मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लोकांची अंतःकरणे. प्रभूकडे विलाप करतात. सीयोन कन्येच्या तटांनो, स्वतःला विसावा न देता, तुमचे डोळे आराम न करता एखाद्या नदीप्रमाणे तुमचे अश्रू रात्रंदिवस वाहोत.

  2. उठा, रात्री धावा करा, जसा रात्रीचा प्रहर सुरू होतो; त्यांच्यापुढे आपले हात उंचावून, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर भुकेने व्याकूळ होऊन बेशुद्ध पडणार्‍या तुमच्या मुलांच्या जीवनासाठी विनवण्या करा. प्रभूच्या समक्षतेत आपली अंतःकरणे पाण्यासारखी ओता.

  3. याहवेह, बघा व विचार करा: तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय?

  4. पाहा वृद्ध व तरुण एकत्र रस्त्यांवरील धुळीत पडली आहेत; माझे तरुण व तरुणी शत्रूंच्या तलवारींनी ठार होऊन मरून पडली आहेत. तुमच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही त्यांचा संहार केला; कसलीच दयामाया न दाखविता तुम्ही त्यांचा वध केला.

  5. “सणासाठी आमंत्रित केल्याप्रमाणे, तुम्ही माझ्याविरुद्ध संकटांना सर्व बाजूंनी बोलाविले. याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी एकही मनुष्य निसटला नाही किंवा जिवंत राहिला नाही. ज्यांचे मी संगोपन केले आणि वाढविले, त्या सर्वांचा माझ्या शत्रूकडून नाश झाला आहे.”

  6. याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला मी मनुष्य आहे.

  7. निश्चितच त्यांनी परत परत, दिवसभर माझ्याविरुद्ध त्यांचा हात उगारला आहे.

  8. त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत आणि त्यांनी माझी हाडे मोडली आहेत.

  9. त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे.

  10. जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत.

  11. मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे.

  12. त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले.

  13. त्यांनी आपले धनुष्य ताणून मला आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे.

  14. आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी माझे अंतर्याम छेदले आहे.

  15. प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे, आणि मला आंब प्यावयास दिली आहे.

  16. त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत. त्यांनी मला धुळीत तुडविले आहे.

  17. म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.”

  18. याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.

  19. त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; तुमची विश्वसनीयता महान आहे.

  20. मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.”

  21. जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.

  22. याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे.

  23. जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे.

  24. कारण प्रभू कोणाचाही कायमचा त्याग करत नाहीत.

  25. जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात, त्यांची महान प्रेमदया अथांग आहे.