मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी हे ऐकत असताना, याहवेहने बाकीच्यांना म्हटले, “त्याच्यामागे शहरात जा आणि दया किंवा सहानुभूती न दाखविता त्यांना मारून टाका.

  2. वयस्कर पुरुष, तरुण पुरुष व स्त्रिया, आई व लेकरे सर्वांची कत्तल करा, परंतु ज्यांच्या कपाळावर चिन्ह केलेले आहे त्यांना स्पर्श करू नका. माझ्या पवित्रस्थानापासून सुरुवात करा.” तेव्हा त्यांनी त्या वयस्क पुरुषांपासून सुरुवात केली जे मंदिराच्या समोर होते.

  3. मग तो म्हणाला, “मंदिर भ्रष्ट करा आणि वधलेल्यांनी अंगणे भरून टाका. जा!” तेव्हा ते बाहेर गेले आणि शहरात सर्वत्र लोकांना मारू लागले.

  4. ते लोकांना मारीत असताना मी एकटाच होतो, मी उपडा पडून मोठ्याने रडलो, “हाय हाय, सार्वभौम याहवेह! यरुशलेमवर आपण आपला कोप ओतून उरलेल्या सर्वच इस्राएली लोकांचा नाश करणार आहात काय?”

  5. याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’

  6. म्हणून मी त्यांना दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही, आणि त्यांनी जे काही केले आहे ते मी त्यांच्याच डोक्यावर आणणार आहे.”

  7. तेव्हा लेखन सामुग्री जवळ असलेला, तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाने येऊन सांगितले, “आपण आज्ञापिल्याप्रमाणे मी केले आहे.”

  8. तेव्हा तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाला याहवेहने म्हटले, “करुबाखालच्या चाकांमधून जा आणि करुबांच्या मधील जळत्या निखार्‍यांनी आपली ओंजळ भर आणि ते शहरात पसरून टाक.” मी पाहत असता, तो आत गेला.

  9. मग याहवेहचे वैभव करुबांवरून उठले आणि मंदिराच्या उंबरठ्याकडे गेले. मंदिर ढगांनी भरले आणि याहवेहच्या तेजाच्या प्रकाशाने अंगण भरले.

  10. करुबांच्या पंखांचा आवाज बाहेरील अंगणात ऐकू येत होता, तो तर सर्वसमर्थ परमेश्वर बोलतात असा त्यांच्या वाणीसारखा होता.

  11. जेव्हा याहवेहने तागाची वस्त्रे परिधान केलेल्या पुरुषाला आज्ञा दिली, “चाकांच्या मधून, करुबांच्या मधून अग्नी घे,” तो पुरुष जाऊन एका चाकाच्या बाजूला उभा राहिला.

  12. मग याहवेहचे वैभव मंदिराच्या उंबरठ्यावरून निघाले आणि करुबांवर जाऊन थांबले.

  13. मी पाहत असता, करुबांनी आपली पंखे पसरली आणि जमिनीवरून उठले, ते पुढे जात असता, चाकेही त्यांच्याबरोबर गेली. ते याहवेहच्या भवनाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे थांबले, आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.

  14. हे तेच जिवंत प्राणी होते ज्यांना मी इस्राएलच्या परमेश्वराच्या आसनाखाली खेबर नदीकाठी पाहिले होते, आणि मला समजले की हे तेच करूब आहेत.

  15. नंतर आत्म्याने मला उचलून याहवेहच्या मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराजवळ आणले. तिथे द्वाराच्या प्रवेशाकडे पंचवीस पुरुष होते आणि त्यांच्यामध्ये लोकांचे पुढारी अज्जूरचा पुत्र याजन्याह व बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह यांना मी पाहिले.

  16. याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, हे ते पुरुष आहेत जे दुष्टतेचा कट करून शहरात वाईट सल्ला देतात.

  17. मग याहवेहचा आत्मा माझ्यावर आला आणि त्यांनी मला असे बोलावयास सांगितले: “याहवेह असे म्हणतात: इस्राएलाच्या पुढार्‍यांनो तुम्ही असेच म्हणतात, परंतु तुमच्या मनात काय सुरू आहे ते मी जाणतो.

  18. “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जी शरीरे तुम्ही तिथे टाकली आहेत ती मांस आहेत आणि हे शहर कढई असे आहे, परंतु मी तुम्हाला त्यातून बाहेर काढेन.

  19. तुम्हाला तलवारीचे भय आहे आणि मी तुमच्याविरुद्ध तलवारच आणणार आहे, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.

  20. मी तुम्हाला शहरातून बाहेर घालवेन आणि तुम्हाला विदेशी लोकांच्या हाती देईन आणि तुमच्यावर शिक्षा आणेन.

  21. तुम्ही तलवारीने पडाल आणि इस्राएलच्या सीमांवर मी तुमच्यावर न्याय आणेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  22. हे शहर तुम्हाला कढई असे असणार नाही किंवा तुम्ही त्यात मांसही नसाल; इस्राएलच्या सीमेवर मी तुमचा न्याय करेन.

  23. आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे, कारण तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही किंवा माझे विधी मानले नाही, परंतु तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या मापांप्रमाणे तुम्ही वागला.”

  24. आता मी भविष्य सांगत असतानाच बेनाइयाहचा पुत्र पेलातियाह मरण पावला. तेव्हा मी उपडा पडून मोठ्या आवाजात रडलो, “अरेरे, सार्वभौम याहवेह! इस्राएलच्या उरलेल्यांचा आपण सर्वनाश करणार काय?”

  25. याहवेहचे वचन माझ्याकडे आले: