मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा; आमच्या अपमानाकडे लक्ष द्या.

  2. हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे; तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे.

  3. मग तुम्ही आम्हाला नेहमी का विसरता? तुम्ही आमचा इतक्या दीर्घकालापर्यंत त्याग का केला?

  4. याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा, म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ; पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा,

  5. जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल आणि आमचा कायमचा त्याग केला नसेल तर.

  6. माझ्या तिसाव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, खेबर नदीजवळ मी निर्वासित लोकांबरोबर असताना, स्वर्ग उघडले आणि मी परमेश्वराचा दृष्टान्त पाहिला.

  7. बूजीचा पुत्र यहेज्केल याजक बाबिलोनी लोकांच्या देशात, खेबर नदीच्या किनाऱ्याकडे असताना याहवेहचे वचन त्याच्याकडे आले; तिथे याहवेहचा हात त्याच्यावर होता.

  8. ते प्राणी पुढे चालत, तेव्हा मी त्यांच्या पंखांचा आवाज ऐकला, तो जोरात वाहणार्‍या जलाशयासारखा, सर्वसमर्थाच्या वाणीसारखा, लष्करी सेनेच्या घोषणेसारखा होता. जेव्हा ते स्थिर उभे राहत, तेव्हा ते त्यांची पंखे खाली करीत असत.

  9. पावसाच्या दिवशी मेघांत दिसणार्‍या मेघधनुष्यासारखे त्याच्या सभोवती तेज होते. याहवेहच्या वैभवासारखे त्याचे रूप होते. जेव्हा मी ते पाहिले, तेव्हा मी उपडा पडलो आणि बोलणार्‍याची वाणी मी ऐकली.

  10. तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन.”

  11. तो बोलत असताना, आत्म्याने माझ्यामध्ये प्रवेश केला व मला माझ्या पायांवर उभे केले आणि तो माझ्याशी बोलताना मी ऐकले.

  12. तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे.

  13. ज्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे ते उद्धट व हट्टी आहेत. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’

  14. तू माझे शब्द त्यांना सांगितले पाहिजे, मग ते ऐको किंवा न ऐकोत, कारण ते बंडखोर आहेत.

  15. परंतु तू हे मानवपुत्रा, मी तुला जे सांगतो ते ऐक. त्या बंडखोर लोकांप्रमाणे तू बंड करू नकोस; तुझे तोंड उघड आणि मी तुला जे देतो ते खा.”

  16. ती त्याने माझ्यापुढे उघडली. त्याच्या दोन्ही बाजूंना विलाप आणि शोक आणि दुःखाचे शब्द लिहिलेले होते.

  17. आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आहे ते खा, ही गुंडाळी खा; नंतर इस्राएली लोकांशी बोल.”

  18. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला खाण्यासाठी गुंडाळी दिली.

  19. तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही जी गुंडाळी मी तुला देत आहे ती पोटभरून खा.” म्हणून ती मी खाल्ली आणि ती माझ्या तोंडात मधासारखी गोड लागली.

  20. नंतर तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, आता इस्राएली लोकांकडे जा आणि त्यांना माझी वचने सांग.

  21. दुर्बोध किंवा अनोळखी भाषेचे पुष्कळ लोक, ज्यांची भाषा तुला समजत नाही, त्यांच्याकडे नाही. खचितच जर त्यांच्याकडे मी तुला पाठवले तर त्यांनी तुझे ऐकले असते.

  22. परंतु इस्राएल लोक तुझे ऐकत नाही कारण ते माझे वचन ऐकू इच्छित नाही, कारण सर्व इस्राएली लोक कठोर व हट्टी आहेत.

  23. पण मी तुला त्यांच्यासारखाच निग्रही व कठोर बनवीन.

  24. मी तुझे कपाळ हिऱ्यापेक्षा अधिक कठोर, गारगोटीपेक्षा कठीण करेन, जरी ते बंडखोर लोक आहेत तरी त्यांना भयभीत होऊ नको; किंवा घाबरू नको.”

  25. आणि तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुझ्याशी जी वचने बोलतो ती काळजीपूर्वक ऐक आणि आपल्या हृदयात जपून ठेव.