंगणाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या प्रवेशाकडे नेले, जिथे ईर्षेस प्रवृत्त करणारी मूर्ती उभी होती.

  12. आणि जसे मैदानात मी पाहिले होते असेच तिथे इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव माझ्यासमोर होते.

  13. तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, उत्तरेकडे पाहा.” म्हणून मी पाहिले आणि वेदीच्या उत्तरेकडील द्वाराच्या प्रवेश स्थानात मला ती ईर्षेची मूर्ती दिसली.

  14. आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, ते जे काही करीत आहेत ते तू पाहतोस काय; इस्राएली लोक या ठिकाणी अमंगळ गोष्टी करीत आहेत, ज्यामुळे माझ्या पवित्रस्थानातून मी दूर केला जाईन? परंतु यापेक्षाही अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”

  15. मग त्याने मला अंगणाच्या प्रवेशाजवळ आणले. मी पाहिले आणि भिंतीमध्ये एक छिद्र असल्याचे मला दिसले.

  16. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आता भिंत खोद.” म्हणून मी भिंत खोदली आणि त्यात मला एक दरवाजा दिसला.

  17. आणि तो मला म्हणाला, “आत जा आणि ते इथे करीत असलेले दुष्ट व अमंगळ कृत्ये पाहा.”

  18. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ”

  19. मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराकडे आणले, तिथे मी स्त्रिया पाहिल्या ज्या बसून तम्मुत्स दैवतासाठी शोक करीत होत्या.

  20. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहतोस काय? यापेक्षा अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”

  21. मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणात आणले आणि तिथे मंदिराच्या प्रवेशद्वारात, देवडीच्या व वेदीच्या दरम्यान, सुमारे पंचवीस पुरुष होते. याहवेहच्या मंदिराकडे त्यांची पाठ असून त्यांचे तोंड पूर्वेकडे करीत ते पूर्वेकडे सूर्यापूढे वाकून त्याची उपासना करीत होते.

  22. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिलेस काय? या ज्या अमंगळ गोष्टी ते करतात ते यहूदाहसाठी क्षुल्लक आहेत काय? त्यांनी आतंकाने देश भरून सातत्याने माझा राग भडकवावा काय? त्यांच्याकडे पाहा, ते कशी आपल्या नाकाला फांदी लावत आहेत!

  23. म्हणून मी त्यांच्याशी क्रोधाने वागेन; मी त्यांच्याकडे दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही. जरी ते माझ्या कानात रडतील, तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”

  24. आता करुबांवर असलेले इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव तिथून वर जाऊन, मंदिराच्या उंबरठ्यावर आले. तेव्हा ज्या पुरुषाने तागाची वस्त्रे घातली होती व ज्याच्याकडे लेखन सामुग्री होती, त्याला याहवेहने बोलाविले

  25. आणि याहवेहने त्याला म्हटले, “संपूर्ण यरुशलेम शहरातून जा आणि त्यात अमंगळ कृत्ये केल्याबद्दल जे दुःख व विलाप करतात त्यांच्या कपाळावर एक चिन्ह कर.”