मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तरी जेव्हा मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षकांनी ही अद्भुत कामे पाहिली आणि लहान मुलांना मंदिराच्या परिसरात, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” असे ओरडतांना ऐकले, तेव्हा ते संतापले.

  2. “ख्रिस्ताबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” “तो दावीदाचा पुत्र आहे,” त्यांनी उत्तर दिले.

  3. येशूंनी विचारले, “मग दावीद त्याला आत्म्याद्वारे ‘प्रभू,’ असे कसे म्हणतो?

  4. जर दावीद त्यांना ‘प्रभू’ म्हणतो, तर ते त्याचा पुत्र कसा असू शकेल?”

  5. येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता व त्यांना गरज असताना त्याने काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही का?

  6. जेव्हा हे नासरेथकर येशू जात आहेत असे त्याने ऐकले, तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”

  7. अनेकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो अधिकच मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला, “अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”

  8. “आमचा पिता दावीदाचे येणारे राज्य आशीर्वादित होवो!” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”

  9. नंतर मंदिराच्या आवारात लोकांना शिक्षण देतांना, येशूंनी त्यांना विचारले, “ख्रिस्त, हा दावीदाचा पुत्र आहे, असे तुमचे नियमशास्त्र शिक्षक का म्हणतात?”

  10. कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना, तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’

  11. स्वतः दावीद त्यांना ‘प्रभू’ असे म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?” जमलेला मोठा जमाव येशूंचे भाषण मोठ्या आनंदाने ऐकत होता.

  12. एका कुमारीकडे पाठविले, जिचा विवाह दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर निश्चित झाला होता. त्या कुमारीचे नाव मरीया होते.

  13. ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील.

  14. त्यांनी आपला सेवक दावीदाच्या घराण्यातून आपल्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे.

  15. योसेफसुद्धा दावीदाच्या घराण्यातील व वंशातील असल्यामुळे, तो यहूदीया प्रांतातील गालीलातील नासरेथ या दावीदाच्या गावी बेथलेहेम येथे वर गेला.

  16. आज दावीदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त प्रभू आहे.

  17. तो मल्याचा पुत्र, तो मिन्नाचा पुत्र, तो मत्ताथाचा पुत्र, तो नाथानाचा पुत्र, तो दावीदाचा पुत्र,

  18. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  19. तो मोठ्याने ओरडला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”

  20. येशूंच्या पुढे चाललेल्या गर्दीतील लोकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो उलट अधिक मोठमोठ्याने ओरडतच राहिला, “अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”

  21. नंतर येशूंनी त्यांना एक प्रश्न विचारला, “ख्रिस्त हा दावीदाचा पुत्र आहे असे का म्हटले जाते?

  22. कारण दावीदाने स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हटले आहे: “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’

  23. दावीदच ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?”

  24. शास्त्रलेख असे सांगत नाही का, दावीदाच्या कुळात, बेथलेहेममध्ये, जिथे दावीद राहिला तिथून ख्रिस्त येईल?”

  25. तो म्हणाला, “बंधू भगिनींनो, येशूंना अटक करून देण्यासाठी मार्गदर्शन करणारा यहूदाहच्या संदर्भात फार पूर्वी दावीद राजाद्वारे पवित्र आत्म्याने भाकीत केलेला शास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक होते.